________________
xx
अर्धमागधी व्याकरण
(अ) ऋ = ऊ : मृषा = मूसा (आ) ऋ = ए : वृत = वेंट (देठ, डेख), गृह्णाति = गेण्हइ (घेतो) (इ) ऋ = ओ : मृषा = मोसा (ई) वृ = रु : वृक्ष = रुक्ख
३० दीर्घ ऋचे विकार
(अ) संस्कृतमधील ऋकारान्त शब्दांच्या रूपात येणाऱ्या दीर्घ ऋचा ई किंवा ऊ होतो?.
(१) ऋ = ई : मातृणाम् = माईणं, मातापितॄणाम् = अम्मापिईणं. (२) ऋ = ऊ : मातापितॄणाम् = अम्मापिऊणं, (माउपिऊणं). (आ) दीर्घ ऋकारान्त धातूतील ऋ चा अर होतो.२ तृ = तर (तरणे), वृ = वर (वरणे).
३१ ह्रस्व लुचे विकार
संस्कृत शब्दातील ह्रस्व लू बद्दल इलि होतो. क्लृप्त = किलित्त (रचलेले), क्लृप्ति = किलित्ति (युक्ति).
३२ ऐ व औ चे विकार : (नियमित)
साधारणपणे ऐ बद्दल ए वा अइ आणि औ बद्दल ओ अथवा अउ असे विकार होतात. केव्हा कोणते विकार होतील याबद्दल निश्चित नियम सांगता येत नाही; वाङ्मयीन प्रयोगावरून ते ठरवावे लागते.
३३ ऐ = ए३ : (ऐत एत् । हेम. १.१४८)
वैर = वेर, तैल = तेल्ल, भैरव = भेरव (भयंकर), चैल = चेल (वस्त्र),
१ पिशेल, पृ. ५८ पहा. २ म. : तरणे (तृ),वरणे (वृ). ३. म. : तैल - तेल, शैवल - शेवाळ