SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 122
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ परिचायिका आहे जे सत्श्रद्धेवर टिकलेले असते. याचेच नाव सम्यगदर्शन आहे. दर्शन शब्द संस्कृतच्या दृश धातूने बनलेला आहे. दृश धातू प्रेक्षन अर्थानेपण तो प्र+इक्षन. प्र उपसर्ग प्रकर्षं किंवा उत्कर्ष या अर्थाचा आहे. ज्याच्या द्वारे प्रकृष्ट किंवा उत्कृष्ट रूपाने पाहता येते. विचार केला जातो त्यास दर्शन म्हणतात. जेव्हा ते दर्शन सम्यक, सत्योन्मुख, तथ्ययुक्त, यथार्थ असते तेव्हा त्यास सम्यग्-दर्शन म्हटले जाते. सम्यग् दर्शन प्राप्त होणे ही मानवी जीवनाची सर्वश्रेष्ठ उपलब्धी आहे. सैद्धांतिक रूपात सम्यग्दर्शनाचा अर्थ आहे- विशुद्ध दृष्टी. आर. विलियम्स यांच्या शब्दात जिन भ. नी दाखवलेल्या मोक्षमार्गावर श्रद्धा असणे म्हणजे सम्यक्त्व आहे. आचार्य वसनंदियांच्या मते आप्त आगम आणि तत्त्वपदार्थ या तीनावर श्रद्धा असणे म्हणजे सम्यक्त्व. उमास्वातीच्या शब्दात तत्त्वरूप पदार्थांवर श्रद्धा म्हणजे दृढ प्रतीती सम्यग्दर्शन होय. आचार्य हेमचन्द्रांच्या अनुभार सुदेव, सुगुरु आणि सुधर्मा वर श्रद्धा ठेवणे सम्यक्त्व आहे. गंभीरतेने विचार केल्यास धर्माचे मूळच मुळी सम्यग्दर्शन आहे. कारण मोक्ष प्राप्तीसाठी प्रथमतः सम्यकदर्शन अत्यावश्यक आहे. सम्यक्त्वच केवलज्ञानाच्या उत्पत्तीचे पावश्यक आहे. सम्यक्त्वच केवलज्ञानाच्या उत्पत्तीचे स्थान आहे. सम्यक्त्व केवलज्ञानाची माता आहे. याची प्राप्ती सर्वांना सहज सुलभ नाही. संसारात फार थोडे लोक याची प्राप्ती करू शकतात. ज्यांनी अन्तर्मुहूर्त मात्र सुद्धा सम्यक्त्वाला स्पर्श केला असेल तो काही कमी अर्ध पुद्गल परावर्तनपेक्षा जास्त संसार परिभ्रमण करीत नाही. एवढ्या कालावधीत तो निश्चितच मोक्षप्रत पोहोचतोच म्हणजे त्याला नक्कीच मोक्ष मिळतो. ___ नाणेण जाणई भावे दंसणेण य सदहे । ज्ञानाने आत्मा जीवादी भाव जाणतो आणि दर्शनाने त्यावर श्रद्धा करतो. श्रद्धा शुद्ध असणे आणि तरी दृढ असणे यास दर्शनाराधना म्हणतात.४३२ मोक्षप्राप्तीत अप्रमतत्ता यावी त्यासाठी असे चिंतन करावे की अनादी प्रपंचात, विविध दुःखाच्या प्रवाहात, मोह ३. कर्माच्या तीव्र आघात सहन करताना जीवाला शुद्ध दृष्टी आणि शुद्ध चारित्र प्राप्त होणे च दुर्लभ आहे. अशाप्रकारची चिंतनशीलता म्हणजे बोधिदुर्लभत्वानुप्रेक्षा आहे. ८२२ ती सम्यग्बोधी सम्यग्दर्शन प्राप्त होणे मोठ्या सौभाग्याची बाब आहे. परंतु ती प्राप्त होणे फार-फार कठीण आहे. जन्म-जन्मांतराचे संस्कार सत्उद्यम सतपुरुषांचा संग नक कारणे जेव्हा घटित होतात, तेव्हा कुठे सम्यगदर्शन प्राप्त होते. बोधिदुर्लभ भावनेत फार
SR No.009231
Book TitleJain Darshan Bhavna Part 02
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages366
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size107 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy