SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 36
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ जीव व संसार परिभ्रमण मानवी जीव अनादिकाळापासून मिथ्यात्वामुळे वस्तूचे स्वरूप न जाणता शरीर , स्त्री-पुरुष , धन-धान्य , मुले या पर पदार्थांमध्येच एकत्व , ममत्व , कर्तृत्व व भोक्तृत्वाची खोटी कल्पना मनी धरून जगात वावरत आहे. त्याचमुळे दुःख , व्याकूळता , चिंता , क्लेश अशा अनेक पीडांनी त्रस्त आहे. __ हा जीव या संसारामध्ये नाना योनी आणि गतींमध्ये भटकतो. याचे कारण , मी कोण? माझे या विश्वाशी नाते काय? या मूलभूत प्रश्रांचा विचार करून आयुष्याची दिशा ठरविली नाही, हेच होय. त्यालाच मिथ्यात्व म्हटले आहे. आत्महित साधण्याकरिता प्रथम - १) खऱ्या देवशास्त्रगुरूची यथार्थ प्रतीती २) जीवादी सप्त तत्त्वांची यथार्थ प्रतीती ३) स्व-परतत्त्वांची श्रद्धा आणि ४) आपल्या शुद्ध स्वरूपाची अनुभूती या गोष्टी आवश्यक आहेत . __ अज्ञानी जीवास आपल्या चैतन्य स्वरूपाची ओळख न झाल्याने तो रागादी विकारामुळे स्व व परचा भेद करू शकत नाही. रागादिक हे आस्त्रवभाव असून , ते आत्म्यापासून भिन्न आहेत . त्यामुळेच ते सोडण्यायोग्य (हेय) आहे. आपल्या ज्ञायकस्वभावाच्या आश्रयाने स्वरूपात रमणे , हाच एकमेव उपाय आहे. परंतु , जीवाच्या हे लक्षातच येत नाही व त्यामुळे तो पूजा-अर्चनेच्या क्रियाकांडानेच कर्मांना रोखून दूर करता येईल, असे मानतो. अशाप्रकारे सर्वच अज्ञानी जीव या अगृहीत मिथ्यात्वाने पछाडलेले आहेत. बाहेरचे संयोग अथवा पर पदार्थ हे दुःखाचे कारण नाही. परंतु , त्यांच्याविषयीचे प्रेम , ममत्व हेच दुःखाचे कारण आहे . मिथ्यात्व म्हणजे काय? प्रयोजनभूत जीवादी सात तत्त्वांच्या विपरीत (विरुद्ध) श्रद्धा न असणे म्हणजे मिथ्यात्व होय . कुदेवाला देव मानणे तथा अतत्त्वाला तत्त्व समजणे, जैन धर्माची ओळख / २५ Jain Education International For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001594
Book TitleJain Dharmachi Olakh
Original Sutra AuthorN/A
AuthorVijaya Gosavi
PublisherSumeru Prakashan Mumbai
Publication Year2008
Total Pages98
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Religion, & Articles
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy