SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 34
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ रंगाचे ताजेतवाने सुंदर आंबे बघून शेठजीस आंबे खाण्याचे भाव झाल्याबरोबर भावास्त्रव सुरू झाला व त्याच्या पाठोपाठ द्रव्यास्त्रव पण झाला. ४) बंधतत्त्व : मोह-राग-द्वेष, पाप-पुण्याच्या विभावाने आत्म्यात थांबणे म्हणजेच भावबंध व त्याच्या निमित्ताने पुद्गलाचे स्वयं कर्मरूप बांधणे म्हणजे द्रव्यबंध होय. हेच आपण शेठजीच्या उदाहरणाने समजू. शेठजीला आंबे खाण्याचे भाव झालेत व तोंडाला पाणी पण सुटले. अचानक खाली पडलेला आंबा शेठजीने तोंडाला लावला तेव्हाच भावबंध झाला व तो झाल्याबरोबरच कर्म पुद्गल परमाणूने कर्मबंध रूपाने द्रव्यबंध केला. शुभ भावाने पुण्याचा बंध होतो. जसे मंदिरात जाणे, पूजा करणे, तीर्थयात्रा करणे, स्वाध्याय करणे, , पुस्तक लिहिणे हे सर्व शुभभाव आहेत. त्यामुळे पुण्याचा बंध होतो. परंतु, कुणाचे वाईट करणे, मन दुखविणे, मारणे इत्यादीमुळे अशुभभाव बनतात. पाप-पुण्य हे आस्त्रवतत्त्वात समाविष्ट आहेत. ५) संवरतत्त्व : आत्म्याच्या शुद्धीचे प्रगटीकरण हेच संवरतत्त्व आहे. ज्ञानानंदस्वभावी आत्म्याच्या लक्षामुळे विकारी भावांना अडविणे म्हणजेच भावसंवर आहे व तदनुसार नवीन कर्माचे येणे, स्वयं थांबणे म्हणजे द्रव्यसंवर आहे. वरील उदाहरणाने हेच आपण बघू या. शेठजीला आंबे खाण्याची तीव्र इच्छा झाली व खाली पडलेला आंबा शेठजीने तोंडाला पण लावला. पण, लगेच त्यांना आठवले की, माझा मृत्यू जवळ येईल. तेव्हा तो आंबा न खाताच दूर केला व स्वयं मी कोण, याचा विचार मनात येताच संवरतत्त्वाचा प्रारंभ झाला. जहाजाला पडलेले छिद्र बंद करण्याचे प्रयत्नच संवरतत्त्वात उदाहरण म्हणून योग्य ठरतात. ६) निर्जरातत्त्व : होते. अखंड निज शुद्धात्म्याच्या लक्षामुळे आंशिक शुद्धी होते आणि अशुभाची हानी झाल्यामुळे भावनिर्जरा होते. त्याच वेळेस कर्माचे अंश खिरणे चालू होते . त्यास द्रव्यनिर्जरा म्हणतात. जीवाच्या मनात आत्म्याच्या विषयी विचार, मंथन चालू झाले की, , निर्जरातत्त्वाची सुरुवात आपल्या उदाहरणात शेठजीने आता आंबा विसरून स्वयंचा अभ्यास, विचार, मंथन सुरू केले. Jain Education International जैन धर्माची ओळख / २३ For Private & Personal Use Only www.jainelibrary.org
SR No.001594
Book TitleJain Dharmachi Olakh
Original Sutra AuthorN/A
AuthorVijaya Gosavi
PublisherSumeru Prakashan Mumbai
Publication Year2008
Total Pages98
LanguageMarathi
ClassificationBook_Other, Religion, & Articles
File Size5 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy