SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 336
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (७२४) WRIVATHO R ROTESTION जलप्रवाहाप्रमाणे सतत वहात आहे. या संसाराच्या स्वरूपाला समजण्यासाठी संसार भावनेच्या चिंतनाची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय जन्ममरणाच्या आवागमनाच्या फेऱ्यातून सुटू शकणार नाही. जो संसाराची वास्तविकता समजत नाही तो संसारात अडकतो. संसार एक रंगभूमी आहे, जीवरूपी नट त्यात अनेक रूपधारण करतो. नरक, तिर्यंच, मनुष्य आणि देवता ह्या चार गतीत परिभ्रमण करणाऱ्या जीवाचे सगळेच जीवस्वजन आहेत. कारण एकच जीव कधी माता तर कधी बहीण तर कधी भाऊ होतो. संसारात परिभ्रमण करणाऱ्या एक जीवाचे अन्य जीवांबरोबर सर्व प्रकारचे संबंध झाले आहेत, आणि ते पण एकचवेळी नाही तर अनंत वेळा. म्हणून सगळे जीव स्वजन आहे. आणि जर सर्व जीवांना परजन समजायच असेल तर वर्तमानमध्ये ज्यांना जीव स्वजन म्हणतो ते देखील परजनच आहे. सगळे संबंध कर्मामुळे उत्पन्न झालेले आहेत. ___ज्याप्रमाणे गृहस्थ एखादे घर भाड्याने घेतो आणि जेव्हा त्याची आवश्यकता नसते. तेव्हा त्याला सोडून देतो आणि दुसऱ्या घरात प्रवेश करतो, त्याचप्रमाणे जीव बांधलेल्या आयुष्य कर्माच्या उपभोगासाठी एका योनीत प्रवेश करतो आणि तेथील कर्म भोगून दुसऱ्या योनीत जातो. संसारी जीव सरकारी नोकराप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे कित्येक सरकारी नोकरांना अमुक मुदत पूर्ण झाल्यावर स्थान बदलावे लागते त्याचप्रमाणे जीवाचे तसे कर्म भोगले गेल्यावर योनी बदलावी लागते. अशा या संसाराची विचित्रता, परिवर्तनशीलता पाहून संसारभोग भोगण्याची इच्छा होत नाही, मनात तीव्र वैराग्य उत्पन्न होते. सर्व भारतीय दर्शनांचा मुख्य हेतू संसारापासून मुक्ती मिळवणे आहे. म्हणून संसाराच्या स्वरूपाचे वर्णन आणि त्यापासून मुक्त होण्याचे विवेचन प्रस्तुत भावनेत केले आहे. एकत्व भावना - आपले हे वर्तमान जीवन अनेक प्रकारच्या संबंधाने बद्ध आहे. पारिवारिक, सामाजिक, नागरिक, राष्ट्रीय आणि अन्तर्राष्ट्रीय अनेक प्रकारचे संबंध ह्या जीवनाशी जुडलेले आहेत. परंतु हे सर्व संबंध व्यावहारिक आणि औपचारिक आहेत. निश्चय दृष्टीने आत्मा असंग एकटाच आहे. एकाकी आहे. या संसारातील कोणत्याही वस्तूशी किंवा व्यक्तीशी त्याचा कोणताही संबंध नाही. जे पण संबंध आहेत ते Ramaithe
SR No.009231
Book TitleJain Darshan Bhavna Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages366
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size107 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy