SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 342
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ SAR SE O NARDAN SHARE JABARDAST (३२८) Kids Sane evelssava मोहरूपी वेगाने संसार चक्रावर आरूढ होऊन पराधिनतेमुळे जीव भ्रमण करत आहे.८८ भारवाहक मनुष्य एखाद्या देशात किंवा काळात आपला भार उतरवून विश्रांती घेऊ शकतो. परंतु शरीराचा भार वाहणाऱ्या जीवाला मात्र एका क्षणासाठी देखील विश्रांती मिळत नाही. औदारीक आणि वैक्रिय शरीर सुटले तरी कार्मण आणि तेजस शरीर नेहमी बरोबरच राहतात. रत्नकरंड श्रावकाचार यामध्ये चतुर्गतीरूपी संसाराच्या दुःखाचे विस्तृत वर्णन करताना एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंतच्या सर्व जीवांच्या आणि पंचेंद्रियामध्ये नरक, तिर्यंच, मनुष्य आणि देव यांच्या दुःखाचे इतके रोमांचक वर्णन केलेले आहे की ज्याची भयंकरता पाहून मनुष्य संसारापासून विरक्त होऊन जातो. संसाराचे दुःख इतके विचित्र आहे की भरत-चक्रवर्तीसारख्या लोकांचा सुद्धा लहान भावाने अपमान केला. वास्तविक पाहता मोठा भाऊ वडिलांसमान मानला पाहिजे. परंतु चक्रवर्तीचे उच्च स्थान लहान भाऊ बाहुबली सहन करू शकला नाही आणि भरत चक्रवर्तीच्या आमंत्रणाला लाथ मारून इर्षेने युद्ध केले. विचार केला पाहिजे की जेथे चक्रवर्तीसारख्या पुण्यवान पुरुषाचीसुद्धा अशी स्थिती होते तर तेथे सामान्य व्यक्तींचे काय ? कोणाला पत्नी नसल्याचे दुःख आहे तर कित्येकांना दुष्ट, कर्कशी, व्यभिचारी, कलह करणारी, रोगी, सतत संताप देणारी पत्नी असल्याने दुःख आहे, कित्येक लोकांची स्त्री आज्ञाकारी, सद्गुणी असते परंतु लहान वयातच तिचा मृत्यू झाल्याने ते दुःखी असतात, कोणी निर्धनतेमुळे दुःखी आहेत तर कोणी पुत्र नसल्याने दुःखी आहे. कित्येक पुत्र असूनही दुर्व्यसनी निघाला म्हणून दुःखी आहेत, तर कोणी अत्यंत कीर्तीशाली, यशस्वी मुलाच्या मृत्यूने दुःखी आहेत. कोणाचे भाऊ दुष्टवचन बोलून दुःख देतात. तर कोणाला असाध्य रोगाचे दुःख आहे. कित्येकजण मुलीच्या लग्नासाठी पैसे नाहीत म्हणून दुःखी आहेत तर कित्येकजण मुलगी मोठी झाली परंतु तिच्यासाठी योग्य असा मुलगा व घर न मिळाल्याने दुःखी आहेत. कित्येक आपली संतती आंधळी, पांगळी, मूक, बधिर, बेडी, कुरूप असल्याने दुःखी आहेत. तसे पाहिले तर संपूर्ण संसार दुःखाने भरलेला आहे, दुःखाचे लाखो प्रकार होऊ शकतात. ह्याचे रोज चिंतन केल्याने संसाराचा उद्वेग येऊन जो विरक्त होईल तो संसार परिभ्रमणाला दूर करण्यात समर्थ होईल.८९ संसाराच्या दुःखाचे चिंतन केल्याने दु:खापासून मुक्ती मिळते हे अनादी काळापासून पाहत आलो आहोत. कारण दुःखाच्या स्वरूपाला जो जाणेल तोच त्याला PUR SCARN os.meharelu M
SR No.009230
Book TitleJain Darshan Bhavna Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages408
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size131 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy