SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 295
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (२८१) पूर्व प्रकरणात अशुभ भावनेवर विचार केला त्याचे विघटन करून ह्या प्रकरणात शुभ भावनेवर विचार करायचा आहे. प्रथम भावेच्या महत्त्वाचे विवेचन करून अनित्यादी बारा वैराग्यभावनांचे ह्या प्रकरणात वर्णन केले जाईल. भावनेचे महत्त्व आचार्य समन्तभद्र विरचित 'रत्नकरंड श्रावकाचार' यामध्ये 'संस्थान विचय धर्मध्यानात बारा भावनांचे चिंतन करण्याचा उल्लेख आहे. कारण तीर्थंकरसुद्धा ह्या भावनेचे चिंतन करून संसार भोगापासून विरक्त झाले आहेत म्हणून भावनेला "वैराग्याची माता" संबोधिले आहे. संसारी जीवांची ह्या भावनेच्या चिंतनामुळे दुःखापासून मुक्ती होते. दुःखरूपी अग्नीने संपप्त झालेल्या जीवांना शीतल, मंद, सुगंधित वायूने व्याप्त अशा उपवनामध्ये जाऊन निवास करण्यासारखे सुख ह्या भावनेच्या चिंतनाने प्राप्त होते. ह्या भावना तत्त्वबोध करविण्यात आणि अशुभ ध्यानाचा नाश करण्यात सक्षम आहेत. ह्याच्या चिंतनासारखे दुसरे कल्याणरूप काही नाही. ह्या भावना द्वादशांग वाणीचे सार आहेत. म्हणून संस्थानविचय धर्मध्यानामध्ये ह्यांचे अत्यंत तन्मयतेने चिंतन करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे रसकुंपिकेच्या रसाने भावित केलेले लोखंड सुवर्ण होते, त्याचप्रमाणे बारा भावनांनी प्रभावित झालेता मलिन आत्मा शुद्ध होतो आणि आपल्या शुद्ध, निरंजन, निराकार, अनंतज्ञानमय परमात्मस्वरूपाला प्राप्त करतो. दान, शील इत्यादी धर्म जर भावरहित केले तर ते मीठरहित भोजनाप्रमाणे होईल. परंतु दान इत्यादी धर्मात भावरूपी रसायन मिळविल्याने निश्चितरूपात कर्माचा क्षय होतो. इतकेच नव्हे तर कर्माचे मूळ कारण असणाऱ्या रागद्वेषादींचे बीजही नष्ट होतात. ४ 'आत्मानं भावयतीति भावना' आत्मा ज्या भावनेने प्रभावित होतो त्यांना भावना असे म्हणतात. त्या वैराग्य आणि आत्महितैषी विषयाने दृढ होतात. ह्याने उपशम आणि नीती यांचा उच्च बोध प्राप्त होतो आणि आत्मबोध प्रकट होतो. ह्या भावना परमशांती देण्यास सक्षम आहेत. श्रीविजयपद्मसूरीजी यांनी भावनेचे महत्त्व अत्यंत सुंदर काव्यात उद्धृत केले आहे "निज आत्मकंचन शुद्ध करवा अग्नि जेवी भावना, भव सागरे बूडनारने पण तारणारी भावना, सर्व सिद्धिसाधन शुभ समाधि, प्रगट करती भावना, चिंतामनि जेम वांछित फळ आपनारी भावना । ५
SR No.009230
Book TitleJain Darshan Bhavna Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages408
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size131 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy