________________
प्रकरण १४ : अव्यय विचार
२५५
(स्वयम्), स्वत: (४६) सयराहं (लवकर, एकदम, अकस्मात्) (४७) सहसा (एकदम) (४८) सिमा' (कदाचित्) (४९) सुट्ठ (सुष्ठ), चांगले (५०) सेयं (श्रेयस्), चांगले (५१) हव्वं (लवकर) (ई) नकार दर्शक :
(१) न (नाही) (२) नहि, नेव (३) नो (नाही) (४) मा(नको) (उ) परिमाणवाचक :
(१) अईव (अतीव), अतिशय (२) अच्चत्थं (अत्यर्थम्), अतिशय (३) अलं (पुरे) (४) ईसि, ईसि (ईषत्), थोडेसे (५) उक्कोसेण (जास्तीत जास्त) (६) किंचि (किञ्चित्), थोडेसे (७) दरं (थोडेसे) (८) धणियं (अगदी) (९) नाणा (नाना), पुष्कळ (१०) पज्जत्तं (पर्याप्तम्), पुरेसे (११) पगामं (प्रकामम्), पुरेसे (१२) पाओ, पायं (प्रायः), पायसो (प्रायशः), प्राय: (१३) बाढं (अगदी, पुरेसे) (१५) मणं, मणगं, मणयं, मणा, मणागं (मनाक्), थोडेसे (१४) भिसं (भृशम्), पुष्कळ
२५१ शब्दयोगी अव्यये
(अ) शब्दयोगी अव्यये जेव्हा नामांना जोडून येतात, तेव्हा त्यांना त्या नामाच्या विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. ही शब्दयोगी अव्यये त्यांचे अर्थ व त्यांना अपेक्षित विभक्ती यांची माहिती पुढीलप्रमाणे :(१) द्वितीयेची अपेक्षा असणारी :- (१) अंतरेण (विना) (२) जाव (पर्यन्त) (३) पइ (प्रति), कडे (४) मोत्तूण (खेरीज, विना) (५) आदाय, गहाय (सह) (६) विणा (विना) (७) आ (पर्यन्त) (८) पडुच्च (उद्देशून) (२) तृतीयेची अपेक्षा असणारी :- समं, सद्धि, सह (सह), विणा (३) पंचमीची अपेक्षा असणारी :- आरब्भ (पासून), आ (पासून) (४) षष्ठीची अपेक्षा असणारी :- पुरओ (पुढे), अग्गओ, उवरि, समीवं, हेट्टा, बाहिं, सगासे, अंतियं, पासं (जवळ), पिट्ठओ (मागे), अहे, अंतिए, संमुहं,
१ दस. २.४ २ शब्दामागे अ, अण् ठेऊन अकरणवाचक शब्द होतात. ‘अकरणरूपसिद्धि' पहा.