Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान प्ररूपित
संघर्ष टाळा
कोणा सोबतही संघर्ष झाला तर ती आपल्या अज्ञानतेची निशाणी आहे.
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान प्ररूपित
संघर्ष टाळा
मुळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक : श्री अजीत सी. पटेल महाविदेह फाउन्डेशन
5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेज के पीछे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८००१४, गुजरात. फोन (०७९) २७५४०४०८
:
प्रथम आवृत्ति : द्वितीय आवृत्ति तृतिय आवृत्ति चतुर्थ आवृत्ति :
:
पंचम आवृत्ति : छठ्ठी आवृत्ति
:
मुद्रक
-
All Rights reserved - Dr. Niruben Amin Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Post - Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India.
१०००
१०००
१०००
१०००
३०००
३०००
भाव मूल्य : 'परम विनय' आणि
सितम्बर २००७
फरवरी २००९
दिसम्बर २००९
सितम्बर २०११
मार्च २०१२
अक्तुबर २०१३
'मी काहीच जाणत नाही', हा भाव !
द्रव्य मूल्य :
१० रुपये
लेज़र कम्पोज : दादा भगवान फाउन्डेशन, अहमदाबाद.
: महाविदेह फाउन्डेशन
पार्श्वनाथ चैम्बर्स, नये रिजर्व बैन्क के पास, इन्कमटैक्स, अहमदाबाद-३८० ०१४.
फोन : (०७९) २७५४२९६४
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
વર્તમાનતીર્થંકર
શ્રીસીમંધરસ્વામી
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं
नमो आयरियाणं
नमो उवज्झायाणं
नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो,
सव्व पावप्पणासणो
मंगलाणं च सव्वेसिं,
पढमं हवइ मंगलम् १
ॐ नमो भगवते वासुदेवाय २ ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
AU
(दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके
मराठी १. भोगतो त्याची चुक
६. क्रोध २. एडजेस्ट एवरीव्हेर
७. चिंता ३. जे घडले तोच न्याय
८. प्रतिक्रमण ४. संघर्ष टाळा
९. भावना सुधारे जन्मोजन्म ५. मी कोण आहे?
हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान
२२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य २. सर्व दुःखों से मुक्ति
२३. दान ३. कर्म का सिद्धांत
२४. मानव धर्म ४. आत्मबोध
२५. सेवा-परोपकार ५. मैं कौन हूँ?
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ६. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी २७. निजदोष दर्शन से... निर्दोष ७. भुगते उसी की भूल
२८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार ८. एडजस्ट एवरीव्हेयर
२९. क्लेश रहित जीवन ९. टकराव टालिए
३०. गुरु-शिष्य १०. हुआ सो न्याय
३१. अहिंसा ११. चिंता
३२. सत्य-असत्य के रहस्य १२. क्रोध
३३. चमत्कार १३. प्रतिक्रमण
३४. पाप-पुण्य १४. दादा भगवान कौन?
३५. वाणी, व्यवहार में... १५. पैसों का व्यवहार
३६. कर्म का विज्ञान १६. अंत:करण का स्वरूप
३७. आप्तवाणी - १ १७. जगत कर्ता कौन?
३८. आप्तवाणी - ३ १८. त्रिमंत्र
३९. आप्तवाणी - ४ १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ४०. आप्तवाणी - ५ २०. प्रेम
४१. आप्तवाणी - ६ २१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ४२. आप्तवाणी - ८ * दादा भगवान फाउन्डेशन च्या द्वारे गुजराती आणि अंग्रजी भाषे मध्ये सुद्धा बरीच पुस्तके
प्रकाशित झाली आहे। वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता। प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित करीत आहे।
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भुत आश्चर्य! एक तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवान कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांचे संपूर्ण निराकरण केले! आणि जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट !!
ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे कि, 'हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत । हे तर ए.एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानी पुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत । ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही। माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो.'
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट | स्वतःचा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे कि नाही! नंतर लोकांना मार्ग (दाखविणारा) हवा कि नाही?
- दादाश्री परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आता पर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुहूंना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, जे पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे.
हे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत.
पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतू साठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेट्रन आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हांच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण 'दादा भगवान'च्या नावांनी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्व साठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या स्वमुखा ने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे.
ते 'दादा भगवान' तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे.
प्रस्तुत अनुवाद मध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादाजींची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा.
ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश ‘जसा आहे तसा' आपल्याला गुजराती भाषेत अवगत होणार. ज्याला ज्ञानाचा गहन अर्थ समजायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे.
अनुवाद संबंधी चूकांसाठी आपली क्षमा प्रार्थितो.
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय 'संघर्ष टाळा' एवढे वाक्य जर जीवनात सहजासहजी उतरले, तर त्याचा संसार सुंदर होईलच व मोक्ष सहज, सरळ समोरुन येवून भेटेल! हे निर्विवाद वाक्य आहे!
अक्रम विज्ञानी पूज्य दादाश्रींनी दिलेल्या ह्या सूत्राला आत्मसात करून कितीतरी लोकं तरुन पार उतरुन गेले. त्यांचे जीवन सुख-शांतिमय झाले आणि मोक्षमार्गाला लागले! ह्यासाठी मात्र प्रत्येकाने एक दृढ निश्चय करायचा आहे की मला कोणा ही बरोबर संघर्ष (वादविवाद) करायचा नाही. समोरच्या व्यक्तिने जरी वाद केला तरी मला वाद करायचा नाही. बस, एवढाच जर कोणी निश्चय केला तर, त्याला नैसर्गिक रितीने आतूनच सूझ (समज) पडेल व संघर्ष टळेल!
रात्री अंधारात खोलीतून बाहेर जायचे असेल आणि समोर भिंत आली तर आपण काय करतो? भिंतीला लाथ मारुन, असे म्हणू कि 'तु मध्ये का म्हणून आलीस? सरकून जा, हे माझे घर आहे?' तेव्हा तर तुम्ही कसे शहाणे होऊन आंधळ्या माणसा प्रमाणे हाताने दार शोधत शोधत बाहेर पडतात, हो कि नाही? येथे लक्षात येते कि येथे आपण आडमुढेपणा केला तर त्या भिंतीवर आपले डोके आपटेल व फुटेल!
लहानशा गल्लीतून राजा जात असेल आणि समोरुन सांड धावत येत असेल, तेव्हा राजा त्या बैलाला असे म्हणेल कि 'तू बाजूला सरक, हे माझे राज्य आहे, ही माझी गल्ली आहे, मला रस्ता दे?!' तर अशा वेळेला बैल समोरुन काय म्हणेल, 'तू राजा तर मी महाराजा! येऊन जा!' तर अशा वेळेस भलभल्या राजाला सुद्धा सावकाश हळू हळू तेथून निघून जावे लागेल, आणि ओट्यावर सुद्धा चढून जावे लागेल. का? संघर्ष टाळण्यासाठी.
ह्या साध्या साध्या गोष्टीवरुन असे लक्षात येते कि जर कोणी आपल्याशी वादविवाद करायला येतील तर ते त्या भिंतीसारखे आणि बैलासारखेच आहेत. म्हणून आपण वादविवाद टाळा व शहाण्यासारखे बाजूला सरकून जा. जर संघर्ष समोर आला तर कसे ही करुन टाळा. त्याने आपले जीवन क्लेशविरहीत होणार आणि मोक्ष प्राप्त होईल.
___ - डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा
नका पडू संघर्षात (वादविवादात) 'कोणाशी ही संघर्ष करू नका आणि संघर्ष टाळा.'
ह्या आमच्या वाक्याचे जर आराधन कराल तर थेट मोक्षाला पोहचाल. तुमची भक्ति आणि आमचे वचनबल सर्वच काम करेल. तुमची तयारी पाहिजे. आमचे हे एकच वाक्य जर कोणी अमलात आणले तर तो मोक्षाला जाईल. अरे, आमचे हे एक सूत्र 'जसे आहे तसे' संपूर्ण गिळाल (आत्मासात कराल) तरीसुद्धा मोक्ष हातात लाभेल, असे आहे ! परंतु ते 'जसे आहे तसे' गिळून जा.
आमचे हे एक सूत्र एक दिवस पाळलात तर गजबची शक्ति उत्पन्न होईल! आत एवढी सर्व शक्ति आहे कि, संघर्ष (वाद विवाद) कोणी करायला आले तरी त्याला टाळता येईल. जो जाणून-बुजून खाईत पडण्याच्या तयारीत आहे, त्याच्या बरोबर वादविवाद करीत बसायचे आहे का? अशी व्यक्ति तर कधीच मोक्षाला जाणार नाही, परंतु आपल्याला सुद्धा तो त्याच्या जवळ बसवून ठेवेल. अरे! हे आपल्याला कसे परवडणार? जर तुला मोक्षालाच जायचे आहे तर अश्यां बरोबर जास्त शहाणपणा करण्यात अर्थ नाही. सर्वच बाजूनी, चारी दिशांनी अगदी व्यवस्थित सांभाळायचे. जरी तुम्हाला या जाळ्यातून सुटायचे असले तरी हे जग तुम्हाला सुटू देणार नाही. म्हणून वादविवाद उत्पन्न न करता स्मूथली (सुरळीत) बाहेर निघून जायचे आहे. अरे, आम्ही तर असे सांगतो कि, जर तुमचे धोतर काट्यात अडकले असेल आणि जर तुमची मोक्षाची गाडी सुटत असेल
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा तर त्या धोतराला सोडवत बसू नकोस! धोतराला सोडून पळून जावे. अरे! एक क्षण सुद्धा एकाच अवस्थेत चिटकून राहण्यासारखे नाही. तर मग इतरांची गोष्टच कशाला करायची? जर तू चिकटलास तर तू स्वरूपाला विसरलास.
जर चूकुन सुद्धा तू कोणाच्या संघर्षात अडकलास, तर त्याचा निकाल करून टाक. अगदी सहज रीतीने त्या वादविवादाची (घर्षणाची) ठिणगी उडविल्या शिवाय निघून जावे.
ट्राफिकच्या नियमामूळे संघर्ष टळतात जसे आपण रस्त्यावरुन काळजीपूर्वक चालत असतो ना! मग समोरचा माणूस किती ही वाईट असो, तो आपल्याला टक्कर मारुन जाईल आणि नुकसान करेल तर ती गोष्ट वेगळी, परंतु कोणाचे नुकसान करायचा आपला हेतु नसावा. आपण त्याचे जर नुकसान करायला गेलो तर आपले ही नुकसान होईलच. म्हणून नेहमी प्रत्येक संघर्षात दोघांचेही नुकसान होते. तुम्ही समोरच्या व्यक्तिला दुःख दिले, तर त्याच क्षणी आपोआप तुम्हाला सुद्धा दुःख झाल्याशिवाय रहाणारच नाही. ही टक्कर (संघर्ष) आहे म्हणून मी हे उदाहरण दिले आहे कि रस्त्यावरील वाहनव्यवहाराचा काय धर्म आहे कि टक्कर झाली तर तुम्ही मरुन जाल. टक्करमध्ये धोका आहे म्हणून कोणाशीही टक्कर (संघर्ष) करू नका. अशाच प्रकारे ह्या व्यवहारिक कार्यात सुद्धा संघर्ष नको. संघर्ष करण्यात धोका आहे नेहमीच. संघर्ष कधी तरी होतो. महिन्यात दोनशे वेळा असे थोडेच होते? महिन्यात असे प्रसंग किती वेळा होतात?
प्रश्नकर्ता : काही वेळा! दोन-चार वेळा.
दादाश्री : हं, म्हणजे तितके सावरुन घ्यावे आपण. माझे असे म्हणणे आहे कि, आपण कशासाठी बिघडवायचे, प्रसंग बिघडवणे हे आपल्याला शोभत नाही. तेथे रस्त्या वर सर्व वाहतुकीच्या नियमा प्रमाणे चालतात, तेथे
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा आपल्या समज (मर्जी)प्रमाणे कोणी नाही ना चालत? आणि येथे व्यवहारात स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालणार! कुठलाही कायदा नाही? रस्त्यावर तर कधीच अडचण येत नाही, ते किती छान वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे? आता हा जो कायदा तुम्ही नीट समजून चाललात, तर मग कधी अडचण येणार नाही. म्हणजे हे कायदे समजण्यात चुक आहे. कायदा समजविणारा समजूतदार असला पाहिजे. ____ट्राफिकचे (वाहतूकीचे) नियम पाळण्याचा तुम्ही निश्चय केलात, तर त्यामुळे किती छान नियम पाळले जातात! त्यात का अहंकार जागृत होत नाही 'ते काहीही सांगू देत, पण मी तर असेच करणार.' कारण कि तो ट्राफिकच्या नियमांना आपल्या बुद्धिनुसार बरोबर समजतो, स्थूल आहे म्हणून, हात कापला जाईल, लगेच मरेन. असे हे संघर्ष करून ह्यात मरुन जाईन याची जाणीव नव्हती. ह्यात बुद्धि पोहचू शकत नाही. ही सूक्ष्म वस्तु आहे. ह्यामुळे सारे नुकसान सूक्ष्म प्रकारेच होतात.
प्रथम प्रकाशिले हे सूत्र ! एका व्यक्तिला एक्कावन साली हे एक सूत्र दिले होते. मला तो हा संसार पार करण्याचा सल्ला विचारीत होता. मी त्याला 'संघर्ष टाळ' असे म्हटले होते. आणि अशा रीतीने त्याला समज दिली होती.
हे तर झाले असे कि मी शास्त्राचे पुस्तक वाचत होतो, तेव्हा तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला कि 'दादाजी, मला काही तरी ज्ञान द्याच.' तो माझ्याकडे नोकरी करत होता. तेव्हा मी त्याला म्हटले 'तुला काय ज्ञान द्यायचे? तू तर सगळया जगाशी भांडून येतोस. मारामारी करून येतोस' रेल्वेतही तू मारामारी केलीस, तू पैसाचे पाणी करतो आणि रेल्वेला जे कायदेशीर भरायचे आहे, ते पैसे तू भरत नाहीस. आणि वरुन भांडण करतोस, हे सारे मला माहित आहे. जेव्हा त्याला सांगितले कि 'तुला शिकवून काय करायचे? तू तर सगळयांशी भांडतोस!' तेव्हा तो म्हणाला,
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा 'दादाजी हे आपण सगळ्यांना जे ज्ञान सांगता ते मलाही शिकवा.' मी म्हणालो 'तुला शिकवून काय करायचे? तू तर रोज गाडीत मारमारी, घोटाळे करून येतोस.' सरकारात दहा रुपये भरण्या एवढे सामान असेल तरीही तो पैसे भरल्याशिवाय आणयचा आणि लोकांना वीस रुपायाचे चहापाणी पाजायचा! त्यामुळे तर दहा रुपये वाचत नाहीत, उलट दहा रुपये जास्त वापरले जातात असा तो नोबल (!) माणूस.
पुन्हा तो मला म्हणाला कि तुम्ही मला काही ज्ञान शिकवा, मी म्हणालो, 'तू तर रोज भांडण करून येत असतो, आणि रोज मला ते ऐकावे लागते.' 'तरीही काका, काहीतरी द्या, काहीतरी द्या मला' असे तो म्हणाला. तेव्हा मी म्हणालो 'एक वाक्य मी तुला देतो. तू पाळशील का?' तेव्हा तो म्हणाला 'नक्कीच पाळीन.' मी म्हणालो 'कोणाच्याही बरोबर संघर्ष करू नकोस' तेव्हा तो म्हणाला, 'संघर्ष म्हणजे काय, दादाजी? मला सांगा, मला नीट समजवून सांगा.'
मी म्हणालो, 'आपण अगदी सरळ चालत आहोत, मध्येच रस्त्यावर खांब आला तर आपण बाजूला सरकायला पाहिजे कि आपण त्या खांबाला आदळायचे?' तेव्हा तो म्हणाला, 'नाही, आदळले तर डोके फूटेल.' मी म्हणालो, 'समोरुन म्हैस येत असेल तर बाजूने जायला पाहिजे कि तिला टक्कर द्यायाची?' तेव्हा तो म्हणाला, 'जर टक्कर झाली तर ती म्हैस, मला मारेल त्यामुळे मी बाजूला जायला हवे.' मग मी विचारले 'साप येत असेल तर? मोठा दगड पडला असेल तर?' तर तो म्हणाला 'बाजूनेच जावे लागेल' मी विचारले, 'कोणाला बाजूने जायला पाहिजे?' तेव्हा तो म्हणाला 'आपणच बाजूने जायला पाहिजे.' मी विचारले, 'कशासाठी?' तेव्हा तो म्हणाला, 'आपल्या सुखासाठी, जर आपण त्यांना टक्कर दिली तर आपल्याला लागेल.' मी म्हणालो, 'या जगात कित्येक जण दगडासारखे आहेत, काही जण म्हशीसारखे आहेत, काहीजण गाईसारखे आहेत, काही जण मनुष्यासारखे आहेत, काहीजण सापासारखे आहेत, काहीजण खांबासारखे आहेत, सर्व
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा प्रकाराची माणसे आहेत. त्या सर्व लोकांशी तू संघर्षात पडू नकोस. अशा रीतीने तू आता मार्ग काढ.'
हे सारे मी त्याला १९५१ साली समजाविले होते. पण तो आता सुद्धा त्यात कमी पडत नाही. त्यानंतर त्याने कधीच कोणाशी वादविवाद केला नाही. हे शेठजी त्याचे काका लागतात. त्यांच्या हे लक्षात आले होते कि, हा आता कोणाशी संघर्ष करीत नाही. म्हणून ते शेठजी जाणून-बुजून त्याची कळ काढायचे. ते एखाद्या बाजूने काही कोंडी करायचे तर दुसऱ्या बाजूने हा मुकाटेने निघून जायचा. दुसऱ्या बाजूने कोंड्या केल्या कि फिरुन दुसऱ्या बाजूने निघून जायचा. संघर्ष तो टाळत होता १९५१ नंतर त्याने कोणाशीच संघर्ष केला नाही.
व्यवहारात, टाळा संघर्ष असा जेव्हा आपण गाडीतून उतरतो कि लगेच हमालाला इकडे ये! इकडे ये! असे ओरडतो. तीन-चार हमाल धावत येतात. आपण म्हणतो. 'चल हे सामान उचल'. त्याने सामान उचलून घेतल्यानंतर, स्टेशनातून बाहेर आल्याने वर पैसासाठी आपण कटकट करतो. 'मास्तरला बोलवू का? असे करू का? इतके जास्त पैसे घेतात का? तू असे करतो आणि तसे करतो.' अरे वेड्या येथे असे करून नाही चालणार. त्याच्या बरोबर वादविवाद करू नकोस. तो पंचवीस रुपये म्हणत असेल तर आपण त्याला समजावून सांगायचे, 'भाऊ, हे खरोखर दहा रुपयाचे काम आहे. परंतु मी वीस रुपये देत आहे. आपल्याला माहित आहे कि आपण फसवले जात आहोत, तरी थोडे फार कमी-जास्त पैसे देऊन निकाल करावा तेथे वादविवाद करून नये. नाहीतर तो खूप वैतागून जाईल. आधीच तो घरुन चिडून आलेला असणार आणि स्टेशनवर आपण त्याच्याशी कटकट केली तर तो वेड्या सांड सारखा आहे, लागलीच चाकू मारेल तुम्हाला. तेहतीस टक्कयाने माणूस झाला, बतीस टक्कयाने सांड होतो!
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा एखादा माणूस भांडायला आला, त्याचे शब्द बॉम्बगोळ्यासारखे येत असतील तेव्हा आपण समजायला पाहिजे कि संघर्ष टाळायचा आहे. आपल्या मनावर कुठलाही परिणाम नसेल तरी ही अचानक काही परिणाम होऊ लागला, तेव्हा आपल्या लक्षात येते कि समोरच्या व्यक्तिचा प्रभाव आपल्यावर होत आहे, अशा वेळेला आपण थोडे बाजूला व्हावे. हे सर्व संघर्ष आहे. हे जसे जसे तुम्हाला कळत जाईल तसे तसे तुम्ही हे संघर्ष टाळत जाल. संघर्ष टाळल्याने मोक्ष मिळतो!
हे सारे जग संघर्षाचे आहे, स्पंदन स्वरूपी आहे, म्हणून संघर्ष टाळा. संघर्ष, वादविवादाने हे जग निर्माण झाले आहे. भगवंताने त्याला वैरामुळे निर्माण झाले आहे असे म्हटले आहे. प्रत्येक माणूस, प्राणीमात्र वैर ठेवतो. जास्त प्रमाणात वाद वाढला असेल तर वैर ठेवल्याशिवाय राहत नाही. मग तो साप असो, विंचू असो, सांड असो किंवा पाडा असो. कोणीही असेल ते वैर ठेवतात. सगळ्यांच्यात आत्मा आहे. आत्मशक्ति सर्वांमध्ये सारखी आहे. कारण पुद्गलच्या कमजोरीमुळे सहन करावे लागत असते. पण सहन करण्याबरोबर वैर ठेवल्याशिवाय राहात नाही. आणि पुढच्या जन्मी ते परत वैराचा बदला घेतात!
एखादा माणूस खूप बोलतो तर त्याचा बोलण्याने आपल्याला संघर्ष व्हायला नको, हा धर्म आहे. हो, बोलणे तर कसेही असू शकते. त्याची बोलण्याची पद्धत कशी ही असली तरी आपण वाद, संघर्ष करावाच असे नियम आहे का? ही तर सकाळपर्यंत वादविवाद करणारी अशी माणस, पण आपल्यामुळे समोरच्याला वाईट वाटेल असे बोलणे हा फार मोठा गुन्हा
आहे उलट असे कोणी बोलत असेल तर त्यांना लागलीच थांबविले पाहिजे, त्याचेच नांव माणूस होय!
सहन करु नका, सोल्युशन शोधा प्रश्नकर्ता : दादा संघर्ष टाळावे असे जे आपण म्हणता, म्हणजे सहन करावे असाच अर्थ होतो ना?
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा
दादाश्री : संघर्ष टाळा याचा अर्थ सहन करणे नाही. सहन कराल तर ते किती कराल? सहन करणे आणि 'स्प्रिंग' दाबणे. हे दोन्ही सारखे आहे. 'स्प्रिंग' दाबून ठेवल्यावर ती किती दिवस राहिल? म्हणून सहन करायला तर शिकूच नका. उपाय करायला शिका. अज्ञानदशेत तर सहनच करावे लागते. पण मग एक दिवस स्प्रिंग उफाळली तर सर्व पाडून टाकते. हा तर निसर्गाचा असा नियमच आहे.
जगाचा असा कायदाच नाही कि, कोणामुळे आपणास सहन करावे लागते. दुसऱ्याच्या निमित्ताने जे काही सहन करावे लागते, तो आपलाच हिशोब असतो. परंतु ते आपल्याला कळत नाही कि, हा कोणत्या खात्यातला आणि कोणाचा माल आहे, त्यामुळे आपल्याला असे वाटते कि, तो हा नवाच माल देतो आहे. नवा माल कोणी देत च नाही. दिलेलाच परत देत आहे. आपल्याला हे समजत नाही, ज्ञानाने तपास करून घ्यावा कि समोरचा 'शुद्धात्मा' आहे. हे जे काही आले, ते माझ्याच कर्माच्या उदयामुळे आले आहे. समोरचा तर निमित्तमात्र आहे. त्यानंतर आपल्याला हे 'ज्ञान' स्वत:च पझल सॉल्व करुन देणार.
प्रश्नकर्ता : ह्याचा अर्थ असा झाला कि, मनाचे समाधान करून घ्यायचे कि, हा माल होता तो परत आला, असेच ना?
दादाश्री : तो स्वतः शुद्धात्मा आहे आणि ही त्याची प्रकृति आहे. प्रकृति हे फळ देते आहे. आपण शुद्धात्मा आहोत, तो पण शुद्धात्मा आहे. आता दोघेही समोरासमोर हिशोब पूर्ण करतात. त्यात ह्या प्रकृतिच्या कर्माचा उदयामुळे तो काही देत आहे. म्हणून आपण म्हणालो कि हा आपल्याच कर्माचा उदय आहे समोरचा निमित्त आहे, तो देऊन गेला म्हणजे आपला हिशोब पूर्ण झाला. असे उपाय केले, तर मग सहन करण्याचे राहिलेच नाही ना?
असा खुलासा नाही केला, तर सहन करीत राहिल्याने काय होईल?
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा एक दिवस ती स्प्रिंग उडेल. उडालेली स्प्रिंग तुम्ही पाहिली आहे का? माझी स्प्रिंग फारच उडत होती. बरेच दिवस मी खूप सहन करून घ्यायचो आणि एक दिवस ती स्प्रिंग उडाली, कि सारे उध्वस्त करून ठेवले. हे सारे अज्ञान अवस्थेतले, मला त्याची आठवण आहे. ते माझ्या लक्षात आहे. म्हणून तर मी सांगतो कि सहन करायला शिकू नका. हे अज्ञान दशेत सहन करावे लागते. आपल्याला येथे खुलासा करायला पाहिजे कि, ह्याचा परिणाम काय, ह्याचे कारण काय, सारे हिशोबवहीत व्यवस्थित पाहून घ्यावेत, कोणतीही वस्तु वहीच्या बाहेरची नसते.
संघर्ष, आपल्याच चुकीमुळे ह्या जगात कोणाशीही संघर्ष होतो ती तुमचीच चुक आहे, समोरच्याची चुक नाही. समोरचा तर धडकणार आहेच. 'तुम्ही का बरे धडकलात?' तर म्हणाल, 'समोरचा धडकला म्हणून.' म्हणजेच तुम्ही आंधळे व तो ही आंधळा झाला.
प्रश्नकर्ता : संघर्षात संघर्ष कराल तर काय होते?
दादाश्री : डोके फुटेल! तर संघर्ष झाला म्हणजे आपण काय समजावे?
प्रश्नकर्ता : आपलीच चुक आहे.
दादाश्री : हो, आणि त्याला लगेच स्वीकार करून घ्यावे. वाद झाला कि आपण समजावे कि 'असे कसे मी बोलून गेलो कि त्यामुळे हा वाद झाला!' स्वतःची चुक समजली, कि समाधान होईल. नंतर पझल सॉल्व होईल. नाहीतर आपण जो पर्यंत ती 'समोरच्याची चुक आहे' असे शोधत राहिलो तर ही पझल सॉल्व होणारच नाही. 'आपली चुक आहे' हे आपण स्वीकारु तेव्हाच ह्या जगातून सुटका होईल, दुसरा कुठलाच उपाय नाही. इतर सर्व उपाय गुंतवणारे आहे आणि उपाय करणे हा आपल्यातील एक लपलेला अहंकार आहे. उपाय कशासाठी शोधता? समोरच्याने
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा आपली चुक काढली तर आपण असे सांगावे कि 'मी तर पहिल्यापासून वाकडा आहे.'
बुद्धिमुळे संसारात भांडणं होत असतात. अरे बायकोचे ऐकून वागाल तर पतन होईल आणि त्यामुळे वादविवाद होतील, ही तर बुद्धिबाई! तिचे ऐकाल तर कुठल्या कुठे फेकले जाल, रात्री दोन वाजता उठून ह्यांची बुद्धिबाई काही उलटच दाखवते. बायको तर काही कालासाठी भेटते, परंतु बुद्धि तर निरंतर बरोबरच असते. ही बुद्धि तर डिथ्रोन करणारी (पाडून टाकनारी) आहे.
जर तुम्हाला मोक्षाला जायचे असेल तर बुद्धिचे जरा सुद्धा ऐकू नका. बुद्धि ही तर अशी आहे कि ती ज्ञानी पुरुषांचे सुद्धा उलट दाखवते. अरे, ज्यांच्यामुळे मोक्ष प्राप्ति होऊ शकेल, त्यांचीच चुक पाहतोस? अशाने तर मोक्ष तुमच्यापासून अनंत अवतार लांबला जाईल.
संघर्ष हीच आपली अज्ञानता आहे. कुणाही बरोबर वादविवाद झाला तर ती आपल्या अज्ञानतेची निशाणी! खरे-खोटे परमेश्वर पहात नाही. परमेश्वर तर हेच पहात असतो कि, 'तो कसेही बोलला पण वादविवाद तर झाला नाही ना?' तेव्हा म्हणे, 'नाही.' 'बस, आम्हाला एवढेच पाहिजे.' अर्थात् परमेश्वरा जवळ खरे-खोटे काही नसते. हे सारे लोकां जवळ असते. परमेश्वरा जवळ द्वंद्व नसतो ना!
आपटतात, त्या सगळ्या भिंती भिंतीशी टक्कर झाली तर ती भिंतीची चुक कि आपली? भिंतीजवळ आपण न्याय मागतो का? भिंतीला आपण सांगतो का, कि तू येथून बाजूला बाजूला हो! आणि जर आपण म्हणाले कि 'मी येथूनच जाणार आहे?' तर कोणाचे डोके फुटेल?
प्रश्नकर्ता : आपले.
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
१०
संघर्ष टाळा दादाश्री : तर मग कोणी सावध राहिले पाहिजे ? त्यात भिंतीला काय? ह्यात दोष कोणाचा? ज्याला लागले त्याचा दोष. अर्थात् भिंतीसारखे जग आहे.
भिंतीशी टक्कर झाली तर भिंतीबरोबर मतभेद होऊ शकतील का? कधीतरी भिंती किंवा दरवाजा वर तुम्ही आपटलात तर त्यावेळेस दरवाज्याशी किंवा भिंतीशी मतभेद होईल का?
प्रश्नकर्ता : तो दरवाजा तर निर्जीव आहे, ना?
दादाश्री : म्हणजे ज्याच्यात जीव आहे तेच माझ्याशी आपटतात असे तुम्हाला वाटते, ह्या जगात जे आपटतात त्या सर्व वस्तु निर्जीव च असतात. जे आपटतात ते जिवंत नसतात, सजीवास टक्कर होत नाही, निर्जीव वस्तु आपटते. म्हणून तुम्ही भिंतीसारखेच समजून घ्यायचे म्हणजे डखा (दखल) नाही करायचा. आणि मग थोड्या वेळेनंतर म्हणायचे 'चला, चहा पियुया.'
आता एक मुलगा दगड मारतो आणि रक्त निघते. तेव्हा त्या मुलाला काय कराल? रागवाल. परंतु तुम्ही जात असताना डोंगरावरुन एक दगड पडला तो लागला आणि रक्त निघाले तर तुम्ही काय कराल? रागवाल? नाही. तर ह्याचे काय कारण? तो दगड तर डोंगरावरुन पडला आहे म्हणून ! त्या मुलाला तर पश्चाताप ही होत असेल नंतर, कि हे माझ्या हाताने असे कसे झाले?
म्हणून ह्या जगाला समजा. माझ्याकडे आलात तर चिंता होणार नाही असे करून देईन. आणि संसारात चांगल्या रीतीने रहा आणि पत्नी बरोबर अगदी आरामात फिरायला जा! मुला-मुलींची लग्न अगदी निवांतपणे करा. तेव्हा मग तुमची पत्नी खुश होऊन जाईल. ती म्हणेल किती शहाणे बनवून टाकले माझ्या नवऱ्याला.
आता पत्नीचे, शेजारच्या बाई बरोबर भांडण झाले असेल आणि ती
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा
११
खूप संतापली असेल आणि आपण त्याच वेळेला बाहेरुन घरी आलो आणि ती त्या रागाच्या भरात बोलली तर आपण काय करायला पाहिजे? आपण सुद्धा चिडून जायला पाहिजे का? अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा आपण अॅडजेस्ट होऊन वागायला पाहिजे. ती आज का चीडली आहे ? आज ती कुठल्या परिस्थितीमुळे संतापली आहे कोणा बरोबर भांडली आहे. हे आपल्याला कसे समजणार? आपण पुरुष आहोत, मतभेद नाही पडू घ्यायचे. मतभेद झाले तर लगेच त्याचे समाधान करून टाकावे. मतभेद म्हणजेच संघर्ष.
सायन्स, समजण्यासारखे
प्रश्नकर्ता : आपल्याला भांडायचे नसेल परंतु एखादी व्यक्ति समोर येऊन भांडायला लागली तर काय करावे?
दादाश्री : जर ह्या भिंती बरोबर भांडलात तर कितीवेळ भांडू शकता? ह्या भिंती बरोबर एक दिवशी डोकं आपटले, तर आपण त्याच्या बरोबर काय करावे? डोकं आपटले म्हणजे भिंती बरोबर भांडण झाले म्हणून आपण भिंती बरोबर मारामारी करावी का? त्याच प्रमाणे जे खूप क्लेश देतात त्या सर्व भिंती आहेत ! ह्यात आपण समोरच्यात काय बघायचे? आपण स्वत:च समजून घ्यावयाचे कि ते भिंतीसारखेच आहेत. मग काहीच प्रश्न उरत नाही.
प्रश्नकर्ता : आपण जर मौन पाळले तर समोरच्या व्यक्तिला उलट वाटेल हा बोलत नाही, म्हणजे ह्याचाच दोष आहे असे समजून तो जास्त क्लेश करतो.
दादाश्री : हे तर आपण समजून घेतले कि मी मौन राहिलो, त्यामुळे असे झाले, परंतु रात्री एखादा माणूस उठला व बाथरुममध्ये जाताना अंधारात भिंतीवर तो आपटला तर तेथे आपण मौन राहिलो म्हणून का भिंत आपटली?
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा मौन रहा किंवा बोला त्याला काही फरक पडत नाही, काहीच संबंध नाही. आपण मौन पाळल्याने समोरच्या व्यक्तिवर परिणाम होतो असे काही नाही, किंवा आपल्या बोलण्याने परिणाम होतो असे ही नाही. ऑन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स (मात्र वैज्ञानिक संयोगिक पुरावा म्हणजे 'व्यवस्थित शक्ति') आहे. कोणाजवळ सत्ताच नाही, थोडी पण सत्ता नाही असे हे जग, ह्यात कोण काय करणार आहे? जर ह्या भिंतीला सत्ता असेल तर त्याला पण सत्ता आहे! ह्या भिंतीला, आपल्याला ओरडण्याची सत्ता आहे? तसेच त्या समोरच्या व्यक्तिचे पण आहे. आणि त्याच्या निमित्ताने जे संघर्ष आहे, ते तर सोडणार नाही. तर मग विनाकारण आरडाओरड करण्यात काय अर्थ? त्याच्या हातात सत्ताच नाही! त्यामुळे तुम्ही भिंतीसारखे होवून जा ना! तुम्ही बायकोला सारखे दटवत राहिलात तर तिच्यात पण परमेश्वर बसलेला आहे तो नोंद करेल कि हा मला दटवट आहे. आणि तिने जर तुम्हाला दटवले तेव्हा तुम्ही त्या भिंतीसारखे होऊन जा, तर तुमच्यात असलेला परमेश्वर तो तुम्हाला मदत करेल.
म्हणजे जर आपली चुक असेल तरच भिंत आपटते. त्यात त्या भिंतीची चक नाही. तेव्हा लोक मला म्हणतात ही सारी माणसे काही भिंती आहेत? तेव्हा मी म्हणतो 'हो, लोक पण भिंती च आहेत.' हे मी पाहून बोलत आहे, ह्या काही गप्पा नाही.
एखाद्या बरोबर मतभेद होणे आणि भिंतीला आपटणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत ह्या दोन्हीत फरक नाही. हा भिंतीला आदळतो ते त्याला न दिसण्यामुळे. आणि मतभेद होतो ते सुद्धा न दिसल्यामुळे च होतो, पुढचे त्याला दिसत नाही. पुढील उपाय त्याला दिसत नाहीत त्यामुळे मतभेद निर्माण होतात. हे क्रोध-मान-माया-लोभ जे करतात ते न दिसल्यानेच सारे करतात! तर अशी ही गोष्ट समजायला पाहिजे ना. ज्याला लागले त्याचा दोष, भिंतीचा त्यात काय दोष? असे ह्या जगात सर्व भिंतीच आहेत. भिंतीला आदळले तेव्हा आपण तिच्याशी खरे-खोटे करायला जात नाही
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा ना? कि 'हे माझे खरे आहे' असे ठरवायला आपण वादविवाद करत नाही ना? असे हे सारे भिंतीसारखेच आहे. त्यांचाशी खरे-खोटे करण्याची आवश्यकता नाही.
जे आदळतात त्या भिंती च आहेत, असे आपण समजून घेणे, मग दरवाजा कुठे आहे ह्याचा तपास करायचा, तर अंधारात ही दरवाजा सापडेल. असे हात चाचपडत चाचपडत गेलात तर दार सापडेल कि नाही सापडणार? आणि मग तेथून आपण बाहेर निघून जावे. संघर्ष करू नये हा नियम पाळला पाहिजे. अर्थात् कोणाच्या वादविवादात आपण पडायचे नाही.
असे जीवन जगा बाकी, हे असे जीवन जगताच येत नाही. लग्न करता येत नव्हते ते महा मुश्किलीनी लग्न केले! बाप होता येत नव्हते तरी पण बाप झाला. आतातरी मुले खुश होतील असे जीवन जगायला पाहिजे. सकाळी सगळ्यांनी नक्की करायला पाहिजे कि, 'भाऊ, आज कोणाशीही संघर्ष करू नये, असा आपण विचार करावा.' संघर्षामुळे काही फायदा होत असेल तर तसे मला दाखवा. काय फायदा होतो?
प्रश्नकर्ता : दुःख होते.
दादाश्री : दुःख होते एवढेच नाही, तर ह्या वादविवादामुळे आता तर दुःख होते च पण त्यामुळे संपूर्ण दिवस ही बिघडतो. आणि पुढील जन्मात मनुष्यपण रहात नाही, मनुष्यपण कधी रहाते, जेव्हा सज्जनता असेल तेव्हाच मनुष्यपण रहाते. परंतु पशुता असेल तर पुन्हा ठोसे मारीत राहिल, शिंग मारत राहिल तर मग पुन्हा तेथे मनुष्यपण येईल का? गाई-म्हशी शिंग मारतात कि माणूस मारतो?
प्रश्नकर्ता : माणूस जास्त मारतो. दादाश्री : जर माणूस मारतो तर त्याला जनावराची गती मिळेल.
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
१४
संघर्ष टाळा अर्थात् तेथे दोन पायाऐवजी चार पाय मिळेल आणि शेपूट जास्तीचे? तेथे काही असे तसे आहे? तेथे काय दुःख नाही? भयंकर दु:ख आहे. जरा समजून घ्यायला हवे, असे कसे चालेल?
संघर्ष, वादविवाद ही अज्ञानताच आपली प्रश्नकर्ता : जीवनात स्वभाव जुळून येत नाही त्यामुळे भांडणं (संघर्ष) होतात ना?
दादाश्री : संघर्ष होते त्याचेच नांव संसार. प्रश्नकर्ता : संघर्ष होण्याचे कारण काय?
दादाश्री : अज्ञानता. जो पर्यंत कोणा ही बरोबर मतभेद होतात, ते तुमची निर्बलताची निशाणी आहे. लोक खोटे नाहीत. मतभेदमध्ये चुक तुमचीच आहे. लोकांची चुक नसतेच तो जाणून-बूजुन करीत असेल तर आपण तिथे माफी मागून घ्यावी कि 'भाऊ मला हे कळत नाही.' तसे लोकं चूका करतच नाही, लोकं मतभेद करतील असे नाहीच. जेथे संघर्ष होते तेथे आपलीच चुक आहे.
प्रश्नकर्ता : संघर्ष टाळायचा असेल आणि जर मध्येच खांब आला असेल तर आपण बाजूला सरकून जावे. परंतु तो खांबच आपल्यावर पडला तर आपण काय करायचे?
दादाश्री : पडला तर आपण सरकून जायचे.
प्रश्नकर्ता : आपण किती ही बाजूला झालो तरी तो खांब आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ माझी पत्नी संघर्ष करते.
दादाश्री : संघर्ष होतो त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे ते शोधून काढायचे.
प्रश्नकर्ता : समोरची व्यक्ति आपला अपमान करेल आणि आपल्याला
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा
१५
तो आपला अपमान झाला असे वाटेल, त्याचे कारण आपला अहंकार आहे का?
दादाश्री : खरे पहाता समोरचा आपला अपमान करीत आहे, तो आपला अहंकार वितळून टाकतो, आणि ते ही नाटकीय अहंकाराला. जेवढा एक्सेस (अधिक) अहंकार असेल त्याला वितळून टाकतो. ह्यात आपले काय बिघडून जाणार आहे? ही आपली कर्म काही सुटू देत नाही. आपण तर लहान मूल पण समोर असेल तरी त्याला सांगावे कि आमची सुटका कर !
समावून घ्या सर्व, समुद्र सम पोटात
प्रश्नकर्ता : दादा, व्यवहारात व्यू पोईन्ट (दृष्टिकोण) वेगळा असल्यामुळे मोठा लहानांची चुक काढतो, लहान त्याच्यापेक्षा ही लहानांची चुक काढतो, असे का?
दादाश्री : हे तर असे आहे कि मोठा लहानांना खाऊन टाकतो, तो मोठा लहानांची चुक काढतो. त्यापेक्षा आपणच म्हणावे माझीच चुक आहे. चुक जर आपण मान्य केली तर त्याचे निवारण होते. आम्ही काय करतो? दुसरा जर सहन करू शकत नसेल, तर आम्ही ती चुक स्वीकारुन घेतो, दुसऱ्यांच्या चूका काढत नाही. आपण का दुसऱ्याला दोष द्यावा? आपल्या जवळ तर सागराएवढे पोट आहे ! पहा ना, ह्या संपूर्ण मुंबईतील साऱ्या गटारीचे पाणी सागर समावून घेतो ना? त्याचप्रमाणे आपणही पिऊन टाकावे ( समाऊन घ्यावे). त्यामुळे काय होईल कि, ह्या मुलांवर आणि सर्व लोकांवर त्याचा प्रभाव पडेल. ते ही शिकतील. मुले सुद्धा समजून जातील कि ह्यांचे सागरा इतके पोट आहे ! जितके येईल तेवढे जमा करून घ्या. व्यवहारात एक नियम आहे कि, अपमान करणारा आपली शक्ति देऊन जातो. म्हणून अपमान हसत मुखाने स्वीकारावे !
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
१६
संघर्ष टाळा
'न्यायस्वरूप', तेथे उपाय तप !
प्रश्नकर्ता : संघर्ष टाळण्याची, 'समभावे निकाल' करण्याची आपली वृत्ति असेल तरीपण समोरील व्यक्ति आपल्याला त्रास देईल, अपमान करेल, तर आपण काय करायचे?
दादाश्री : काहीच नाही. तो आपला हिशोब आहे, आणि आपण त्याचा ‘समभावानी निकाल' करायचा आहे असेच नक्की करायचे. आपण आपल्याच कायद्यात रहायचे आणि आपले पझल सॉल्व करीत रहायचे. प्रश्नकर्ता : हे संघर्ष होतात ते 'व्यवस्थित शक्तिच्या' आधाराने असेल ना?
दादाश्री : हो. संघर्ष आहे तो 'व्यवस्थित शक्ति'च्या आधाराने आहे, हे खरे, परंतु तसे केव्हा म्हणता येईल ? संघर्ष होऊन गेल्यानंतर 'आपल्याला तर वादविवाद करायचा नाही' असा आपला निश्चय असावा. समोर खांब दिसला म्हणजे आपण समजतो कि पुढे खांब आहे, फिरुन जावे लागेल, आपटायचे तर नाहीच. पण तरीसुद्धा आपटलो गेलो तर आपण म्हणायचे ‘व्यवस्थित आहे' पहिल्यापासूनच 'व्यवस्थित आहे' असे समजून पुढे चालू लागलो तर त्या ‘व्यवस्थित'चा ज्ञानाच्या दुरुपयोग झाला असे म्हणावे लागेल. घर्षणाने शक्ति कमी होते
सर्व आत्मशक्ति जर कधी संपत असेल तर ती संघर्षाने, संघर्षाने सहज पण आपटलो तरी खलास ! समोरचा आपटला तरी पण आपण संयमपूर्वक राहिले पाहिजे ! संघर्ष तर व्हायलाच नको. मग हा देह जायचा असेल तर जाऊ द्या, परंतु कुठल्या ही परिस्थितीत संघर्ष व्हायला नकोच. जर केवळ संघर्ष नसेल तर मनुष्य मोक्षाला जाईल. जर कुणी शिकला असेल कि मला संघर्षात पडायचेच नाही. तर मग अशा माणसाला गुरुची किंवा कोणाच्याही कृपेची आवश्यकता नाही, एक-दोन अवतारातच तो सरळ मोक्षाला जाईल. 'घर्षणात यायचेच नाही' अशी जर श्रद्धा त्याच्यात
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा
१७ निर्माण झाली आणि त्याने तसे नक्कीच केले, तर तेव्हा पासूनच तो समकित झाला! (समकित-शुद्धात्माचा लक्ष असलेली, सम्यक् दृष्टि) अर्थात् जर कोणाला समकित करायचे असेल तर आम्ही गॅरंटी देतो कि, घर्षण करायचे नाही असे नक्की करा म्हणजे समकित होईल! देहाचा संघर्ष झाला आणि घाव लागले, तर मलमपट्टी केल्याने बरे होऊन जाईल. परंतु घर्षण आणि संघर्षणाने जे मनात डाग पडलेले असतील, बुद्धिचे डाग पडले असतील तर त्याला कोण काढणार? हजार अवतार घेऊन सुद्धा हे डाग जाणार नाहीत.
प्रश्नकर्ता : घर्षण आणि संघर्षाने मन-बुद्धि वर घाव पडतात का?
दादाश्री : अरे! मनावर, बुद्धिवरच नाही संपूर्ण अंत:करणावर घाव होत राहतात आणि त्याचा परिणाम शरीरावर पडतो! म्हणून घर्षणाने तर किती तरी अडचणी निर्माण होतात.
प्रश्नकर्ता : तुम्ही सांगता कि, घर्षणाने सर्व शक्ति संपून जाते. तर जागृतिमुळे शक्ति परत मिळविता येते का?
दादाश्री : शक्ति खेचण्याची (मिळवीण्याची) आवश्यकता नाही, शक्ति तर आहेच. आता उत्पन्न होते. पूर्वी जे संघर्ष झाले होते आणि जी खोट गेली होती, तीच परत येते. पण जर आपण आता नवीन संघर्ष ऊभे केले तर परत शक्ति निघून जाते, आलेली शक्ति पण जाते आणि आपण संघर्ष होऊ दिले नाही तर शक्ति उत्पन्न होत राहते!
ह्या जगात वैराने सुद्धा संघर्ष होते. संसाराचे मूळ बीज, वैर आहे ज्याचे वैर आणि संघर्ष बंद झाले त्याचा मोक्ष झाला! प्रेम नडत नाही, वैर संपला तर प्रेम उत्पन्न होते.
कॉमनसेन्स, एवरीव्हेर एप्लिकेबल व्यवहार स्वच्छ होण्यासाठी काय हवे? 'कॉमनसेन्स' पूर्णपणे (संपूर्ण
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
१८
संघर्ष टाळा व्यवहारिक समज) पाहिजे. स्थिरता-गंभीरपणा असायला पाहिजे. व्यवहारात कॉमनसेन्सची जरूरी आहे. 'कॉमनसेन्स' म्हणजे 'एवरीव्हेर एप्लिकेबल' (सर्वत्र उपयोगी). स्वरूपज्ञाना बरोबर 'कॉमनसेन्स' असेल तर खूपच उजळेल, उत्तम.
प्रश्नकर्ता : 'कॉमनसेन्स' कसा प्रगट होतो?
दादाश्री : कोणी आपल्याशी संघर्ष केला तरी आपण कोणाशी पण संघर्षात पडू नये. अशा रीतिने राहिलो तर कॉमनसेन्स निर्माण होतो. परंतु स्वतः कोणा ही बरोबर संघर्ष करायला नको, नाही तर कॉमनसेन्स निघून जाईल. आपल्याकडून संघर्ष व्हायला नको.
समोरच्या माणसाच्या संघर्षाने 'कॉमनसेन्स' निर्माण होतो. ह्या आत्माची शक्ति अशी आहे कि, संघर्षाच्या वेळेला कसे वागावे ह्याचा सर्व उपाय दाखवून देते, आणि एकदा दाखविल्यानंतर ते ज्ञान जात नाही. असे करता करता 'कॉमनसेन्स' जमा होतो. मला खास संघर्ष होणार नाही. कारण कि मला 'कॉमनसेन्स' जबरदस्त, म्हणजे तुम्ही काय सांगू इच्छिता हे लागलीच लक्षात येते. लोकांना असे वाटले कि, हे दादांचे अहित करून राहिले आहेत, परंतु मला लगेच कळून जाते कि हे अहित, अहित नाही. सांसारिक अहित नाही आणि धार्मिक अहित पण नाही आणि आत्मासंबंधात अहित नाहीच. लोकांना असे वाटेल कि, आत्माचे अहित करून राहिले आहेत, परंतु आम्हाला त्यात हित दिसते. एवढा ह्या 'कॉमनसेन्स'चा प्रभाव. म्हणून आम्ही 'कॉमनसेन्स'चा अर्थ लिहीला आहे कि, 'एवरीव्हेर एप्लिकेबल' सध्याच्या पिढीत 'कॉमनसेन्स' सारखी वस्तुच नाही. जनरेशन टू जनरेशन (पिढी दर पिढी) 'कॉमनसेन्स' कमी होत आहे.
आपले (आत्म) विज्ञान मिळाल्यानंतर माणूस असा राहू शकतो. किंवा सामान्य जनतेत एखादा माणूस अशा रीतिने राहू शकतो, असे पुण्यवान लोक असतात! पण ते तर अमूक ठिकाणीच राहू शकतात. प्रत्येक ठिकाणी ते राहू शकत नाही!
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा
प्रश्नकर्ता : सर्व घर्षणांचे कारण तेच आहे ना कि एका 'लेयर' (पातळी)हून दुसऱ्या 'लेयर'चे अंतर खूप जास्त आहे?
दादाश्री : घषर्ण ही एक प्रगति आहे ! जेवढी डोकेफोडी होईल, घर्षण होईल तेवढा ऊंच चढण्याचा रस्ता मिळेल. घर्षण नाही झाले तर तिथल्या तिथेच राहणार. लोक घर्षण शोधत असतात.
घर्षणाने प्रगतिच्या पंथावर... प्रश्नकर्ता : घर्षण प्रगतिसाठी आहे असे समजून, तसे शोधले तर प्रगति होईल?
दादाश्री : पण ते समजून आपण शोधत नाही! देव काही ऊंच घेऊन जात नाही, घर्षणच ऊंच घेऊन जाते. घर्षण काही हद्दी पर्यत ऊंच घेऊन जाऊ शकते. मग ज्ञानी भेटले तर च काम होईल. घर्षण तर नैसर्गिक रीतीने होते, नदीत जसा दगड सर्वबाजूने घासून घासून गोल होतो तसा.
प्रश्नकर्ता : घर्षण आणि संघर्षण यात फरक काय?
दादाश्री : जीव नसेल ते सर्वच आदळतात, त्याला घर्षण म्हणतात आणि ज्यांच्यात जीव आहे ते आदळतात तेव्हा संघर्ष होतो.
प्रश्नकर्ता : संघर्षाने आत्मशक्ति कमी होते ना?
दादाश्री : हो, खरी गोष्ट आहे. संघर्ष झाला तर हरकत नाही पण 'संघर्ष आपल्याला करायचा आहे', असा भाव काढून टाकायचा असे मी सांगत आहे. 'आपला' संघर्ष करण्याचा भाव नसेल, मग भले 'चंदुलाल' (वाचकांनी येथे स्वत:चे नांव समजणे) संघर्ष करे. आपले भाव अडथळे आणतील असे नसावे.
घर्षण करविते, प्रकृति प्रश्नकर्ता : घर्षण कोण करवितो? जड का चेतन?
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
२०
संघर्ष टाळा दादाश्री : पूर्वीचे घर्षणच घर्षण करवित आहे। जड किंवा चेतन ह्यांचा त्यात प्रश्नच नाही. आत्मा ह्यात हात घालत च नाही. हे सारे घर्षण पुद्गलच (शरीरात असलेला आत्मा शिवायचा भाग जे पूरण होत असतो आणि गलन होत असतो जसे कि मन-बुद्धि-चित्त-अहंकार, कषाय इत्यादि सर्व) करवित आहे. पण जे पूर्वीचे घर्षण आहे ते परत घर्षण करवित आहे. ज्यांचे पूर्वीचे घर्षण संपून गेले त्यांचे पुन्हा घर्षण होत नाही. नाहीतर घर्षणामुळे पुन्हा घर्षण, आणि त्याच्यावर पुन्हा घर्षण असे वाढतच जाईल.
पुद्गल म्हणजे काय ते पूर्णतः जड नाही ते मिश्रचेतन आहे. ह्याला विभाविक पुद्गल म्हटले आहे. विभाविक म्हणजे विशेषभावाने परिणाम पावलेले पुद्गल, ते सारे करवित आहे! जे शुद्ध पुद्गल आहे, ते पुद्गल असे तसे नाही करत. हे पुद्गल तर मिश्रचेतन झालेले आहे. आत्माचा विशेषभाव आणि त्याचा (पुद्गलचा) विशेषभाव, दोन्ही एकत्र होऊन तिसरे रुप झाले, प्रकृतिस्वरूप झाले. ते सारे घर्षण करविते!
प्रश्नकर्ता : घर्षण नाही होत, हा खरा अहिंसकभाव उत्पन्न झाला असे म्हणता येईल?
दादाश्री : नाही तसे काही नाही! पण हे दादांकडून समजले कि, ह्या भिंती बरोबर घर्षण केल्याने एवढा फायदा (!), तर परमेश्वर बरोबर घर्षण करण्यात केवढा फायदा? एवढे जोखीम कळल्याने च आपले परिवर्तन होत राहते.
अहिंसा तर पूर्णपणे समजेल असे नाही आणि पूर्णपणे समजणे खूप कठीण आहे. त्याच्यापेक्षा एवढे जर पकडले असेल कि 'घर्षणात कधीच पडू नये.' त्यामुळे मग काय होते कि शक्ति अनामत रहाते आणि दिवसें दिवस शक्ति वाढत च जाते. मग घर्षणाने होणारे नुकसान होणार नाही! कधी घर्षण होवून गेले तर घर्षणानंतर आपण प्रतिक्रमण केले तर ते नाहीसे होते. म्हणजे इतके समजायला हवे कि ह्या पुढे घर्षण झाले तर प्रतिक्रमण
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
२१
संघर्ष टाळा
करायला हवे. नाहीतर खूप जबाबदारी आहे. या ज्ञानानी मोक्षाला तर जाल, परंतु घर्षणाने मोक्षाला जातानां खूप अडचणी येतात आणि उशीर होतो.
ह्या भिंतीसाठी उल्टे विचार आले तर हरकत नाही, कारण ते एकपक्षी नुकसान आहे. परंतु जिवंत लोकांसाठी एक पण वाकडा विचार आला तर जबाबदारी आहे. दोन्हीपक्षी नुकसान होणार. परंतु आपण त्यानंतर प्रतिक्रमण केले तर सर्वच दोष नाहीसे होतात. म्हणून जिथे जिथे घर्षण होत आहे तिथे नंतर प्रतिक्रमण करा म्हणजे घर्षण संपून जाईल.
समाधान सम्यक् ज्ञानानेच
प्रश्नकर्ता : दादा, ही अहंकाराची गोष्ट घरात बऱ्याच वेळा लागू पडते, संस्थेत लागू पडते, दादाचे काम करीत असताना ही अहंकारामुळे संघर्ष होत असतो तिथे ही लागू पडते. तिथे सुद्धा समाधान पाहिजे ना?
दादाश्री : हो समाधान पाहिजे ना ! तो आपल्या इथे ज्ञान घेतलेला समाधान करेल, पण ज्ञान नाही तिथे काय समाधान घेईल? तेथे मग वेगळा होत जाईल, त्याच्या बरोबर मन वेगळे होत जाते. आपल्या इथे वेगळे नाही पडणार !!!
प्रश्नकर्ता : पण दादा, संघर्ष करायला नको ना ?
दादाश्री : संघर्षण, हा तर स्वभाव आहे. असा माल (कर्म) भरून आणला आहे म्हणून असे होते. जर असा माल आपला नसता तर असे झाले नसते. त्यामुळे आपण समजून घ्यावे कि भाऊची तशी सवयच आहे. मग आपल्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. कारण कि, सवय, सवईवाल्याची (पूर्वसंचित संस्कारवाले जीव), आणि 'आपण' आपले (शुद्धात्मा) ! आणि मग त्याचा निकाल होऊन जातो. तुम्ही अडकून राहिलात तरच भानगड! बाकी, संघर्ष होणारच. संघर्ष होणार नाही असे घडतच नाही. त्या संघर्षामुळे आपण एकमेकांपासून वेगळे होणार नाही ह्याची दक्षता घ्यायची. संघर्ष तर अवश्य होतोच. तो तर पति-पत्नीमध्ये पण होतो, पण
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा तरी ते एकत्र राहतात ना पुन्हा? ते तर होत राहते. ह्यासाठी कोणावर कसला ही दबाव केलेला नाही कि तुम्ही संघर्षात पडू नका.
प्रश्नकर्ता : पण दादा, संघर्ष होऊ नये असा सतत भाव ठेवायला पाहिजे ना?
दादाश्री : हो, असायला पाहिजे. तेच करायचे ना! प्रतिक्रमण करायचे आणि त्यासाठी भाव ठेवायचा! परत तसे झाले तर परत प्रतिक्रमण करायचे. कारण कि (संचित कर्माचा) एक थर निघून जातो। मग दुसरा थर पण निघून जातो ना? असे थर आहेत ना! माझे जेव्हा जेव्हा संघर्ष होत होते, तेव्हा नोंद करत होतो, आज चांगले ज्ञान मिळाले! संघर्षामुळे अजागृति राहत नाही. जागृतिच जागृति राहते ना! ते आत्माचे व्हिटामिन आहे. त्यामुळे ह्या संघर्षात काहीच भानगड नाही. संघर्षा नंतर एकमेकाशी वेगळे व्हायचे नाही। हाच इथे पुरुषार्थ आहे. आपले मन समोरच्यासाठी वेगळे होत असेल तर प्रतिक्रमण करून सर्व सुरळीत करावे. आम्ही ह्या सर्वां बरोबर कशाप्रकारे मिळून-जुळून राहतो? तुमच्या बरोबर ही आमचे पटत आहे कि नाही पटत? असे आहे, शब्दाने संघर्ष ऊभा होतो. मला खूप बोलावे लागते, तरीसुद्धा संघर्ष होत नाही ना?
संघर्ष तर होणारच, जशी ही भांडी एकमेकांवर आदळतील कि नाही आदळणार? पुद्गलचा स्वभाव आहे संघर्ष करणे ते. पण माल भरलेला असेल तर. भरलेला नसेल तर नाही. पूर्वी आमचा पण संघर्ष होत होता। पण ज्ञान झाल्यानंतर संघर्ष झाला नाही. कारण कि, आमचे ज्ञान अनुभवज्ञान आहे. आणि आम्ही निकाल करून आलेलो आहोत, ह्या ज्ञानाने! सर्व निकाल करून करून आलो आहोत आणि तुम्हाला निकाल करायचे बाकी आहे.
दोष धुतले जातात, प्रतिक्रमणाने कोणाच्या ही बरोबर संघर्ष झाला म्हणजे मग दोष दिसायला लागतात आणि संघर्ष झालाच नाहीत, तर दोष झाकलेले रहातात. पाचशे,
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
२३
संघर्ष टाळा पाचशे दोष रोजचे दिसायला लागले, म्हणजे समजावे कि पूर्णाहुति जवळ येत आहे.
___ म्हणून जेथे असाल तेथून संघर्ष टाळा. संघर्ष करून ह्या लोकचा मनुष्य अवतार तर बिघडतोच परंतु परलोक सुद्धा बिघडतो! जे हे लोक बिघडवतात ते परलोक सुद्धा बिघडवल्या शिवाय राहणार नाही! हे लोक सुधारतील, त्याचा परलोक सुधरतो. ह्या जन्मी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही तर समजावे कि परलोकात सुद्धा अडचण येणार नाही आणि येथेच जर अडचणी ऊभी कराल तर सर्व अडचणी तेथे येणारच.
तीन अवताराची गॅरंटी संघर्ष, वादविवाद झाला नाही तर त्याचा तीन अवतारानंतर मोक्ष होईल. ह्याची मी गॅरंटी देतो. संघर्ष झाला तर प्रतिक्रमण करावे. संघर्ष पुद्गलचा आहे आणि पुद्गल, पुद्गलचा संघर्ष प्रतिक्रमणाने नाश पावतात.
तो भागाकार करत असेल तर आपण गुणाकार करावा, म्हणजे रक्कम उडून जाईल. समोरच्या व्यक्तिसाठी अशा विचार करावा कि, 'त्यानी मला असे म्हटले, तसे म्हटले.' हाच गुन्हा आहे. रस्त्याने जाताना भिंतीला आपण आपटलो तर आपण त्या भिंतीला का ओरडत नाही? झाडाला जड का म्हणतात? जे आपटतात ती सर्व हिरवी झाडेच आहेत! गाईचा पाय आपल्यावर पडला तर आपण काही म्हणतो का? तसेच ह्या सर्व लोकांचे आहे. ज्ञानी पुरुष सर्वांनाच कशाप्रकारे माफ करतात? ते समजतात कि, हे बिचारे समजत नाही, झाडासारखे आहेत. आणि ज्यांना समजते त्यांना सांगावे लागतच नाही, ते तर लागलीच प्रतिक्रमण करतात.
आसक्ति तेथे 'रिएक्शन'च प्रश्नकर्ता : परंतु पुष्कळ वेळा आपल्याला द्वेष करायचा नसेल तरी पण द्वेष होऊन जातो. ह्याचे कारण काय?
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
२४
संघर्ष टाळा दादाश्री : कोणा बरोबर? प्रश्नकर्ता : कधी नवऱ्या बरोबर असे घडले तर?
दादाश्री : त्याला द्वेष नाही म्हणता येणार. नेहमी जे आसाक्तिचे प्रेम असते, ते रिएक्शनरी आहे. जेव्हा चिडतात तेव्हा वाकडे चालतात. वाकडे चालतात तेव्हा मग थोडे दिवस वेगळे राहतात म्हणजे प्रेम चढतो. प्रेम वाढले कि पुन्हा भांडण होते, मग पुन्हा प्रेम वाढतो. जेव्हा, जेव्हा प्रेम अति प्रमाणात वाढतो तेव्हा भांडण होते. आणि जिथे कुठे पण दखलगिरी चालत रहाते ना, तिथे त्या लोकांत आतून प्रेम असते. हे प्रेम असेल तर च दखल होते. पूर्व जन्माचे प्रेम आहे, तर दखलगिरी होते. जास्त प्रमाणात प्रेम आहे. नाहीतर दखल होणारच नाही ना? हे दखलचेच स्वरूप आहे.
ह्याला लोक काय म्हणतात? 'संघर्षामुळे तर आमचे प्रेम उत्पन्न होते.' तेव्हा ही गोष्ट पण खरी आहे. ही आसक्ति, संघर्षामुळे झालेली आहे. जेथे वादविवाद कमी तेथे आसक्ति नसते. ज्या घरात स्त्री-पुरुषात संघर्ष कमी होतो तिथे आसक्ति कमी आहे असे समजावे. समजण्यासारखी गोष्ट आहे ना?
प्रश्नकर्ता : संसारव्यवहारात जो अहम् असतो त्यामुळे खूप ठिणग्या
पडतात.
दादाश्री : ती अहम्ची ठिणगी नाही पडत. दिसतात अहम्च्या ठिणग्या, पण विषयविकाराच्या आधीन होऊन असतात. विषयविकार नसेल तेव्हा असे होणार नाही. विषयविकार बंद झाला, नंतर हा इतिहास पण बंद होईल. म्हणजे ज्यांनी ब्रह्मचर्यव्रत घेतले आहे, वर्षभरासाठी, त्यांना मी विचारतो, तेव्हा ते म्हणतात, 'आता ठिणगी एकही नाही, कटकट नाही, खटपट नाही, काहीच नाही, स्टेन्ड स्टील (सर्व शांत)!' मला माहित आहे कि ब्रह्मचर्यव्रत घेतल्या नंतर असेच होत असते. म्हणून मुद्दाम विचारतो त्यांना.
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
संघर्ष टाळा
प्रश्नकर्ता : पूर्वी तर आम्ही असे समजत होतो कि ह्या घरातील कामकाजा बद्दल संघर्ष होत असेल, म्हणून कामात मदत करायला बसलो, पण तरी संघर्ष होतोच.
दादाश्री : हे सगळे वादविवाद होणारच. ही जो पर्यंत विकारी बाबत आहे, संबंध आहे, तोपर्यंत संघर्ष होणारच. संघर्षाचे मूळ विषयविकार हेच आहे. ज्याने विषयविकार जिंकला, त्याला कोणी हरवू शकणार नाही. कोणी त्याचे नांव पण घेणार नाही. त्याचा प्रभाव पडेल.
___ संघर्ष स्थूलपासून सूक्ष्मतमपर्यंत प्रश्नकर्ता : आपले वाक्य आहे कि, संघर्ष टाळा. त्या वाक्याचे आराधन करीत गेलात, तर थेट मोक्षाला पोहचाल. ह्यात स्थूल संघर्ष टाळा, मग हळूहळू पुढे जात जात सूक्ष्म संघर्ष, सूक्ष्मतर संघर्ष टाळा. ह्याची समज द्या.
दादाश्री : त्याला आतून सूझ पडत जाते, जसे जसे पुढे जाईल कि मग आपोआप, समजायला लागेल, कोणी शिकवायला नको. आपोआप येऊन जाते. हे सूत्र च असे आहे कि तो थेट मोक्षाला घेऊन जातो.
दुसरे, 'भोगतो त्याची चुक' हे पण मोक्षाला घेऊन जाईल. हा एक एक सूत्र मोक्षापर्यंत घेऊन जातो. त्याची गेरेन्टी आपली.
प्रश्नकर्ता : हे स्थूल संघर्षाचे उदाहरण दिले, त्यात सापाचे आणि खांबाचे उदाहरण सांगितले. नंतर सूक्ष्म, सूक्ष्मतर, सूक्ष्मतम त्याची उदाहरणे, सूक्ष्म संघर्ष कसा असतो हे सांगा.
दादाश्री : तुझ्या वडीलां बरोबर तुला जे होते, ते सर्व सूक्ष्म संघर्ष.
प्रश्नकर्ता : सूक्ष्म म्हणजे मानसिक? वाणीने होतात ते पण सूक्ष्ममध्ये जातात?
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
२६
संघर्ष टाळा दादाश्री : वाणीने होते ते स्थूलमध्ये जाते, पण जे त्यानां समजणार नाही, जे दिसणार नाही, ते सर्व सूक्ष्ममध्ये जाते.
प्रश्नकर्ता : हे सूक्ष्म संघर्ष टाळायचे कसे?
दादाश्री : आधी स्थूल, मग सूक्ष्म, मग सूक्ष्मतर आणि नंतर सूक्ष्मतम संघर्ष टाळायचे.
प्रश्नकर्ता : सूक्ष्मतर संघर्ष कोणाला म्हणतात?
दादाश्री : तू कोणाला मारत असेल, आणि तो ज्ञानदृष्टिने पाहणार कि 'मी शुद्धात्मा आहे, हा व्यवस्थित शक्तिच्या आधाराने मारत आहे.' असे समजेल. परंतु आतून थोडेसे तुझे दोष बघतो आहे, ते सूक्ष्मतर संघर्ष.
प्रश्नकर्ता : पुन्हा सांगा, समजले नाही बरोबर. दादाश्री : हे तू सर्व लोकांचे दोष पहातो ते सूक्ष्मतर संघर्ष. प्रश्नकर्ता : म्हणजे दुसऱ्यांचे दोष पहायचे, हे सूक्ष्मतर संघर्ष.
दादाश्री : असे नाही, आपण नक्की केले असेल कि हे दुसऱ्यां मध्ये दोष नाहीत आणि तरी दोष दिसतात हे सूक्ष्मतर संघर्ष. कारण कि तो आहे शुद्धात्मा आणि दोष वेगळा आहे.
प्रश्नकर्ता : तर त्यालाच मानसिक संघर्ष म्हणतात का? दादाश्री : ते मानसिक तर सर्व सूक्ष्ममध्ये गेले. प्रश्नकर्ता : तर ह्या दोघांच्यात काय फरक? दादाश्री : ह्या मनाच्या वरच्या गोष्टी आहेत.
प्रश्नकर्ता : म्हणजे हा सूक्ष्मतर संघर्ष आहे, त्या क्षणी सूक्ष्म संघर्ष पण बरोबर असतो ना?
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
२७
संघर्ष टाळा
दादाश्री : ते आपण पहायचे नाही. सूक्ष्म वेगळे असते आणि सूक्ष्मतर वेगळे असते. सूक्ष्मतम म्हणजे अगदी शेवटची गोष्ट.
प्रश्नकर्ता : एकदा सत्संगात अशी गोष्ट निघाली कि चंदुलाल बरोबर तन्मयाकार होणे हे सूक्ष्मतर संघर्ष म्हटले जाते.
दादाश्री : होय. सूक्ष्मतर संघर्ष! त्याला टाळावे. चूकून तन्मयाकार झाले, आणि मग लक्षात येते ना कि ही चुक होवून गेली?
प्रश्नकर्ता : तर तो संघर्ष टाळण्याचा उपाय फक्त प्रतिक्रमण हे एकच आहे, कि दुसरे काही आहे?
दादाश्री : दुसरे कोणते ही शस्त्र (साधन) नाही. ही आपली नऊ कलमे, ती पण प्रतिक्रमणच आहेत. दुसरे काही शस्त्र नाही. ह्या जगात प्रतिक्रमण शिवाय दुसरे कोणतेही साधन नाही. उत्कृष्टात उत्कृष्ट साधन प्रतिक्रमण. कारण कि, अतिक्रमणानी हे सारे जग ऊभे राहिले आहे.
प्रश्नकर्ता : हे तर सारेच खूपच विस्मयकारी आहे. एक एक वाक्य 'जे घडले तोच न्याय' 'भोगतो त्याची चुक' ही सगळी एक एक सूत्र आहेत, ती सगळी अद्भूत सूत्र आहेत आणि प्रतिक्रमण दादांच्या साक्षीने करतो म्हणून त्यांची स्पंदने पोहचतातच.
दादाश्री : हो, खरे आहे. स्पंदन लागलीच पोहचून जातात आणि त्याचे फळ मिळते. आपल्याला खात्री होते कि ह्याचा परिणाम झालेला दिसतो.
प्रश्नकर्ता : दादा, प्रतिक्रमण तर एवढ्या झपाट्याने होतात, अगदी त्याच क्षणी! हे तर आश्चर्यच आहे दादा!! ह्या दादांची कृपा अगाध आहे. दादाश्री : हो हे आश्चर्यच आहे, वस्तु सायन्टिफिक आहे.
- जय सच्चिदानंद
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
अडालज
अहमदाबाद :
राजकोट :
भुज
गोधरा
वडोदरा
मुंबई कोलकता
प्राप्तिस्थान दादा भगवान परिवार
त्रिमंदिर संकुल, सीमंधर सिटी, अहमदाबाद- कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि. - गांधीनगर, गुजरात - 382421. फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे उस्मानपुरा, अहमदाबाद- 380014. फोन : (079) 27540408 त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल), पोस्ट : मालियासण, जि. राजकोट. फोन : 9274111393
त्रिमंदिर, हिल गार्डन के पीछे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन के सामने, गोधरा (जि. - पंचमहाल ). फोन : (02672) 262300
दादा मंदिर, १७, मामा की पोल - मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन के सामने, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335
: 9323528901
: 033-32933885
: 9351408285
: 9893545351
: 9329523737
: 9431015601
: 9590979099
: 9422660497
Dada Bhagwan Vignan Institute:
100, SW Redbud Lane, Topeka, Kansas 66606 Tel.: +1 877-505-DADA (3232), Email : info@us.dadabhagwan.org
जयपुर
इन्दौर
रायपुर
पटना
बेंगलूर
पूना
U.S.A.:
:
:
:
दिल्ली
चेन्नई
भोपाल
जबलपुर
भिलाई
अमरावती
हैदराबाद
जलंधर
: 9810098564
: 9380159957
: 9425024405
: 9425160428
: 9827481336
: 9422915064
:9989877786
: 9814063043
: +971 557316937
U.K. : +44 330 111 DADA (3232) UAE Kenya : + 254 722722063 Singapore : +65 81129229
Australia: +61421127947
New Zealand:
+64 210376434
Website : www.dadabhagwan.org
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________ संघर्ष टाळा जसे आपण रस्त्यावरुन काळजीपूर्वक चालत असतो तरीही समोरच्या व्यक्तिने जर आपल्याला टक्कर मारली आणि नुकसान केले तर ती गोष्ट वेगळी. परंतु आपला हेतू कोणाचे नुकसान करण्याचा नसावा. जर आपण त्याचे नुकसान करायला गेलो तर त्यात आपलेच नुकसान होणार आहे. संघर्षात नेहमीच दोघांचेही नुकसान होते. तुम्ही समोरच्या व्यक्तिला दुःख दिले तर तुम्हालाही ऑन धी मोमेन्ट( त्याच क्षणी) तसेच दुःख झाल्याशिवाय राहाणारच नाही. हाच संघर्ष आहे. ___म्हणून मी हे उदाहरण दिले आहे की रस्त्यावरील वाहतूकीचा धर्म काय आहे की टक्कर मारली (आदळलात) तर तुम्ही मरुन जाल. टक्कर मारण्यात जोखिम आहे म्हणून कोणालाही टक्कर मारु नका. अशाच प्रकारे ह्या व्यवहारीक कार्यात सुद्धा संघर्ष करू नका. संघर्ष टाळा! - दादाश्री TTTTTTTTTTTE ISBN 978-81-99931365 Mast 9788189-933263 Printed in India dadabhagwan.org Price Rs10