________________
अर्धमागधी व्याकरण
(आ) मध्य असंयुक्त द् चा कधी कधी ल् झालेला आढळतो
कदंब कलंब (कळंब), प्रदीपयति=पलीवेइ (पेटवितो), द्वादश दुवालस,
दोहद-दोहल, प्रदीप्त पलित्त. (इ) मध्य असंयुक्त द् चा कधी कधी र झालेला दिसतो.
उदार=उराल, औदारिक ओरालिय (शरीर विशेष), एकादश२=एयारह,
द्वादश बारस, सप्तदश=सत्तरस, गद्गद=गग्गर (७) प् : रिपु=रिउ, विपुल=विउल, निपुण=निउण, नूपुर=नेउर, कापुरुष काउरिस
(वाईट, भित्रा मनुष्य), आर्यपुत्र= अजउत्त, सुपुरुष=सुउरिस, अञ्जलिपुट=अंजलिउड (ओंजळीची पोकळी), शङ्खपुर=संखउर;
अपूर्व अउव्व, आपूरित आऊरिय. (अ) अर्धमागधीत मध्य असंयुक्त प् कधी कधी तसाच राहतो.
अपोह, विपुल, समुपेक्खमाण. (आ) मध्य असंयुक्त प् चा पुष्कळदारे व् होतो. (पो वः। हेम १.२३१)
कोप कोव, दीप-दीव, रूप-रूव, समीप समीव, पाप=पाव, ताप=ताव, उपमा उवमा, चाप चाव, चपल=चवल; गोपाल गोवाल, उपाय=उवाय, कृपा= किवा, विपाक-विवाग; शापित साविय ; चपेटा=चवेडा (चापटी);
प्रपौत्र-पवोत्त ([मुलाकडून] पणतू). (८) य् : अ,आ या स्वराशी संयुक्त असलेला य् तसाच राहतो; इतर स्वराशी
संयुक्त असलेल्या य् चा लोप होतो. काय (देह), नयण (नयन), पिय (प्रिय), अभय, आलय, विलय, पायस; माया, जाया, दया, आयाम (लांबी), पिया (प्रिया) नैरयिक=नेरइय (नरकवासी प्राणी), दायिक दाइय (हिस्सेदार, समगोत्री),
दयिता=दइया (प्रिया), नैयायिक नेयाउय (न्यायशास्त्रज्ञ); वायु=वाउ, १ म. :- गद्गद - घोगरा, एकादश-अकरा, द्वादश - बारा. २ सङख्यायां च । प्रा.प्र.। २.१४ ३ म. :- दीपक - दिवा, ताप-ताव, करपत्र-करवत, गोपालक-गोवळा,
सपत्नी-सवत, भाद्रपद-भादवा, शिंशप-शिसवा, कृपा-कीव.