________________
नामरूप विचार व सर्व नामरूप विचार दिला आहे. ११) वाक्यविचार हा विभाग अत्यंत सविस्तरपणे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट
केलेला आहे. १२) वाक्प्रचारांच्या (सुमारे १७५) जोडीला वाक्यांश (सुमारे ४०), विशिष्ट
वाक्ये (सुमारे ७५), म्हणी (सुमारे ११) व सुभाषिते (सुमारे ४०) यांचा अंतर्भाव केला आहे. या मागील हेतु असा की अर्धमागधीत लिहिताना
त्यांचा यथोचित उपयोग व्हावा. १३) विशिष्ट अव्ययांचे उपयोग हे या ग्रंथाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सुमारे ९०
अव्ययांचे उपयोग सविस्तर व सोदाहरण दिले आहेत.
या ग्रंथात एकूण ३१ प्रकरणे असून ती पाच भागात विभागून दिलेली आहेत. शेवटी एक परिशिष्ट असून संदर्भग्रंथांची यादी दिलेली आहे. हे पुस्तक अर्धमागधी भाषेच्या अभ्यासकांना उपयोगी पडावे, अशी भूमिका आहे.
हे पुस्तक श्रुतभवन संशोधन केंद्र, कात्रज, पुणे ही संस्था प्रकाशित करीत आहे. त्याबद्दल त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार !
- के. वा. आपटे