SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 214
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (६०४) घड्याळातील कोणताही छोटासा भाग निरर्थक समजून काढून टाकला तर घड्याळ पडते. जगाचे घड्याळ ही असेच आहे. कारण की, कोणत्याही लहानातल्या लहान समजल्या जाणाऱ्या मजूर, हरिजन इ.ची अवहेलना करू नये. सर्व आपआपल्या परीने जीवन जगताहेत. नथुरामसारख्या सामान्य माणसानेच गांधीची हत्या केली. शक्यता आहे की आपल्याला सुद्धा या जगात कोणीही व्यक्ती समाप्त करू शकते. माणूस तर ठीक पण साप, विचूं, डास सारखे क्षुद्र प्राणीसुद्धा आपल्या जीवनाचा अंत करू शकतात. म्हणन कोणाचीही कधीही अवहेलना करणे म्हणजे स्वतःच्या जीवनाचे अंतिम दर्शन करण्यासारखे आहे. कोणाशीही शत्रुत्व असू नये. शत्रूला नष्ट करण्यापेक्षा शत्रुत्व नष्ट करावे. मैत्रीचा हात पुढे करावा हीच मैत्रीभावना आहे, हेच मैत्री भावनेचे रहस्य आहे. उत्तम मैत्री भावना सबको सुखी बनाय । वैर शोक सबका हरे, अंत मुक्ति ले जाय ॥१५ सर्व जीव सिद्धावस्था प्राप्त करू शकतात. परंतु कर्मवश दुःखी दिसतात. वैरभाव, दुःख, चिंता आणि भयाचे स्थान आहे. तो राग-द्वेष बाढवतो व चित्त विक्षुब्ध करतो. पण मैत्रीभावना चिन्ता एवं भय दूर करून अपूर्व शांती आणि सुख देते. मैत्रीभावनेमुळे मन सदैव आनंदित व स्वस्थ राहते. संच स्व-पर जीवनात अभय निर्माण होते. - जीवनात अवरोध निर्माण करणारे मनुष्य तथा अन्य क्रूर प्राणी यांना हटविण्यासाठी आणि त्यांना सहयोगी व अनुकूल करण्यासाठी सर्वात सुंदर अहिंसक उपाय आहे मैत्री भावना. मैत्रीच्या मधुरसात सद्भावनेने प्रतिकूल व्यक्तींचे हृदय आन्दोलित होते. आणि अनुकूल सहयोगी अधिक घनिष्ट बनतात. कारण मैत्री शरीराशी संबंधित नाही, ते तर आत्म्याचे मिलन आहे. मैत्रीमुळे चैतन्ययात्रा सुखद, सरस, सरल आणि मधुर बनते. ____ मैत्री मानवजातीचे कोमल नवनीत आहे. मधुर गोरस आहे. तो जाती, संप्रदाय, राष्ट्र, प्राप्त इ.च्या गौरवाला अक्षुण ठेवतो. - मैत्रीने आत्मीयता, स्नेह, प्रेम, सौजन्य, परस्परात वाढते. द्वेष वैर कटुता, द्रोह, पक्षपात, मनोमालिन्य दूर होते. प्रमोद भावना संसार एक राजमार्ग आहे आणि जीवन एक यात्रा. ही यात्रा सर्व प्राणीमात्रांना वा लागते. आपण सगळे यात्री आहोत. आपणा सर्वांचे एक ध्येय, एकच लक्ष्य आहे.
SR No.009231
Book TitleJain Darshan Bhavna Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages366
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size107 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy