SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 130
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (५२१) भ्रमण करीत राहील. जन्ममरणाच्या फेन्यात फेल्या मारीत राहील. कोणतेही कार्य अध्यवसाय किंवा उद्यम करण्याअगोदर मनात त्यानुसार भावात्मक तीव्रता निर्माण करावी लागते. कारण की, कर्माची संप्रवृत्ती होण्याअगोदर आत्म्यात भावनात्मक आंदोलन होते. त्या भावात्मक आंदोलनाला जर व्यक्तीने सत्यतेची तीव्रता सन्मुख केली तर ते कार्य सात्विक व निर्मळ होते. सत्शुभ, पवित्र भावनांचे चिंतन, अनुचिंतन अनुभावन मनात अशी प्रबल सवल उज्ज्वल परिणामांची धारा निष्पन्न करतात. त्यामुळे जीव सत्मार्गाने सशक्त भावनेने मार्गारूढ होतो. 1 जेव्हा व्यक्तीच्या मनात आपल्या बद्दल हीन निम्न दशेचे भान होते, तेव्हा त्याच्या चिंतनात एक जागृती येते. एक मोड येतो, तेव्हा प्रथम तो स्वतः आपल्याच विश्वासावर आघात अनुभव करतो की मी किती असत्याच्या मार्गावर चालत आहे ? सत श्रद्धा प्राप्त करण्याचा भाव त्याच्या मनात जागृत होतो. तो सश्रद्धेचे मनात मूल्यांकन करतो. त्याशिवाय जीवनात काही साररूप नाही. ही अशी एक अवस्था आहे. तिथे बोधीदुर्लभ भावना त्याला सद्श्रद्धा, सदविश्वासच्या मार्गाने जाण्यास प्रेरित करते. पुढे त्यात स्थिर होण्याची प्रेरणा मिळते. तो बोधीदुर्लभ भावनेचे महत्त्व, उपयोगिताबद्दल वारंवार चिंतन करायला लागतो. जेव्हा त्याला ते पूर्णपणे पटते की सम्यग्बोधी शिवाय जीवन निरर्थक आहे. तेव्हा त्याचे आत्मपरिणाम शुद्ध होतात. त्याची उत्कंठता वाढत जाते. जस-जशी त्या उत्कंठेमध्ये तीव्रता येऊ लागते. मिथ्यात्वाचे बंध शिथिल व्हायला लागतात. आणि मग एक वेळ अशी येते की मिथ्यात्वाची जागा सम्यक्त्व धारण करतो. असत्याबद्दल जी आस्था होती ती संपुष्टात येते. परिणामतः अज्ञान अंधकार दूर होतो. ज्ञानाचा आलोक उदित होतो. सम्यक्त्वाची प्राप्ती होताच मिथ्यात्व नष्ट होऊन अज्ञान दूर होऊन जातो तेच खरे सम्यग्ज्ञान बोधीदुर्लभ भावनेच्या परिणामस्वरूप साधक गुणस्थानावर आरूढ होतो. भावना अधिक प्रखर झाल्यावर त्याची तीव्रता वाढली तर जीव मग आपल्या स्वरूपाचे चिंतन करू लागतो. तो समजू लागलो की, मी एकटा आहे. मी नितांत एकटा आहे. ज्यांना आतापर्यंत मी माझे समजत होतो ते माझे नाहीत. ते सोडून जातात. बघता बघता ते मृत्यू पावतात. आणि परिवारातील आत्मीय म्हणविणारे जे आप्त, मित्र आहेत. त्यांच्या स्वार्थावर घाला पडतो तेव्हा तेच शत्रू बनून जातात. मग ते माझे कसे ? या बोधीदुर्लभ भावनेची हीच विशेषता आहे की, व्यक्ती सदबीर्य आणि सदपराक्रम करण्यास 1
SR No.009231
Book TitleJain Darshan Bhavna Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages366
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size107 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy