SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 264
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ STREE RS KARE (२५१) Pow ereews 1900908050SAKARATERIAL तिथे मित्रता टिकत नाही. परंतु लोभ तर सर्वनाश करणारा सर्वभक्षी आहे. र विजय मिळवला तर परमशांती प्राप्त होते. ११६ पाय सन्निपात रोगासारखा आहे. या रोगात द्राक्ष, ऊस, दूध, साखर यांचे ले नाही तर रोग बळावतो, त्याचप्रमाणे कषाय संसाराची वृद्धि करतात. जीव आहे व कषाय त्याचे पहारेकरी आहेत. ११७ जे कषायाच्या ताब्यात आहेत त्यांची संसारातून कधी सुटकाच होत नाही. उत्तराध्ययन सूत्रात केशीस्वामी आणि गौतमस्वामी यांचा संवाद आहे. कशीस्वामी, गौतमस्वामींना प्रश्न विचारतात की, ह्या जगात अशी कोणता अग्नी आहे जो शरीरधारी जीवाला जाळतो आणि तो अग्नी कशाने विझतो. तेव्हा गौतमी उत्तर देतात कसाया अग्गिणो वुत्ता, सुय-सील-तवो जलं११८ कषाय हा अग्नी, कषाय-क्रोध, माया, लोभ ही अग्नी आहेत आणि ह्या अग्नीला शमविण्यासाठी श्रुतशास्त्राचे, सात्त्विक साहित्याचे अध्ययन पठण, पाठन, चिंतन-मनन आणि बारा प्रकारचे तप व शील ह्या जलाचा उपयोग करावा लागतो, क्रोधामुळे आत्मा यतीत होतो. मानामुळे अधमगती मिळते, माया केल्याने सद्गतीचा मार्ग बंद होतो व लोभामुळे इहलोकात आणि परलोकात दोन्ही ठिकाणी भय, कष्ट, ताप, दुःखच दुःख वाट्याला येतात. ११९ कधायावर विजय मिळविण्यासाठी दशवैकालिकमध्ये श्रमण भ. महावीरांनी सांगितले आहे उवसमेण हणे कोहे, माणं मद्दवयाजिणे । मायं च उऽज्जवभावेण, लोभं संतोसओ जिणे ॥१२० क्रोधाचे हनन 'उपशम' म्हणजे शांतीने करा. मानाला मृदतेने जिंका. माया सरळतेने जिंका, ऋजुतेने जिंका आणि लोभवर संतोषने विजय मिळवा. क्रोधाला वश करण्यासाठी उपशम म्हणजे क्षमा, सहिष्णुता अथवा शान्तता धारण करावी. WISHES मान वश करण्यासाठी नम्रता, विनय, मृदुता, मायावश करण्यासाठी ऋजुताचे आचरण करावे. आणि लोभ वश करण्यासाठी आत्मतृप्ति निस्पृहता इत्यादिचे आचरण करावे. गौतमकुलकमध्ये सांगितले आहे की -
SR No.009230
Book TitleJain Darshan Bhavna Part 01
Original Sutra AuthorN/A
AuthorPunyasheelashreeji
PublisherSanskrit Pragat Adhyayan Kendra
Publication Year2004
Total Pages408
LanguageMarathi
ClassificationBook_Other
File Size131 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy