SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 61
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ दाह शमन करण्यासाठी ज्याप्रमाणे गाडी व्यवस्थित चालावी म्हणून चाकाला वंगण लावतात, अगदी त्याचप्रमाणे शरीरधर्म टिकवण्यासाठी स्वादरहित होऊन अन्न ग्रहण करणे याला एपणा समिति म्हणतात. ४) आदाननिक्षेपण समिती आदान निक्षेपण समिती म्हणतात. (४५२) - - ५) उच्चार उत्सर्ग समिती स्थावर किंवा जंगम जीवांची विराधना होणार नाही अशा निर्जन्तुक जागी मल-मूत्र इ. बिसर्जन करणे उच्चार उत्सर्ग समिती होय. २९५ धर्म उपकरण यत्नापूर्वक घेणे व ठेवणे याला तीन गुप्ती, पाच समिती यांचा जो साधक सम्यक् प्रकाराने पालन करतो तो संसार परिभ्रमणातून लवकरात लवकर मुक्त होतो. पाच समिति व तीन गुप्ती यांना अष्टप्रवचन माता म्हणतात. २९६ तत्त्वार्थवार्तिकात जी पाच समिती व तीन गुप्ती यांची व्याख्या दिली आहे. त्यात व उत्तराध्ययन सूत्रात वर्णित पाच समिती, तीन गुप्तिंची व्याख्या यात फार फरक आहे. भावार्थ समान आहे. परंतु उत्तराध्ययन सूत्रात विस्तृत विवेचन आहे. उदा. इर्यासमितीचे आलंबन, काळ, मार्ग व यतना या चार कारणांनी परिशुद्ध इर्ष्या अर्थात गती करणे, विचरण करणे नंतर आलम्बन वगैरे काय आहे त्याचे ही वर्णन आहे. याचे विस्तृत विश्लेषण इथे करणे संभव नाही. २९७ - जैन दर्शनाच्या साधनेत समिती, गुप्ती यांचे फार महत्त्व आहे. कारण चारित्र्याच्या शुभप्रवृतीसाठी समिती आहे आणि अशुभप्रवृत्तीपासून निवृत्त होण्यासाठी तीन गुप्ती आहेत. २९८ संवराच्या सत्तावन्न भेदांत पुढे दहाप्रकारचे धर्म येतात. उत्तमक्षमामार्दवार्जवशौचसत्य संयमतपमस्त्यागाकिंचन ब्रह्मचर्याणिधर्मः | २९९ १) क्षमा- दुष्ट व्यक्तींकडून शिव्या, चेष्टेने हसणे, अवज्ञा, घृणा, शरीर, छेदन, वगैरे क्रोध व्यक्त करण्याचे असहय निमित्त समोर उपस्थित असूनसुद्धा मनात किंचितमात्र सुद्धा कलुषितता नसणे ही खरी उत्तम क्षमा होय. २) मार्दव उत्तम जाति, कुल, रूप, विज्ञान, ऐश्वर्य, श्रुतलाभ व शक्तीने मुक्त असून सुद्धा त्याचा अभिमान गर्व न करणे, मानहारी मार्दव आहे. ५ आवश्यक सूत्रात आठ मद सांगितले आहेत. त्यात वरील मदांशिवाय एक
SR No.009231
Book TitleJain Darshan Bhavna Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages366
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size107 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy