SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 238
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (६२८) याला सुद्धा हित शिक्षारूपी गोड शब्दांनी पश्चातापाचा पावन उपाय सांगितला. निनाथ भगवान (१६ चे तीर्थंकर) मेघराजाच्या भवामध्ये (जन्मामध्ये) बाजपक्ष्याच्या भावडीतन कबूतराला वाचवण्यासाठी आपल्या शरीरातील मांस कापून दिले. तीर्थंकरांची करुणा तर पराकाष्ठेच करुणा होती. पार्श्वकुमाराने (२३ वे तीर्थंकर) अग्नीत जळत असलेल्या लाकडांच्या मधून नागनागिणीला पाहिले (अंतरज्ञानाने) आणि पार्श्वकुमाराचे हृदय कासावीस झाले. त्या लाकडातील नाग-नागिणीला लाकडातून अर्धवट जळलेल्या अवस्थेतून बाहेर काढले आणि महामंत्र, नवकार मंत्र ऐकवला आणि ते नाग-नागिणी आत्म्यात शुभ परिणामात गेले. मरून धरणेन्द्र-पदमावती देव-देवी झाले. नेमकुमार विवाहासाठी व-हाड घेऊन निघाले. राजुलशी त्यांचा विवाह होता. मंडपाजवळ आल्यावर त्यांच्या कानावर पशुंचा दुःखाने आर्त स्वर पडला त्याचक्षणी त्यांचा आत्मा भावकरुणेने व्याकुळ झाला. माझ्या लग्नातील आमोद प्रमोद आणि मजेसाठी या पशूना सजा ? माइया क्षणिक सुखासाठी बिचाऱ्या अबोल, मूक, परस्वाधीन पशुंची आहुती !! नको हा असला संसार, मला लग्नच करायचे नाही. असा निर्णय करून मेघकुमार परत फिरले. "अयं खु नाणिणो सारं जं न हिंसई कंचणं ।" कोणत्याही जीवाला कधी ठार मारू नये, दुःख देऊ नये, हेच ज्ञानीयांच्या ज्ञानाचे सार आहे- याच ज्ञानियांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे साधकांनी आपल्या प्राणापेक्षा त्राणाला (जीवरक्षा) अधिक महत्त्व दिले. धर्मरुची अणगारांनी मुंग्यांची रक्षा करण्यासाठी कडू भोपळ्याची भाजी खाऊन टाकली. स्वतःला संपवून अभयाची दुंदुभी वाजवली. आचार्य हेमचंद्रजींच्या उपदेशाने कुमारपाल राजाने अहिंसा धर्म स्वीकारला. आपल्या राज्यात अहिंसेचा प्रचार केला.७८ अशाप्रकारे करुणेचे अवतार अनेक महापुरुषांची उदाहरणाने आपण आपल्या जीवनाला करुणाशील बनवू शकतो अशी प्रेरणा मिळते. परंतु भारतात मात्र मांसाहाराची प्रवृत्ती धकाधिक वाढत आहे. आज करुणा भावनेचा प्रचार-प्रसार करण्याची फार आवश्यकता म. जोपर्यंत मनात करुणा भावना ठसवली जात नाही तोपर्यंत मानव जीभेचे चोचले, नाचा अनावश्यक लोभ यामुळे घोर दृषित, ह्या जघन्य कार्यापासून परावृत्त होऊ शकणार
SR No.009231
Book TitleJain Darshan Bhavna Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages366
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size107 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy