SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 47
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ ic: स्वार्थपरायणतेने घेतले होते. त्याग, तप, संयमाची भावना कमी झाली होती. भोग आणि ऐश्वर्य यांनाच सर्वस्व मानले जात होते. अशाप्रकारे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे पतन चहूबाजूंनी दिसत होते. अशा परिस्थितीत माणूसकीला जागृत करणे अत्यंत आवश्यकच नव्हे तर अनिवार्य झाले होते. भगवान महावीरांना सामाजिक परिस्थिती समजली. त्यांनी दीक्षा घेतली. नंतर बारा वर्षापर्यंत कठोर साधना केली आणि अज्ञानाच्या धोर अंधकारात बुडलेल्या मानवांना ज्ञानाद्वारे आलौकित करण्यासाठी 'जगा आणि जगू द्या' याची घोषणा केली. ___ भगवान महावीरांनी सर्वांना संदेश दिला की सर्व जीव जगण्याची इच्छा ठेवतात. मरण्याची कुणालाही इच्छा नसते, यज्ञाच्या नावाने चालणारी हिंसा आणि त्या हिंसेने घडणारे पाप जनतेला दाखवून खरा यज्ञ आत्म्याला पवित्र करण्यात आहे आणि आत्मा पवित्र करण्यासाठी क्रोध, मान, माया, लोभ इत्यादी कषायांचा परित्याग करणे आवश्यक आहे असा बोध त्यांनी दिला. सांस्कृतिक विषमता आणि वर्णाश्रमाचा विस्कळीतपणा दूर करण्यासाठी त्यांनी सांगितले की जन्माच्या आधारावर उच्चनीचतेचा निर्णय होऊ शकत नाही, कर्मानेच व्यक्तीची ओळख होते. ह्याचे उदाहरण देताना त्यांनी हरिकेशी चाण्डाळ २३आणि सकडालपुत्र कुंभकार२४ यांसारख्या आत्मसाधना करणाऱ्यांचा उल्लेख केला आहे. नारी जागरण - नारी जातीच्या उत्थानासाठीसुद्धा त्यांनी जनतेमध्ये नारीच्या प्रती आत्मसन्मान आणि गौरवाची भावना जागृत केली. नारी अबला नसून सबला आहे. ती प्रत्येक कामात समर्थ आणि सक्षम असल्याची जाणीव करून दिली. नारीला त्यांनी केवळ धर्मग्रंथ वाचण्याचा अधिकार प्राप्त करून दिला नाही तर परमोच्च अशा मोक्षाच्या अधिकारी आहेत असे सुद्धा सांगितले. साध्वी चंदनबाला हिला त्यांनी छत्तीस हजार श्रमणींचे नेतृत्व प्रदान केले. भगवान महावीरांनी स्त्री आणि पुरुषाचे आत्मसामर्थ्य सारखेच आहे असे दाखवून साधनेच्या क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करणाऱ्या साधिकेच्या रूपात नारीला उच्च स्थानी प्रस्तुत केले. इतकेच नाही तर स्त्री ही पतित पुरुषाला प्रेमळ उपदेशाने संयम मार्गावर आणणारी, संयमात दृढ करणारी, प्रेरक शक्तीच्या रूपात पुरुषांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे असे प्रत्यक्ष दाखवून दिले. सती राजिमतिने (राजुल) संयमापासून विचलित झालेल्या रथनेमीला उद्बोधित करून आत्मशक्तीचा परिचय दिला, आणि संयमात Bhandkiawaastase मि
SR No.009230
Book TitleJain Darshan Bhavna Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages408
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size131 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy