Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान प्ररूपित
प्रतिक्रमण
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
प्रतिक्रमण
मूळ गुजराती संकलन : डॉ. नीरूबेन अमीन
अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक
भाव मूल्य
:
All Rights reserved - Deepakbhai Desai
Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India.
No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyright
:
प्रथम संस्करण द्वितिय संस्करण :
द्रव्य मूल्य
मुद्रक
अजीत सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, 'दादा दर्शन', 5, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे, उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८००१४, गुजरात फोन - (०७९) ३९८३०१००
:
प्रतियाँ १,००० प्रतियाँ २,०००
: 'परम विनय' और
'मैं कुछ भी जानता नहीं', यह भाव !
२० रुपये
दिसम्बर, २०१२ मई, २०१४
: अंबा ओफसेट
पार्श्वनाथ चैम्बर्स, नई रिज़र्व बैंक के पास,
उस्मानपुरा, अहमदाबाद - ३८० ०१४. फोन : (०७९) २७५४२९६४
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
વર્તમાનતીર્થંકર
શ્રીસીમંધરસ્વામી
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं
नमो आयरियाणं
नमो उवज्झायाणं
नमो लोए सव्वसाहूणं एसो पंच नमुक्कारो,
सव्व पावप्पणासणो
मंगलाणं च सव्वेसिं,
पढमं हवइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २
ॐ नमः शिवाय ३ जय सच्चिदानंद
દાદા ભગવાનના અસીમ જય જયકારસહી
3
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
( दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके )
मराठी १. भोगतो त्याची चूक
६. क्रोध २. एडजेस्ट एव्हरीव्हेअर
७. चिंता ३. जे घडले तोच न्याय
८. प्रतिक्रमण ४. संघर्ष टाळा
९. भावना सुधारे जन्मोजन्म ५. मी कोण आहे?
हिन्दी १. ज्ञानी पुरूष की पहचान
२३. दान २. सर्व दुःखों से मुक्ति
२४. मानव धर्म ३. कर्म का सिद्धांत
२५. सेवा-परोपकार आत्मबोध
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ५. मैं कौन हूँ?
२७. निजदोष दर्शन से... निर्दोष ६. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी २८. गुरु-शिष्य ७. भूगते उसी की भूल
२९. पति-पत्नी का दिव्य व्यवहार ८. एडजस्ट एवरीव्हेयर
३०. क्लेश रहित जीवन ९. टकराव टालिए
३१. अहिंसा १०. हुआ सो न्याय
३२. सत्य-असत्य के रहस्य ११. चिंता
३३. चमत्कार १२. क्रोध
३४. पाप-पुण्य १३. प्रतिक्रमण
३५. वाणी, व्यवहार में... १४. दादा भगवान कौन?
३६. कर्म का विज्ञान १५. पैसों का व्यवहार
३७. आप्तवाणी - १ १६. अंत:करण का स्वरूप
३८. आप्तवाणी - ३ १७. जगत कर्ता कौन ?
३९. आप्तवाणी - ४ १८. त्रिमंत्र
४०. आप्तवाणी - ५ १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ४१. आप्तवाणी - ६ २०. प्रेम
४२. आप्तवाणी - ७ २१. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य
४३. आप्तवाणी - ८ २२. माता-पिता और बच्चों का व्यवहार ४४. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (उत्तरार्ध)
दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि अंग्रेजीभाषे मध्ये सुद्धा बरीच पुस्तके प्रकाशित झाली आहे. वेबसाइट www.dadabhagwan.org वर सुद्धा आपण ही सगळी पुस्तके प्राप्त करू शकता. प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि अंग्रेजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे.
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनावर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मापासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य! एक तासात विश्वदर्शन लाभले! आपण कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व अध्यात्मिक प्रश्नांचा संपूर्ण उलगडा झाला. अशा प्रकारे निसर्गाने विश्वला प्रदान केले एक अद्वितीय, पूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरी ही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली त्याच प्रमाणे ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोग द्वारा. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हणतात. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढण्याचे ! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग ! शॉर्ट कट!!
ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबदलची फोड करून सांगताना म्हणायचे की, 'हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत । हे तर ए.एम. पटेल आहे. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले आहेत ते दादा भगवान आहेत। ते चौदलोकचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात बसलेले आहेत आणि 'इथे' संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! मी स्वतः परमेश्वर नाही। माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' त्यांना मी पण नमस्कार करतो.'
__व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा. ह्या सिद्धांताने ते संपूर्ण जीवन जगले. त्यांनी जीवनात कधीही कोणाकडून ही पैसे घेतले नाहीत, उलट स्वतःचा व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक
मी तर, काही लोकांनां माझ्या हातून सिद्धि प्राप्त करून देणार आहे. माझ्या नंतर कोणी तरी पाहिजे की नाही ! नंतर लोकांना मार्ग ( दाखविणारा) हवा की नाही?
- दादाश्री
परम पूज्य दादाश्रींना जे ज्ञान प्राप्त झाले, ते अद्भुत आत्मज्ञान, त्यांनी देश-विदेश परिभ्रमण करून, दुसऱ्या लोकांना सुद्धा दोन तासात प्राप्त करून दिले होते, त्याला ज्ञानविधि म्हणतात. दादाश्रींनी आपल्या जीवनकाळातच पूज्य डॉ. नीरूबहन अमीन (नीरूमा)ना आत्मज्ञान देण्याची ज्ञानसिद्धि प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलय पश्चात् नीरूमा आतापर्यंत मुमुक्षुजनांना सत्संग आणि आत्मज्ञानाची प्राप्ति, निमित्तभावाने करत होत्या. त्याच बरोबर पूज्य दीपकभाईनां ही दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धि प्रदान केली होती. पूज्य नीरूमांच्या उपस्थितीतच त्यांच्या आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कितीतरी ठिकाणी जाऊन मुमुक्षूंना आत्मज्ञान प्राप्ति करून देत होते, पूज्य नीरूमांच्या देहविलय पश्चात् आज पण चालू आहे.
जे
हे आत्मज्ञान प्राप्ति नंतर हजारो मुमुक्षु संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा मुक्त राहून आत्मरमणता चा अनुभव करत आहेत.
पुस्तकात लिहिलेली वाणी मोक्षार्थीला मार्ग दाखविण्याच्या हेतूने अत्यंत उपयोगी सिद्ध झाली आहे. परंतु मोक्ष प्राप्ति हेतू साठी आत्मज्ञान प्राप्त करणे जरुरी आहे. अक्रम मार्ग द्वारा आत्मज्ञानची प्राप्ति आज पण चालू आहे. त्यासाठी प्रत्यक्ष आत्मज्ञानीला भेटून आत्मज्ञानची प्राप्ति करेल तेव्हांच हे शक्य आहे. पेटलेला दिवाच दुसरा दिवा प्रज्वलित करू शकतो.
6
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
समर्पण
अतिक्रमण ची तांडे अनंत; कर्मांचा क्षणे क्षणे होत आहे बंधन ! मोक्ष तो कुठे, धर्म धरे मौन; पायवाट मार्गस्थ, चढवे कोण ? अक्रम विज्ञानी दादा तारणहार;
प्रतिक्रमणचे दिले हत्यार !
मोक्ष मार्गचा खरा साथीदार; ताज बनून शोभवे दादा दरबार ! 'प्रतिक्रमण' संक्षिप्तात क्रियाकार;
सोडवे बंधन मूल अहंकार ! प्रतिक्रमण विज्ञान अत्रे साकार; समर्पण विश्वला, मचाव जयजकार !
7
- डॉ. नीरुबेन अमीन
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन
आत्मज्ञानी श्री अंबालाल मुळजीभाई पटेल, ज्यांना सर्वजण ‘दादा भगवान'च्या नावांनी ओळखतात. त्यांच्या श्रीमुखातून आत्मतत्त्व साठी जी वाणी निघाली, ती रेकोर्ड करून संकलन व संपादन करून ग्रंथाच्या रुपात प्रकाशित करण्यात आली आहे. ह्या पुस्तकात परम पूज्य दादा भगवानांच्या स्वमुखा ने निघालेल्या सरस्वतीचा मराठी अनुवाद केला आहे. सुज्ञ वाचकाने अध्ययन केल्या वर त्याला आत्मसाक्षात्कारची भूमिका निश्चित होते, असे कित्येकांचे अनुभव आहे.
ते ‘दादा भगवान’ तर त्यांच्या देहात असलेले परमात्माला म्हणत होते. शरीर हे परमात्मा होवू शकत नाही. कारण शरीर विनाशी आहे. परमात्मा तर अविनाशी आहे आणि जे प्रत्येक जीवमात्रच्या आत आहे.
प्रस्तुत अनुवाद मध्ये विशेष लक्ष ठेवलेले आहे कि प्रत्येक वाचकाला प्रत्यक्ष दादांची वाणीच, ऐकत आहोत असा अनुभव व्हावा.
ज्ञानींच्या वाणीला मराठी भाषेत यथार्थ रुपाने अनुवादित करायचा प्रयत्न केला आहे. परंतु दादाश्रींच्या आत्मज्ञानचा खरा उद्देश 'जसा आहे तसा ' आपल्याला गुजराथी भाषेत अवगत होणार. ज्याला ज्ञानाचा गहन अर्थ समजायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी ह्या हेतूने गुजराती भाषा शिकावी, असा आमचा अनुरोध आहे.
अनुवाद संबंधी चूकांसाठी आपली क्षमा प्रार्थितो.
8
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय
हृदयापासून मोक्षमार्गी जाणाऱ्यांना, क्षणोक्षणी सतावणारे कषायांना (क्रोध-मान-माया-लोभ) अचूकपणे दूर करण्यासाठी व मोक्षमार्गावर प्रगति करण्यासाठी काही अचूक साधन तर पाहिजे की नाही पाहिजे? स्थूळतमपासून सूक्ष्मतम पर्यंतचे संघर्ष कसे टाळावे? आपल्याला किंवा आपल्याकडून अन्य व्यक्तिला दुःख झाले तर त्याचे निवारण काय? कषायांचा बॉम्बहल्ला धांबवण्यासाठी अथवा ते पुन्हा नाही व्हावेत त्यासाठी काय उपाय? इतके सारे धर्म केले, जप-तप, उपवास, ध्यान, योग केले, तरी सुद्धा मन-वचनकायाने होऊन जाणारे दोष का नाही थांबत ? अंतरशांति का मिळत नाही? कधी निजदोष दिसतात पण मग त्यांचे काय करायचे? त्यांना कशाप्रकारे काढायचे? मोक्षमार्गावर पुढे जाण्यास, तसेच संसारमार्गात सुद्धा सुख-शांति, मंद कषाय आणि प्रेमभावाने जगण्यासाठी काही ठोस साधन तर पाहिजे ना? वीतरागांनी धर्मसारमध्ये संसारला काय बोध दिले आहेत? खरे धर्मध्यान कोणते आहे? पापातून परत फिरायचे असेल तर त्याचा काही अचूक मार्ग आहे का? आहे तर का दिसत नाही?
धर्मशास्त्रात लिहीलेले बरेच काही वाचले जाते तरी सुद्धा ते जीवनामध्ये आचरणात का येत नाही? साधु-संत, आचार्य, कथाकार एवढे उपदेश देत असतात तरी सुद्धा उपदेश फळस्वरुप येण्यास काय कमी आहे ? ! प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक साधु-संतांच्या संघटनांमध्ये किती प्रकारच्या क्रिया होतात? कितीतरी प्रकारचे व्रत, जप-तप, नियम होऊन राहिले आहेत, तरीसुद्धा कुठेच का उगवत नाही? कषाय का कमी होत नाही? दोषांचे निवारण का होत नाही? काय, याची जवाबदारी आसनावर बसलेल्या उपदेशकांच्या डोक्यांवर नाही जात? असे लिहिले जाते, ते द्वेष किंवा वैरभावने नाही परंतु करुणाभावने, तरी सुद्धा त्यातून मुक्त होण्यासाठी काही उपाय आहे का नाही ? अज्ञान अवस्थामधून ज्ञान अवस्था आणि अंततः केवलज्ञान स्वरुपची अवस्था पर्यंत जाण्यासाठी ज्ञानींनी तीर्थंकरांनी काय दर्शिवले असतील? ऋणानुबंधी व्यक्तिीं प्रति असलेल्या राग अथवा द्वेषच्या बंधनातून मुक्त होऊन वीतरागता कशाप्रकारे शिकायची?
9
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
'मोक्षाचा मार्ग आहे शूरांचा, नाही कायरांचे काम.' परंतु शूरवीरतेचा उपयोग कुठे करायचा की ज्याच्याने झटक्यात मोक्ष प्राप्ती होईल. भित्रेपणा कश्यास म्हणावे? पापी पुण्यवान होऊ शकतो? तर कशा प्रकारे ?
या आर.डी.एक्स.च्या अग्निमध्ये सर्व जीवन जळत राहिले, त्याला कशाप्रकारे विझवायचे? रात्रं - दिवस पत्निचा प्रताप, मुलें - मुलींचा ताप आणि पैसे कमविण्याचा उत्पात, या सर्व ताण-तणावापासून कशाप्रकारे सुख प्राप्त करुन पोहून पार उतरायचे?
गुरु आणि शिष्य, गुरुमाता आणि शिष्या ह्यांच्यात निरंतर होणाऱ्या कषायांपासून उपदेशक कसे परत फिरु शकतील? विनाहक्काची लक्ष्मी आणि विनाहक्काच्या स्त्रियां प्रति वाणी, वर्तन अथवा मनाने, किंवा दृष्टिने दोष झाले तर तिर्यंच अथवा नर्कगतिच्या व्यतिरिक्त कुठे स्थान होऊ शकते? त्यातून कसे सुटायचे? तिथे सावध रहायचे आहे तर कशाप्रकारे सावध रहायचे आणि सुटायचे? असे अनेक कोड्यात घालणारे, संभ्रमी सनातन प्रश्नांचा उलगडा कसा होऊ शकेल ?
प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनकाळा दरम्यान कधी - कधी संजोगाच्या दबावामुळे अश्या परिस्थितीत फसून जात असतो की संसार व्यवहारमध्ये चुका करायच्या नाहीत तरी सुद्धा तो चुकांपासून मुक्त होऊ शकत नाही; अश्या परिस्थितीमध्ये हृदयापासून खरी माणसे सतत द्विधास्थितित रहात असतात व त्यांना चुकांपासून मुक्त होण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी खरा मार्ग सापडतो. ज्यामुळे ते आपल्या आंतरिक सुख-चैन मध्ये राहून प्रगति करू शकता; त्यासाठी कधीही नाही मिळाले असेल असे अध्यात्म विज्ञानाचे एकमेव, अचूक आलोचना-प्रतिक्रमण - प्रत्याख्यानरूपी हत्यार तीर्थंकरांनी, ज्ञानींनी जगाला अर्पण केले आहे, त्या हत्यारच्या सहाय्याने दोषरूपी विकसित विशाल वृक्षला मुख्य मुळासकट निर्मूलन करून अनंत जीव मोक्षलक्ष्मीला प्राप्त करू शकले आहेत, मुक्तिसाठीचे हे प्रतिक्रमणरूपी विज्ञान रहस्याचे फोड यथार्थपणे जसे च्या तसे, प्रकट ज्ञानी पुरुष श्री दादा भगवानांनी केवळज्ञान-स्वरूप मध्ये पाहून बोललेल्या वाणी द्वारा व्यक्त केला आहे, ते सर्व प्रस्तुत ग्रंथमध्ये संकलित केले आहे, जे सुज्ञ वाचकांना
10
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
आत्यंतिक कल्याणार्थी उपयोगी सिद्ध होणार.
ज्ञानी पुरुषांची वाणी द्रव्य-क्षेत्र - काळ - भाव तसेच भिन्न भिन्न निमित्तांच्या आधीन निघालेली आहे, त्या वाणीच्या संकलन मध्ये भासीत क्षतिंना क्षम्य मानून ज्ञानी पुरुषाची वाणीचा आंतर आशय प्राप्त करून घ्यावा हीच अभ्यर्थना!
ज्ञानी पुरुषाची जी वाणी निघाली आहे, ती नैमित्तिकरूपे जे मुमुक्षुमहात्मा समोर आलेत त्यांच्या समाधानासाठी निघालेली असते आणि ती वाणी जेव्हा ग्रंथरूपी संकलित होते तेव्हा कधी काही विरोधाभास वाटेल. जसे की एक प्रश्नकर्ताची आंतरिक दशाच्या समाधानासाठी ज्ञानीपुरुषाचे ‘प्रतिक्रमण हे जागृति आहे आणि अतिक्रमण हे डिस्चार्ज आहे.' असे प्रत्युत्तर प्राप्त झाले. आणि सूक्ष्म जागृतिच्या दशापर्यंत पोहचलेल्या महात्मांना सूक्ष्मता मध्ये समजण्यासाठी ज्ञानी पुरुष असा खुलासा करतात की, 'अतिक्रमण हे डिस्चार्ज आहे आणि प्रतिक्रमण हे पण डिस्चार्ज आहे. डिस्चार्जला डिस्चार्जने तोडायचे आहे. ' तर दोन्ही खुलासा नैमित्तिकरूपे यथार्थच आहे परंतु सापेक्षरूपे विरोधाभास वाटते. असे प्रश्नकर्ताच्या दशामध्ये फरक असल्यामुळे प्रत्युत्तरमध्ये विरोधाभास वाटते तरी सुद्धा सैद्धांतिक रूपे त्याच्यात विरोधाभास नाहीच आहे. सुज्ञ वाचकांना ज्ञानवाणीची सूक्ष्मता आत्मसात होण्यासाठी ही गोष्ट समजावी म्हणून साहिजक रूपाने हे सूचित केले जात आहे.
- डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंद
—
टीप : या पुस्तक मध्ये स्वरूपज्ञान न प्राप्त झालेल्यांचे प्रश्न मुमुक्षुच्या रूपे विचारले गेले आहेत, त्या पूर्ण शिर्षकाखाली केलेले स्पष्टीकरण त्याचेच समजायचे. त्याचे व्यतिरिक्त प्रश्नकर्ताच्या रूपे विचारणारे अक्रममार्गचे स्वरूपज्ञान प्राप्त झालेल्यांचे आहेत, असे सुज्ञ वाचकांनी समजायचे. जेथे जेथे चंदुभाई नांवाचा प्रयोग केला गेला आहे, तेथे तेथे सुज्ञ वाचकांनी स्वत:ला समजायचे.
11
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
अनुक्रमणिका १. प्रतिक्रमणाचे यथार्थ स्वरूप २. प्रत्येक धर्माने दर्शविले प्रतिक्रमण ३. नाहीत 'ते' प्रतिक्रमण महावीरचे ४. अहो, अहो! ते जागृत दादा ५. अक्रम विज्ञानची रीत ६. राहतील फूल, जातील काटे... ७. होईल स्वच्छ व्यापार ८. 'अशी' तुटणार शृंखला ऋणानुबंधची ९. निर्लेपता, अभावपासून फाशी पर्यंत १०. संघर्षाच्या प्रतिपक्षात ११. पुरुषार्थ, प्राकृत दुर्गुणांच्या समोर... १२. सुटतात व्यसने! ज्ञानींच्या रीतीने १३. विमुक्ति, आर्त-रौद्रध्यानने १४. ... काढते कषायच्या कोठडीमधून १५. भाव अहिंसाच्या वाटेवर... १६. दुःखदायी वैरची वसुली ... १७. 'मूळ' कारण अभिप्रायचे.... १८. विषय-विकाराला जिंकतो तो राजांचा राजा १९. खोटे ची लत्त आहे त्याला... २०. जागृति, वाणी वाहते तेव्हा... २१. सुटतात प्रकृति दोष असे... २२. निकाल, चिकट फाईलींचा २३. मन आकांत करते तेव्हा... २४. आजीवन प्रवाहामध्ये वाहणाऱ्यांना तारे ज्ञान... २५. प्रतिक्रमणांची सिद्धांतिक समज
12
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
१. प्रतिक्रमणाचे यथार्थ स्वरूप मुमुक्षु : माणसाला ह्या जीवनात मुख्यपणे काय करायला पाहिजे?
दादाश्री : मनात जसे असेल, तसे वाणीने बोलावे, तसे वर्तन करावे. आपल्याला जे वाणीने सांगायचे आहे पण मन खराब असेल तर त्याचे प्रतिक्रमण करायचे. प्रतिक्रमण कोणाच्या साक्षीत कराल? तेव्हा म्हणे, ‘दादा भगवान'च्या साक्षीने प्रतिक्रमण करा. हे दिसत आहे ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर भादरणचे पटेल आहेत, ए.एम.पटेल आहेत. 'दादा भगवान' तर आतमध्ये चौदालोकाचे नाथ प्रकट झालेले आहेत, ते आहे म्हणून त्यांच्या नांवांने प्रतिक्रमण करा, की हे दादा भगवान माझे मन बिघडले त्याबद्दल माफी मागत आहे. मला माफ करा. मी पण त्यांचे नांव घेऊन प्रतिक्रमण करतो.
चांगले कर्म केले त्याला धर्म म्हणतात आणि खराब कर्म केले त्याला अधर्म म्हणतात. आणि धर्म-अधर्मच्या पार जाणे त्याला आत्मधर्म म्हणतात. चांगले कर्म केले म्हणजे क्रेडीट (जमा) होते आणि क्रेडीट भोगण्यास जावे लागेल वाईट कर्म केले म्हणजे डेबीट (उधार) उत्पन्न होते म्हणून डेबीट भोगण्यास जावे लागेल आणि ज्या वही मध्ये क्रेडीट-डेबीट नाहीत, तेथे आत्मप्राप्ति होणार.
मुमुक्षु : या संसारात आलो तर कर्म करावेच लागेल ना? कळतनकळत खराब कर्म झाले तर काय करायचे?
दादाश्री : झाले तर त्याचा उपाय असेल ना मग. नेहमी खराब कर्म
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
झाल्यावर लगेच पश्चाताप होत असतो, हृदयापासून, सिन्सियारिटीने पश्चाताप करायला पाहिजे. पश्चाताप केल्यानंतर परत असेच झाले तर त्याची चिंता करायची नाही. पुन्हा पश्चाताप करायला हवे. त्यामागे काय विज्ञान आहे ते तुमच्या लक्षात येत नाही त्यामुळे तुम्हाला असे वाटते की हे पश्चाताप केल्यानंतरही बंद होत नाही. का बंद होत नाही या मागे पण विज्ञान आहे. म्हणून तुम्ही पश्चाताप करत च राहायचे. हृदयापासून पश्चाताप करणाऱ्यांचे सर्व कर्म धुतले जातात. खराब वाटले म्हणून त्याला पश्चाताप करायलाच हवे.
प्रश्नकर्ता : शरीरधर्मांचे आचरण करीत आहोत तर त्याचे प्रायश्चित करावे लागेल?
दादाश्री : होय तर, जो पर्यंत 'मी आत्मा आहे' असे भान होत नाही तो पर्यंत प्रायश्चित केले नाही तर कर्म जास्त चिकटतील. प्रायश्चित केल्याने कर्माच्या गांठी सैल होत जातात. नाहीतर त्या पापाचे फळ खूपच खराब येणार आहे. मनुष्यपणाही जातो, आणि मनुष्य झाला तर त्याला सर्व प्रकारच्या अडचणी येतील. खाण्याची, पिण्याची, मान-प्रतिष्ठा तर कधी कुठे दिसणारच नाही. सदैव अपमान. त्याकरिता प्रायश्चित अथवा इतर सर्व क्रिया कराव्या लागतात. त्याला परोक्षभक्ति म्हणतात. जो पर्यंत आत्मज्ञान नाही होत तो पर्यंत परोक्षभक्ति करण्याची जरूरी आहे.
आता प्रायश्चित कोणाच्या हजेरीत करायला पाहिजे? कोणाच्या साक्षीत करायला पाहिजे? तर तुम्ही ज्यांना मानत असाल, कृष्ण भगवानला मानतात की दादा भगवानला मानतात, ज्यालाही मानत असाल त्याला साक्षी मानून करायला हवे. परंतु उपाय नाही होणार असे या जगात होऊच शकत नाही. उपाय प्रथम जन्म घेतो. त्यानंतर आजार उत्पन्न होतात.
हा संसार कसा उभा झाला? अतिक्रमणाने. क्रमणाने कसलीही हरकत होत नाही. आपण हॉटेलात काही वस्तु मागवून खाल्या, आणि दोन बश्या आपल्या हातून फुटल्या, मग त्याचे पैसे देवून बाहेर निघतो, त्यात अतिक्रमण नाही केले, तर त्याचे प्रतिक्रमण करण्याचीही गरज नाही. पण बश्या फूटल्यावर आम्ही म्हटले की तुमच्या माणसाने फोडल्यात, तर झाले अतिक्रमण. अतिक्रमण केले त्याचे प्रतिक्रमण करण्याची जरूरी आहे.
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
आणि अतिक्रमण झाल्याशिवाय राहात नाही, म्हणून प्रतिक्रमण करा. बाकी सर्व क्रमण तर आहेच. सहजासहज गोष्ट झाली ते क्रमण आहे, त्याची हरकत नाही, पण अतिक्रमण झाल्याशिवाय राहात नाही, म्हणून त्याचे प्रतिक्रमण करा.
प्रश्नकर्ता : हे अतिक्रमण झाले ते स्वत:ला कसे माहित पडेल?
दादाश्री : ते स्वत:ला पण माहित पडते आणि समोरच्याला पण माहित पडते. आपल्याला जाणीव होते की, त्याच्या चेहरावर परिणाम झालेला आहे. आणि तुमच्यावर पण परिणाम होतो. दोघांवर परिणाम होतो. म्हणून त्याचे प्रतिक्रमण करणे अनिवार्य आहे.
__ अतिक्रमण तर, क्रोध-मान-माया-लोभ, हे सर्व अतिक्रमण आहेत. यांचे प्रतिक्रमण केले, म्हणजे क्रोध-मान-माया-लोभ गेले. अतिक्रमण झाले आणि प्रतिक्रमण केले, तर क्रोध-मान-माया-लोभ गेले.
अतिक्रमणने हा संसार उभा झाला आहे, आणि प्रतिक्रमणने नष्ट होत असतो.
प्रश्नकर्ता : तर प्रतिक्रमण म्हणजे काय?
दादाश्री : प्रतिक्रमण म्हणजे समोरचा जो आपला अपमान करत आहे, ते आपण समजून घ्यायला पाहिजे की अपमानाचा गुन्हेगार कोण आहे? अपमान करणारा गुन्हेगार आहे की भोगणारा गुन्हेगार आहे, हे आपणास प्रथम नक्की करायला पाहिजे. तर यात अपमान करणारा हा बिलकूल पण गुन्हेगार नसतो. एक सेंट (प्रतिशत)पण गुन्हेगार नसतो. तो निमित्त असतो. आणि आपल्याच कर्माच्या उदयाधीन तो निमित्त भेटतो. अर्थात् आपलाच गुन्हा आहे. आपल्याला आता त्याच्यासाठी खराबभाव होत आहेत एवढ्यासाठीच प्रतिक्रमण करायला हवे. त्याचे प्रति नालायक आहे, लबाड आहे, असे विचार मनात आले असतील तर, प्रतिक्रमण करायचे. आणि जर असे विचार आले नसतील आणि आपण त्याचे उपकार मानले असेल तर प्रतिक्रमण करायची आवश्यकता नाही. जर आपल्याला कोणी शिवी दिली तर तो आपलाच हिशोब आहे, तो तर निमित्त आहे. खिसा कापला तर तो कापणारा निमित्त आहे आणि
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
आपलाच हिशोब आहे. हा तर निमित्तालाच चावा घेत असतो आणि याचेच झगडे आहेत हे सर्व.
उलटे चालला त्याचे नांव अतिक्रमण, परत फिरला त्याचे नांव प्रतिक्रमण.
जेथे झगडा आहे तेथे प्रतिक्रमण नाही आणि जेथे प्रतिक्रमण आहे तेथे झगडा नाही. ____ मुलांना मारण्याचा काहीच अधिकार नाही. समजावण्याचा अधिकार आहे. तरी सुद्धा मुलांना मारले गेले आणि त्याचे प्रतिक्रमण नाही केले तर सर्व कर्म चिकटतच जातील ना? प्रतिक्रमण तर व्हायला पाहिजे ना!
'मी चंदुभाई (वांचकांनी स्वत:चे नाम समजावे) आहे' हेच अतिक्रमण. तरीसुद्धा व्यवहारात हे लेट गो करूया (चालवून घेऊ). पण कोणास दु:ख होते तुमच्याकडून? होत नसेल तर ते अतिक्रमण नाही. पूर्ण दिवसात कोणाला स्वत:कडून दुःख झाले हे अतिक्रमण झाले, त्याचे प्रतिक्रमण करा. हे *वीतरागांचे सायन्स आहे. अतिक्रमण अधोगतित घेवून जाणार आणि प्रतिक्रमण ऊर्ध्वगतित घेवून जाणार. ते ठेठ मोक्षपर्यंत प्रतिक्रमणच हेल्प करणार.
प्रतिक्रमण कोणाला करायचे नसतात? ज्याने अतिक्रमण केले नसेल
त्याने.
प्रश्नकर्ता : व्यवहार, व्यापार आणि अन्य प्रवृत्तित अन्याय होत आहे असे वाटते, त्याकारणे मनास ग्लानि होते, आणि त्यामुळे व्यवहाराला नुकसान होत असेल तेव्हा काय करायचे? आमच्याकडून जर असा अन्याय होत असेल तर त्याचे प्रायश्चित काय?
दादाश्री : प्रायश्चितात आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान व्हायला पाहिजे. जेथे जेथे कोणावर अन्याय होत असेल तेथे आलोचना, प्रतिक्रमण व्हायला पाहिजे आणि पुन्हा अन्याय नाही करणार असे नक्की करायला हवे. ज्या भगवानला मानत असाल, कोणत्या भगवानला मानतात? *वीतराग = संपूर्ण राग-द्वेष रहित झालेले आहेत ते.
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : शिवला.
दादाश्री : हो, तर शिव जवळ, पश्चाताप करायला पाहिजे. आलोचना करायला पाहिजे की माझ्याकडून ह्या माणसाबरोबर असे दोष झाले आहे, पण आता पुन्हा असे करणार नाही. आपणांस पुन्हा पुन्हा पश्चाताप करावा लागणार. आणि पुन्हा असे दोष झाले तर पुन्हा पश्चाताप करायला हवे. असे करता करता दोष कमी होतील. तुम्हाला करायचे नाही तरीपण अन्याय होवून जाईल. अजूनही होत आहे तो प्रकृति दोष आहे. हे प्रकृति दोष तुमचे पूर्व जन्मांचे दोष आहेत. हे आजचे दोष नाही. आज तुम्हाला सुधरायचे आहे, पण हे होऊन जाते ते तुमचे पूर्वीचे दोष आहेत. ते तुम्हाला विचलीत केल्या शिवाय राहणार नाही. म्हणून आलोचना, प्रतिक्रमण, प्रत्याख्यान सतत करावे लागतील.
प्रश्नकर्ता : आपणांस सहन करावे लागत आहे, तर त्यावर उपाय
FREE
काय?
दादाश्री : आपण तर सहन करूनच घ्यावे, उगीचच आरडा ओरड करू नये. सहन करायचे पण ते सुद्धा समतापूर्वक सहन करायचे. मनात समोरच्याला शिव्या देवन नाही, पण समतापूर्वक की भाऊ, तू मला कर्मापासून मुक्त केलेस. माझे जे कर्म होते ते मला भोगायला लावले आणि मला मुक्त केलेस. म्हणून त्याचे उपकार माना. ते काही मोफत सहन करावे लागत नाही, आपल्याच दोषांचा परिणाम आहे.
प्रश्नकर्ता : आणि प्रतिक्रमण तर दुसऱ्यांचे दोष दिसले, त्याचेच प्रतिक्रमण?
दादाश्री : दुसऱ्यांचे दोष एवढेच नाही, प्रत्येक बाबतीत, जसे की खोटे बोलले असाल, वाईट झाले असेल, जी काही हिंसा होऊन गेली असेल, कोणतेही पाच महाव्रत भंग झाले असेल, ह्या सर्वांचे प्रतिक्रमण करायचे.
२. प्रत्येक धर्माने दर्शविले प्रतिक्रमण भगवंताने सांगितले आहे की, आलोचना, प्रतिक्रमण आणि
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रत्याख्यान या शिवाय दूसरा व्यवहारधर्मच नाही. पण ते रोख असेल तर, उधार नाही चालणार. कोणाला शिव्या दिल्या, कोणा बरोबर काही झाले ते लक्षात ठेवा आणि आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान कॅश करा. यालाच भगवंतानी व्यवहार-निश्चय दोन्ही म्हटले. पण हे शक्य होणार कोणाला? *समकित झाल्यानंतर च होते तोपर्यंत करायचे असेल तरी नाही होत आणि हे समकित तर होतच नाही ना! तरीसुद्धा कोणीपण आपल्या येथे आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान शिकून गेला, तरी काम होऊन जाईल. भले बिगर आधार शिकून गेला तरी पण हरकत नाही. त्याला समकित समोर येवून उभे राहणार!!!
ज्यांचे आलोचना, प्रतिक्रमण खरे असेल त्यांना आत्मा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.
प्रश्नकर्ता : पश्चाताप करतो ते प्रतिक्रमण आणि म्हणेल (पुन्हा) असे करणार नाही ते प्रत्याख्यान?
दादाश्री : होय, पश्चाताप हे प्रतिक्रमण म्हटले जाते, असे प्रतिक्रमण केले तर पुन्हा असे अतिक्रमण नाही होणार. 'आता पुन्हा असे नाही करणार' त्याचे नांव प्रत्याख्यान. पुन्हा असे नाही करणार, याचे प्रोमिस देत आहे, असे मनात नक्की करायचे आणि नंतर पुन्हा असे झाले तरी पण एक आवरण तर गेले, मग परत दुसरे आवरण येईल, तर घाबरायचे नाही, वारंवार असेच करत राहायचे.
प्रश्नकर्ता : आलोचना म्हणजे काय?
दादाश्री : आलोचना म्हणजे आपण काही वाईट काम केले असेल, तर जे आपले गुरु असतील अथवा जे ज्ञानी असतील त्यांच्याकडे कबूल करायचे, जसे झाले असेल त्याप्रमाणे कबूल करायचे.
अर्थात् आपणास प्रतिक्रमण कसले करायचे? तेव्हा म्हणे 'जितके अतिक्रमण केले असतील', जे लोकांना स्विकार्य नसेल, लोक निंदा करतील असे कर्म, समोरच्याला दु:ख होईल असे झाले असेल ते सर्व अतिक्रमण. तसे झाले असेल तर प्रतिक्रमण करायची आवश्यकता. *समकित = शुद्धात्माचा लक्ष असलेली सम्यक् दृष्टि
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
कर्म बांधत आहे कोण? हे आपण समजायला पाहिजे, आपले नांव काय?
मुमुक्षु : चंदुलाल.
दादाश्री : तर 'मी चंदुलाल आहे' तोच कर्म बांधणारा, मग तो रात्री झोपून गेला, तरी सुद्धा पूर्ण रात्र कर्म बांधले जातात. 'मी चंदुलाल आहे' म्हणून झोपेत सुद्धा कर्म बांधले जातात. याचे काय कारण? कारण की, हा आरोपित भाव आहे. म्हणून गुन्हा लागू झाला. स्वतः खरोखर चंदुलाल नाही. आणि जेथे तुम्ही नाही आहात तेथे 'मी आहे' असे आरोपण करत आहात. हा आरोपित भाव आहे म्हणून निरंतर त्याचा गुन्हा लागू होणार ना!! आपल्याला समजले ना?! मग मी चंदुलाल, मी याचा सासरा आहे, मी याचा मामा आहे, याचा काका आहे, हे सर्व आरोपित भाव आहेत, याच्याने निरंतर कर्मबंधन होत असते. रात्री झोपेत सुद्धा कर्म बांधले जातात. रात्री कर्म बांधले जातात, त्यातून तर आता सुटकाच नाही पण 'मी चंदुलाल आहे' या अहंकारला जर आपण निर्मल करून टाकले, तर आपले कर्म कमी बांधले जातील.
अहंकार निर्मल केल्यानंतर परत क्रिया कराव्या लागतील. कशा क्रिया कराव्या लागतील? की सकाळी आपल्या सूनेच्या हातून कपबशी फुटून गेली, यावर आपण बोलतात की 'तुझ्यात अक्कल नाही' तेव्हा तिला जे दुःख दिले, त्यावेळी आपल्याला मनात असे व्हायला पाहिजे की हे मी तिला दुःख दिले. त्याचे प्रतिक्रमण व्हायला पाहिजे. दुःख दिले त्याला अतिक्रमण म्हणावे. आणि अतिक्रमण वर प्रतिक्रमण केले तर ते धुतले जाईल. हे कर्म हलके होऊन जाईल.
तीला काही दु:ख होईल असे आचरण केले तर ते अतिक्रमण म्हणावे आणि अतिक्रमण वर प्रतिक्रमण व्हायला पाहिजे. आणि बारा महिन्यानंतर करतात तसे नाही, 'शूट ऑन साईट' (दोष पाहाता च ठार) व्हायला पाहिजे. तेव्हा ही दुःखं काहीतरी कमी होतील. वीतरागांनी सांगितलेल्या मताप्रमाणे चालतात तर दुःख जाणार. नाहीतर दुःख जाणार नाहीत.
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : हे प्रतिक्रमण कशाप्रकारे करायचे?
दादाश्री : आपण जर ज्ञान घेतले असेल तर त्याचा आत्मा आपणांस माहित होतो. म्हणून आत्माला उद्देशून करायचे, नाहीतर मग भगवंताला उद्देशून करायचे, हे भगवान! पश्चाताप करत आहे, माफी मागत आहे आणि आता पुन्हा असे नाही करणार. बस हे प्रतिक्रमण!
प्रश्नकर्ता : धुतले जाईल खरे हे?
दादाश्री : हो, हो खात्रीने धुतले जाईल!! प्रतिक्रमण केले म्हणून राहात नाही ना?! खूप मोठे कर्म असेल तर जळालेली दोरी सारखे दिसेल पण हात लावल्यावर गळून पडेल.
प्रश्नकर्ता : हा पश्चाताप कशाप्रकारे करायचा? सर्वांच्या देखत करायचे की मनात करायचे?
दादाश्री : मनात, मनात, दादाजींना स्मरण करून की ही माझी चुक झाली आहे, आता पुन्हा नाही करणार-असे मनात स्मरण करून करणे, नंतर पुन्हा, असे करता करता हे सर्व दुःख विसरून जाणार. ही चुक निघून जाते. पण असे नाही केले तर चूकां वाढत जातील.
हा एकच मार्ग असा आहे की स्वत:चे दोष दिसत जातात आणि शूट होत जातात, असे करता करता दोष समाप्त होत जातात.
प्रश्नकर्ता : एकाबाजूने पाप करीत जाणे आणि दुसऱ्याबाजूने पश्चाताप करीत जाणे. असे तर चालतच राहणार.
दादाश्री : असे नाही करायचे, जो मनुष्य पाप करणार आणि जर तो पश्चाताप करणार तर खोटा पश्चाताप करू शकणारच नाही. त्याचा पश्चाताप खराच होणार आणि पश्चाताप खरा आहे म्हणून त्याच्या मागे कांदयाच्या एक पड सारखे एक पड दूर होणार त्यानंतर सुद्धा कांदा आख्खाचा आख्खा दिसतो. नंतर मग दुसरे पड दूर होणार. पश्चाताप कधीपण व्यर्थ जात नाही.
प्रश्नकर्ता : पण खऱ्या मनाने माफी मागायची ना? दादाश्री : माफी मागणारा खऱ्या मनानेच माफी मागत असतो. आणि
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
खोट्या मनाने माफी मागत असेल ते पण चालवून घेऊ. पण माफी मागायची.
प्रश्नकर्ता : तर मग त्याला सवय पडून जाईल?
दादाश्री : सवय पडून जाईल तर भले पडून जावो. पण माफी मागायची. माफी नाही मागीतली तर उपाधि आलीच समजा!!! माफीचा अर्थ काय? तर याला प्रतिक्रमण म्हणतात आणि दोषाला काय म्हणाल? अतिक्रमण.
कोणी ब्रांडी पीतो आहे आणि म्हणतो मी माफी मागतो. तर मी सांगणार माफी मागत जा. माफी मागत जा, आणि पीत जा, पण मनात नक्की कर मला आता सोडून द्यायची आहे. हृदयापासून मनात नक्की करायचे. मला सोडून द्यायची आहे. मग पीत जा आणि माफी मागत जा. एकाद दिवशी त्याचा अंत येणार. हे माझे विज्ञान शंभर टक्याचे आहे.
हे तर विज्ञान आहे!! उगवल्या शिवाय राहणार नाही. त्वरितच फल देणारे आहे. 'धीस इज द कॅश बँक ऑफ डिव्हाइन सोल्युशन' (ही दिव्य परिणाम देणारी रोकड बँक आहे) कॅश बँक हीच! दहा लाख वर्षापासून निघालीच नाही! दोन तासात मोक्ष घेऊन जावे !! येथे तू जे मागणार ते द्यायला तयार आहे. मागणारा चुकतो.
एका माणसाला चोरी केल्यानंतर पश्चाताप होतो, तर त्याला निसर्ग सोडून देते. पश्चाताप केला त्याला भगवंताकडे गुन्हा नाही. परंतु जगातले लोक दंड करतील ते त्याला या जन्मातच भोगावे लागेल.
हे सर्व चुकीचे आहे, असे नाही करायला पाहिजे, असे सर्व बोलतात, ते वरकरणी बोलत असतात 'सुपरफ्लुअस' बोलत असतात. हार्टिली नाही बोलत, बाकी जर असे हार्टिली बोलला तर काही काळानंतर त्या दोषांपासून सुटका होईल च! तुमचे कितीही खराब दोष होवो पण त्याचा तुम्हाला खूप हार्टिली पश्चाताप झाला तर तो दोष पुन्हा नाही होणार. आणि पुन्हा झाला तरी त्याची हरकत नाही, पण पश्चाताप खूप करीत रहा.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण आणि पश्चाताप ह्यात फरक काय?
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दादाश्री : पश्चाताप सामुहिक (एकत्र) आहे, ख्रिश्चन रविवारी चर्च मध्ये जाऊन पश्चाताप करत असतात. जे पाप केले त्याचे एकत्र पश्चाताप करीत असतात. आणि प्रतिक्रमण तर कसे आहे की, ज्याने गोली मारली, ज्याने अतिक्रमण केले, त्याने प्रतिक्रमण करावे. त्याचक्षणी ! 'शूट ऑन साईट'-त्याला धुऊन टाका.
आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान महावीर भगवानांच्या सिद्धांतांचे सार आहे आणि अक्रम मार्गात 'ज्ञानीपुरुष' हे सार आहेत, एवढेच समजायला हवे. आज्ञा हाच धर्म आणि आज्ञा हेच तप. पण ते दखल केल्या शिवाय रहात नाही ना! अनादिची वाईट सवय झाली आहे.
३. नाहीत 'ते' प्रतिक्रमण महावीरचे प्रश्नकर्ता : अनादिकाळापासून प्रतिक्रमण तर करीत आलो आहे तरीही सुटका तर होत नाही.
दादाश्री : प्रतिक्रमण, ते खरे प्रतिक्रमण केले नाही. खरे प्रत्याख्यान आणि खरे प्रतिक्रमण केले तर त्याचा परिणाम येईल. प्रतिक्रमण 'शूट ऑन साईट' व्हायला पाहिजे. आता माझ्याकडून एक शब्द जरा वाकडा निघून गेला, तर माझ्या आतमध्ये प्रतिक्रमण होऊनच जायला पाहिजे. त्वरितच ऑन द मोमेन्ट. (त्याच क्षणी) ह्यात उधार नाही चालत. हे तर शिळे ठेवायचेच
नाही.
प्रतिक्रमण म्हणजे पस्तावा करायचा. तर पस्तावा कशाचा करतात? प्रश्नकर्ता : पस्तावा नाही करू शकत. क्रिया करत राहतो सर्व.
दादाश्री : प्रतिक्रमण म्हणजे परत फिरणे. जे पाप केले असेल, क्रोध केला असेल, त्याचा पस्तावा करायचा त्याला प्रतिक्रमण म्हणतात.
प्रतिक्रमण कोणाला म्हणायचे जे केल्याने दोष कमी होतात. जे केल्याने दोष वाढत असतील त्याला प्रतिक्रमण कसे म्हणयाचे? अर्थात्, भगवंतानी असे नाही म्हटले होते. भगवंत म्हणतात, समजू शकाल अशा भाषेत प्रतिक्रमण करा. आपण-आपापल्या भाषेत प्रतिक्रमण करून घ्यायचे. नाहीतर प्रतिक्रमण लोक समजू शकणार नाही. तर हे मागधी भाषेत करून
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
ठेवले आहे. आता ही स्वत:ची गुजराथी भाषा नीट नाही समजत त्याने मागधी भाषेत प्रतिक्रमण केल्याने काय फायदा होणार? आणि साधु-आचार्य पण समजत नाही, त्यांच्यातले पण दोष काही कमी झाले नाहीत. अर्थात् यात परिस्थिती अशी होऊन जाते.
भगवंताने मागधी भाषेत फक्त एक नवकार-मंत्र आहे तेच गावयाचे म्हटले होते. नवकार-मंत्र एकच मागधी भाषेत बोलयाचा, आणि तो पण समजून म्हणायचा. म्हणून मागधीत ठेवण्यासारखा फक्त हा नवकार-मंत्र एकच आहे, कारण की ते भगवंताचे शब्द आहेत. बाकी प्रतिक्रमणमध्ये प्रथम तर त्याचा अर्थ समजायलाच पाहिजे की हा मी प्रतिक्रमण करत आहे ! कोणाचे? कोणी माझा अपमान केला अथवा मी कोणाचा अपमान केला, त्याचे मी प्रतिक्रमण करत आहे.
प्रतिक्रमण म्हणजे *कषायांना समाप्त करून टाकणे.
हे तर वर्षातून एकदा प्रतिक्रमण करणार, तेव्हा नवे कपडे घालून जाणार, तर प्रतिक्रमण हे काय लग्न-समारंभ आहे की काय? प्रतिक्रमण करायचे म्हणजे किती तरी पस्तावा करायचा! तेथे नवीन कपड्याचे काय काम आहे?! तेथे काही लग्न करायचे आहे? पुन्हा *रायशी आणि देवशी. जेव्हा सकाळी काय खाल्ले ते संध्याकाळी आठवत नाही, तर प्रतिक्रमण कशाप्रकारे करणार?
वीतराग धर्म कोणाला म्हटले आहे की त्यात प्रतिदिन पाचशे-पाचशे प्रतिक्रमण करतात. जैनधर्म तर आहे सर्वत्र, पण वीतराग धर्म नाही. बारा महिन्यात एकदा प्रतिक्रमण करणार त्याला जैन कसे म्हणयाचे? तरीसुद्धा संवत्सरी प्रतिक्रमण करा त्याची सुद्धा हरकत नाही.
आम्ही असे बोलतो पण आम्ही बोलण्या पूर्वीच प्रतिक्रमण करून घेतलेले असते. तुम्ही असे बोलायचे नाही. आम्ही असे कडक बोलत असतो, चुक काढत असतो, तरी सुद्धा आम्ही सर्वांना निर्दोषच पहात
*कषाय = क्रोध-मान-माया-लोभ *रायशी = रात्री झालेल्या दोषांचे प्रतिक्रमण, देवशी = दिवसाला झालेल्या दोषांचे प्रतिक्रमण
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
असतो. पण जगाला समजावयाला तर लागेल ना?! यथार्थ, खरी बात तर समजावयाला लागणार ना?!
आत्मज्ञान हा मोक्षमार्ग आहे. आत्मज्ञान झाल्यानंतरचे प्रतिक्रमण मोक्षमार्ग देणार. त्यानंतरच्या सर्व साधना मोक्षमार्ग देणार.
प्रश्नकर्ता : तर हे प्रतिक्रमण त्याला आत्मज्ञान होण्याचे कारण बनू शकते?
दादाश्री : नाही, हे जुन्याचे प्रतिक्रमण करायचे आणि पुन्हा मोहामुळे नविन अतिक्रमण उभे होतात. मोह बंद झालेला नाही ना? मोह चालू न ? *दर्शनमोह म्हणजे जुने सर्व दोष प्रतिक्रमण केल्याने विलय होऊन जातात आणि नविन (दोष) उभे होतात. प्रतिक्रमण करणार त्याक्षणी पुण्य बांधणार.
संसारी लोक प्रतिक्रमण करतात, जे जागृत असतात ते रायशी-देवशी दोन्ही प्रतिक्रमण करतात. त्याच्याने तेवढे दोष कमी होऊन जातात, परंतु जोपर्यंत दर्शन-मोहनीय आहे तोपर्यंत मोक्ष नाही होणार. दोष होतच राहतील. जेवढे प्रतिक्रमण करणार तेवढे दोष जाणार.
अर्थात्, या युगात आता 'शूट ऑन साईट'ची बात तर कुठेच गेली पण सांगितलेले आहे की संध्याकाळी, पूर्ण दिवसाचे प्रतिक्रमण करीत जा, ती बात पण कुठे राहिली, आठवड्यातून एखादे वेळी करण्याची गोष्ट पण कुठेच गेली, आणि पाक्षिक पण कुठे गेले आणि बारा महिन्यात एकदा करतो त्याची पण समज नाही आणि चांगले कपडे घालून फिरत आहे. अर्थात् असे रियल (खरे) प्रतिक्रमण कोणी करत नाही. म्हणून दोष वाढत चाललेत. प्रतिक्रमण तर त्याला म्हणावे की दोष घटतच जातात.
ह्या नीरूबहेनला तुमच्यासाठी जरासा उलटा विचार आला की 'हे पुन्हा आले आणि मला संकट का उभे केले?' मनात असा विचार आला असेल. तरी पण तुम्हाला त्याची जाणीव नाही होऊ देणार. हसतमुखी राहिल. त्या क्षणी प्रतिक्रमण करणार. उलटा विचार केला ते अतिक्रमण केले म्हणायचे. त्या रोज पाचशे-पाचशे प्रतिक्रमण करीत असतात. *दर्शनमोह (आत्मस्वरूपची अज्ञानता)
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता होणारच नाही?
नसतात.
१३
दादाश्री : नाही, क्रियामध्ये प्रतिक्रमण होतच नाही, प्रतिक्रमण तर भावप्रतिक्रमणचीच जरूर आहे, त्याने काम होणार. क्रिया-प्रतिक्रमण होत
:
हे तर भाव प्रतिक्रमण आहे, क्रिया प्रतिक्रमण तर
समजवा.
प्रश्नकर्ता: द्रव्य प्रतिक्रमण आणि भावप्रतिक्रमण म्हणजे काय थोडे
दादाश्री : भाव असा ठेवायचा की असे नाही व्हायला पाहिजे; हा भावप्रतिक्रमण म्हणायचा आहे. आणि द्रव्यने तर पूर्ण सर्व शब्द - न - शब्द बोलावे लागते. जेवढे शब्द लिहिलेले असतात ना, ते सर्व आपल्याला बोलावे लागतात. त्याला द्रव्य प्रतिक्रमण म्हणतात.
हे प्रतिक्रमण पाहिल्यावर, जर आज भगवान असते तर, या सर्वांना जेलमध्ये टाकले असते. मुर्खा, तू असे केले. प्रतिक्रमण म्हणजे एका गुन्ह्याची माफी मागायची, साफ करून टाकायचे. एक डाग पडला असेल, त्या डागला धुवून साफ करून टाकायचे. ती होती तशीच्या तशी जागा करून टाकायची त्याचे नांव प्रतिक्रमण. आता तर नुसते डागवाले धोतर दिसत आहेत.
हे तर एकाही दोषाचे प्रतिक्रमण केले नाहि आणि पूर्ण दोषांचे भंडार होऊन गेले आहे.
ही नीरूबहेन आहे, तिचे सर्व आचार-विचार कसे उंच झाले आहेत, तेव्हा म्हणे, दरदिवशी पाचशे-पाचशे प्रतिक्रमण करीत होती आणि आता तर म्हणते की आतून बाराशे - बाराशे प्रतिक्रमण होत आहेत. ह्या लोकांनी एक पण केले नाही.
नेहमीच, क्रियेचे आवरण येत असते. आवरण आले म्हणजे चुक झाकली जाते आणि त्यामुळे चुक दिसतच नाही. चुक तर आवरण तुटेल तेव्हाच दिसणार आणि ते आवरण ज्ञानीपुरुषाकडून तुटेल. बाकी स्वत:कडून आवरण तुटणार असे नाही. ज्ञानीपुरुष तर सर्व आवरण फ्रेक्चर करून उडवून टाकतात!
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
१४
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमणला शुद्ध कसे मोजायचे? खरे प्रतिक्रमण कशाप्रकारे होते?
दादाश्री : समकित झाल्यानंतर खरे प्रतिक्रमण होते, सम्यक्त्व झाल्यानंतर, दृष्टी सम्यक् झाल्यानंतर, आत्मदृष्टी झाल्यानंतर खरे प्रतिक्रमण होऊ शकते. पण तोपर्यंत, प्रतिक्रमण केले आणि पस्तावा केला तर त्याच्याने सर्व कमी होऊन जाते. आत्मदृष्टी झालेली नसेल आणि संसारच्या लोकांनी चुक झाल्यानंतर पस्तावा केला आणि प्रतिक्रमण केले त्याच्याने पाप कमी बांधले जाणार, समजले ना? प्रतिक्रमण-पस्तावा केल्याने कर्म नष्ट होतात!
कपड्यावर चहाचा डाग पडल्याबरोबर त्याला लगेच धुवून टाकतात, ते कशासाठी?
प्रश्नकर्ता : डाग जायला पाहिजे तेवढ्यासाठी.
दादाश्री : तसेच आपल्या आत डाग पडले की लगेच धुवून टाकायला पाहिजे. हे लोक लगेच धुवून टाकतात. कुठे कषाय उत्पन्न झाला, काही झाले की त्वरित धुवून टाकले तर साफ चे साफ, सुंदर चे सुंदर ! तुम्ही तर बारा महिन्यात एक दिवस करतात, त्यादिवशी सर्व कपडे बुडवून देतात!
आमचे शूट ऑन साइट प्रतिक्रमण म्हटले जाते. अर्थात् तुम्ही जे करतात त्याला प्रतिक्रमण (खरे) म्हटले जात नाही. कारण की कपडा (दोष) एक पण धुतला जात नाही तुमचा. आणि आमचे तर सर्व धुवून स्वच्छ होऊन गेलेत. प्रतिक्रमण तर त्याला म्हणायचे की कपडे धुवून स्वच्छ होणार.
कपडे दररोज एक-एक करून धुवावे लागते, तेव्हा जैन लोक काय करतात? बारा महिने झाले नंतर बारा महिन्याचे सर्व कपडे एकत्र धुतात ! भगवानच्या येथे असे नाही चालणार. हे लोक बारामहिन्याचे कपडे वाफवतात की नाही? ते तर एक-एक करून धुवायला हवे. दररोज पाचशेपाचशे कपडे (दोष) पूर्ण दिवसभर धुतले, तर काम होणार.
जेवढे दोष दिसतील तेवढे कमी होतील. ह्यांना दररोज चे पाचशे
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दोष दिसत असतात. आता दुसऱ्याला नाही दिसत, त्याचे काय कारण? अजून कच्चे आहेत तेवढे, दिसत नाही म्हणून काय विना दोषाचा होऊन गेला आहे का?
१५
भगवतांनी दररोज वहीखाता (आपल्या दोषांची नोंद) लिहायचे सांगितले होते, तर आता बारा महिन्याचे वहीखाते लिहितो, जेव्हा पर्युषण येते तेव्हा. भगवानांनी सांगितले की, खरा व्यापारी असशील तर दररोजचे लिहित जा आणि संध्याकाळी ताळेबंदी (हिशोब ) काढत जा. बारा महिन्यानी वहीखाता लिहीत आहे, मग काय आठवणार आहे? त्यात कोणती रक्कम आठवणार आहे? भगवानांनी सांगितले होते की खरा व्यापारी बनायचे आणि दररोजची वहीखाता दररोज लिहायची आणि वहीखात्यात कुठे भूलचुक झाली, अविनय झाला असेल तर त्वरितच्या त्वरित त्याचे प्रतिक्रमण करायचे, त्याला पुसून टाकायचे.
४. अहो, अहो! ते जागृत दादा
ह्या जगात सर्व निर्दोष आहेत. पण पहा अशी वाणी निघत असते ना?! आम्ही तर या सर्वांना निर्दोषच पाहिले आहे, दोषीत एकही नाही. आम्हाला दोषीत दिसतच नाही. फक्त दोषीत बोलले जाते. आपण असे बोलून शकतो? आपल्याला असे बोलणे अनिवार्य आहे? असे कोणाबद्दल ही बोलायला नको. त्या नंतर त्वरितच त्याचे प्रतिक्रमण होत असतात. तेवढी आमची चार डिग्री कमी आहे, त्याचा हा परिणाम आहे. पण प्रतिक्रमण केल्याशिवाय चालणार नाही.
आम्ही (समोरच्याचा दोष निघावा म्हणून) दखल करतो, जाणून बुजून कडक शब्द बोलतो परंतु निसर्गाच्या दृष्टिने तर दोषच झाला ना! तर आम्ही त्याचे प्रतिक्रमण (ए.एम. पटेलकडून) करवून घेतो. प्रत्येक चूकीचे प्रतिक्रमण होत असते. समोरच्याचे मन तूटणार नाही असे आमचे होत असते.
माझ्याने ‘आहे' त्याला 'नाही आहे' असे नाही सांगितले जाणार आणि ‘नाही आहे' त्याला ‘आहे' असे नाही सांगितले जाणार. म्हणून माझ्याने बऱ्याच लोकांना दुःख होते. जर 'नाही आहे' त्याला 'आहे' असे मी
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
१६
प्रतिक्रमण
सांगितले तर तुमच्या मनात भ्रम निर्माण होणार आणि असे बोलल्याने दुसऱ्या (प्रतिपक्षीय) लोकांच्या मनात उलटा परिणाम होणार की असे का बोलत आहेत? म्हणून मला दुसऱ्या (प्रतिपक्षीय) बाजूचे प्रतिक्रमण करावे लागेल रोज. असे बोलले गेले तर! कारण की त्यांना दु:ख तर नाहीच व्हायला पाहिजे. तो मानतो की या पिंपळाच्या झाडात भूत आहे, आणि मी सांगतो की भूत सारखी वस्तुच नाही या पिंपळाच्या झाडात. याचे त्याला दुःख होणार, म्हणून नंतर मला प्रतिक्रमण करावे लागते. हे तर नेहमीच करावे लागते ना!
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांच्या समजूती प्रमाणे चुकीचे वाटत असेल तर त्याचे काय करायचे?
दादाश्री : हे जेवढे सत्य आहे ते सर्व व्यवहारिक सत्य आहे. ते सर्व खोटे आहे. व्यवहारपूरते सत्य आहेत. मोक्षात जायचे असेल तर सर्वच खोटे आहे. सर्वांचे प्रतिक्रमण करावे लागेल. 'मी आचार्य आहे' त्याचेही प्रतिक्रमण करावे लागेल. कारण की 'मी शुद्धात्मा आहे' म्हणून हे सर्वच खोटे आहे. सब झूठा, तुमच्या लक्षात आले की नाही?
प्रश्नकर्ता : आले च.
दादाश्री : सब झूठा. लोक नाही समजल्या कारणाने सांगतात की 'मी सत्य सांगत आहे'। अरे, सत्य बोलत असेल तर प्रत्याघात होणारच नाही.
असे आहे ना, की आम्ही ज्याक्षणी बोलतो त्याचक्षणी आमचे प्रतिक्रमण जोरदार चालत असते. बोलण्याच्या बरोबर च.
प्रश्नकर्ता : पण जी खरी बात आहे ती तुम्ही सांगतात त्यात काय प्रतिक्रमण करायचे?
दादाश्री : नाही, तरी सुद्धा प्रतिक्रमण तर करायलाच हवे ना! कोणाचा दोष तू का बघीतला? निर्दोष आहे तरी सुद्धा दोष का पाहिला? निर्दोष आहे तरी पण त्याची निंदा तर झाली ना? निंदा होईल अशी खरी गोष्ट पण नाही बोलायला हवी, खरी गोष्ट हा गुन्हा आहे. खरी गोष्ट संसार
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
१७
मध्ये बोलणे हा गुन्हा आहे. खरी गोष्ट हिंसक नाही असायला पाहिजे. ही हिंसक गोष्ट म्हणावी.
आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान हा मोक्षमार्ग. आपले महात्मा काय करत आहेत? पूर्ण दिवस आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करत असतात. आता त्यांना सांगितले की 'तुम्ही या बाजूला चला, व्रत, नियम करा'. तेव्हा ते म्हणतात, 'आम्हाला व्रत-नियमांचे काय करायचे? आम्हाला आतमध्ये शांति आहे, आम्हाला चिंता नाही. निरूपाधि राहात आहे. निरंतर समाधिमध्ये राहिले जात आहे. मग कशासाठी हे?' उपधान तप, अमके तप, याला तर कटकट म्हणावी. हे तर गोंधळलेली माणसं करतात सर्व. ज्यांना आवश्यक आहे, आवड आहे. म्हणून आम्ही सांगत असतो की, हे तप तर हौसी लोकांचे काम आहे. संसाराची हौस असेल त्यांनी तप करायला हवे.
प्रश्नकर्ता : परंतु अशी मान्यता आहे की तप केल्याने कर्मांची * निर्जरा होत असते.
दादाश्री : असे कधीही होत नाही. कोणत्या तपने निर्जरा होते? आंतरिक तप पाहिजे. अदीठ (अदृश्य) तप, जे आम्ही सांगत असतो की हे आपले सर्व महात्मा अदीठ तप करत आहेत, जे तप डोळ्यांनी दिसत नसते. आणि डोळ्यांनी दिसणारे तप आणि जाणीव मध्ये येणारे तप या सर्वांचे फल पुण्य आणि अदीठ तप म्हणजे आतले तप, आंतरिक तप, बाहेर नाही दिसत या सर्वांचे फळ मोक्ष.
ह्या साध्वीजींना काय करायला पाहिजे. साध्वीजी जाणत असतात की स्वत:ला कषाय (क्रोध-मान-माया-लोभ) होत असतात, पूर्ण दिवस कषाय होत असतात. तर त्यांनी काय करायला पाहिजे? संध्याकाळी बसून एक पूर्ण गूणस्थान (४८ मिनिट) हे सर्व कषाय भाव झाले, ह्यांच्या बरोबर हा कषाय भाव झाला, ह्यांच्या बरोबर हा कषाय भाव झाला, असे त्या सर्वांनी एकत्र बसून प्रतिक्रमण करायचे, त्यांच्याच बरोबर. एकचित्तने प्रत्याख्यान करायचे की, पुन्हा असे नाही करणार, तर त्या मोक्ष मार्गवर चालल्या आहेत. *निर्जरा : (बांधलेले कर्म उदयात येवून पूर्ण होतात)
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
असे तर काही करत नाही त्या बिचाऱ्या, तर कसे होईल? असा मोक्षमार्ग समजून घेतला तर त्याच्यावर चालू शकणार ना! समजण्याची जरूरी आहे.
प्रश्नकर्ता : जो पर्यंत त्याची प्रत्यक्ष क्षमा मागत नाही तो पर्यंत त्याच्यात अढी तर राहीलच ना! म्हणून प्रत्यक्ष क्षमा तर मागितलीच पाहिजे ना?
दादाश्री : प्रत्यक्ष क्षमा मागण्याची जरूरीच नाही. भगवंताने नाही सांगितले आहे. प्रत्यक्ष तर तुम्ही क्षमा मागायला जा, जर तो चांगला माणूस असेल तर, त्याची क्षमा मागायला जा आणि कमजोर माणसाची क्षमा मागायला जाशील तर तो डोक्यावर चापट मारेल. आणि तो कमजोर माणूस जास्त कमजोर होईल. म्हणून प्रत्यक्ष नका करू, जर प्रत्यक्ष करायचीच असेल तर खूपच भला माणूस असेल तरच करा. कमजोर असेल तर तो बदल्यात मारेल. आणि जग सर्व कमजोरच आहे. बदल्यात चापट मारणार. 'हं, मी सांगत होते ना, तू समजत नव्हती, मानत नव्हती, आता आली ठिकाणावर' अरे मेल्या, ती ठिकाणावरच आहे, ती बिघडलेली नाही, तू बिघडलेली आहे, ती सुधरलेली आहे, सुधरत आहे.
___ मोक्षमार्गात क्रियाकांड वगैरे असे काही होत नसते.फक्त संसारमार्गात क्रियाकांड होत असतात. संसारमार्ग म्हणजे, ज्यांना भौतिक सुख पाहिजे, दसरे काही पाहिजे, त्यासाठी क्रियाकांड आहे, मोक्षमार्गात असे काही नसते. मोक्षमार्ग म्हणजे काय? आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान. चालवितच जायची गाडी. तोच आपला हा मोक्षमार्ग आहे. त्यात क्रियाकांड आणि असे सर्व नाही होत ना!
आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान तोच हा मोक्षमार्ग. किती तरी अवतारापासून आमची ही लाइन, किती तरी अवतारापासून आलोचनाप्रतिक्रमण-प्रत्याख्यान करता करता येथपर्यंत आलो आहोत.
कषाय नाही करायचे आणि प्रतिक्रमण करायचे, हे दोनच धर्म आहेत. कषाय नाही करायचे हा धर्म आहे. आणि जर पूर्वकर्मानुसार कषाय होऊन गेला तर त्याचे प्रतिक्रमण करायचे हाच धर्म आहे. बाकी दुसरी काही
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
१९
धर्म सारखी वस्तू नाही. आणि हे दोन आयटमच या सर्व लोकांनी काढून टाकले आहेत!!
जर तुम्ही त्यांना उलटे बोललात तर त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल, पण त्यांना सुद्धा तुमचे प्रतिक्रमण करावे लागेल. त्यांना कशाचे प्रतिक्रमण करावे लागेल की, 'मी कधी चुक केली असेल म्हणूनच यांना मला शिवीगाळ करण्याचा प्रसंग उत्पन्न झाला?' म्हणजे त्यांना त्यांच्या चुकीबद्दल प्रतिक्रमण करावे लागणार. त्यांना त्यांचे पूर्व अवतारचे प्रतिक्रमण करावे लागणार आणि तुम्हाला ह्या अवतारचे प्रतिक्रमण करावे लागणार! असे प्रतिक्रमण दिवसातून पाचशे-पाचशे केले तर मोक्षाला जाईल!
जर एवढेच केले तर दुसरा कोणता धर्म शोधला नाही तरी काही हरकत नाही. एवढे पालन केले तरी पुरे आहे, आणि मी तुला गॅरंटी देत आहे, तुझ्या डोक्यावर हात ठेवत आहे, जा, मोक्षासाठी, शेवट पर्यंत मी तुला सहकार्य देणार! तुझी तयारी पाहिजे. एकच शब्दाचे पालन केले तरी खूप झाले!
५. अक्रम विज्ञानची रीत आपले अक्रम विज्ञान काय म्हणते? त्याला विचारले की, 'तू खूप दिवसापासून चोरी करत आहेस?' तेव्हा तो म्हणतो की, 'होय'. प्रेमाने विचारले तर सर्व सांगेल, 'किती वर्षापासून करत आहेस?' तर तो सांगेल, 'दोन-एक वर्षापासून करत आहे?' मग आम्ही सांगतो, 'चोरी करतो आहेस त्यात काही हरकत नाही' असे त्याच्या डोक्यावर हात फिरवून सांगणार ‘पण प्रतिक्रमण कर, जा एवढे'.
प्रतिक्रमण केले म्हणून चोरी सर्व पुसली गेली. अभिप्राय बदलला. आता तो जे करत आहे त्यात स्वत:चा अभिप्राय एक्सेप्ट (स्वीकार) नाही करत. नोट हिज ओपिनियन (स्वत:चा अभिप्राय नाही)!
दादाचे नांव घेऊन नंतर त्याचा पस्तावा कर. आता पुन्हा नाही करणार, चोरी केली, हे चुकीचे केले. आणि पुन्हा तसे करणार नाही, असे त्याला शिकवतो!
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
असे त्याला शिकवल्या नंतर परत त्याचे आई-वडील काय म्हणतात ? ‘पुन्हा चोरी केली?' अहो, पुन्हा चोरी केली तरी पण तेच बोलायचे ते बोलण्याने काय होत असते ते मी जाणतो. त्या शिवाय सुटका नाही.
२०
अर्थात् अक्रम विज्ञान असे शिकवत आहे की हे बिघडलेले आहे ते तर सुधरणार नाही, पण या पद्धतिने त्याला सुधारा.
सर्व धर्म सांगतात की 'तुम्ही तपचे कर्ता आहात, त्यागचे कर्ता आहात. तुम्हीच त्याग करत आहे. तुम्ही त्याग करत नाही. 'करत नाही' बोलणे हे पण ' करत आहे' बोलले समान आहे. अशाप्रकारे कर्तापणा च स्वीकारत आहे आणि सांगतात, 'माझ्याने त्याग होत नाही' हे पण कर्तापणा आहे. आणि कर्तापणाच्या स्वीकार तो सर्व देहाध्यासी मार्ग आहे. आम्ही कर्तापणा स्वीकारतच नाही. आमच्या पुस्तकात कुठेही 'असे करा' असे लिहिलेले नसणार.
अर्थात्, करायचे ते राहून गेले आणि 'नाही करायचे' ते करायला सांगतात. तसे तर ‘नाही करायचे' ते ही शक्य होत नाही, होणार पण नाही आणि विनाकारण वेस्ट ऑफ टाईम एन्ड एनर्जि (समय आणि शक्तिचे व्यय). करायचे आहे ते वेगळे च आहे. जे करायचे आहे ते तर तुम्हाला शक्ति मागायची आहे. आणि पूर्वी जी शक्ति मागितली आहे त्याप्रमाणे आता होत आहे.
प्रश्नकर्ता : पूर्वीचे तर इफेक्टमध्ये (परिणाम) आलेले आहे.
दादाश्री : हो, इफेक्टमध्ये आले. अर्थात् कोझीझ (कारण) रूपी तुम्हाला शक्ति मागायची आहे. आम्ही नऊ कलमांत जशी शक्ति मागण्याचे सांगितले आहे, अशी शंभर-दोनसे कलमे लिहलीत तर त्यात पूर्ण शास्त्र समावून जाईल. एवढेच करायचे. दुनियेत करायचे केवढे ? एवढेच, शक्ति मागायची, कर्ताभावे करायचे असेल तर.
प्रश्नकर्ता : ही शक्ति मागण्याची गोष्ट आहे ना?
दादाश्री : हा, कारण की सर्व मोक्षात थोडे जातात? ! पण कर्ताभावने
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
करायचे असेल तर एवढे करा, शक्ति मागा. शक्ति कर्ताभावने मागा असे म्हटले आहे.
प्रश्नकर्ता : अर्थात्, ज्ञान घेतले नाही त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे ?
दादाश्री : हा, ज्ञान नाही घेतले असेल. जगाच्या लोकांसाठी आहे. बाकी आता ज्या मार्गाने लोक चालत आहेत ना, तो पूर्णतः उलटा मार्ग आहे. म्हणून ते कोणत्याही माणसाला जरा सुद्धा हितकारी होत नाही.
'करायचे आहे पण होत नाही' कर्मचा उदय वक्र असेल तर काय होणार? भगवानने तर असे सांगितले होते की उदय स्वरूपात राहून त्याला जाणायचे. करण्याचे नाही सांगितले होते. त्याला जाणा' एवढेच सांगितले होते. तेव्हा तुम्ही तर 'हे केले, पण होत नाही, करत आहे पण होत नाही. खूपच इच्छा आहे पण होत नाही' असे बोलत आहात. अरे, पण त्याला का गा-गा करत आहे, फालतू विना कामाचे. 'माझ्याने होत नाही, होत नाही.' असे चिंतन केल्याने आत्मा कसा होऊन जाणार? दगड होऊन जाणार. आणि हा तर क्रियाच करायला जात आहे. आणि सोबत होत नाही, होत नाही, होत नाही बोलत आहे.
मी सांगत आहे की नाही बोलायचे, अरे, ‘होत नाही' असे तर बोलायचेच नाही. तू तर अनंत शक्तिवाला आहे, आम्ही समजावल्यानंतर 'मी शक्तिवाला आहे' बोलतो. नाहीतर आता पर्यंत होत नाही' असेच बोलत होता! अनंत शक्ति कुठे निघून गेली आहे का?!
कारण की माणूस करू शकेल असा नाही. मनुष्य स्वभाव करू शकेल असा नाही. करणारी परसत्ता आहे. हे जीव फक्त जाणणारेच आहेत. म्हणून तुम्हाला हे जाणत राहायचे आहे, आणि तुम्ही हे जाणले तर जी चुकीची श्रद्धा बसली होती ती उडून जाणार. आणि तुमच्या अभिप्रायमध्ये बदल होणार. काय बदल होणार? 'खोटे बोलणे चांगले आहे', हा अभिप्राय उडून जाणार. हा अभिप्राय उडाला त्याचा सारखा कोणताच पुरुषार्थ नाही ह्या दुनियेत. ही गोष्ट सूक्ष्म आहे, पण खूप खूप विचार करणे योग्य आहे.
प्रश्नकर्ता : नाही, पण गोष्ट लॉजिकल (तार्किक) आहे.
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दादाश्री : संडास जाण्याचे पण परसत्तेच्या हातात आहे तर करण्याचे तुमच्या हातात कसे काय होऊ शकते? कोणीही माणूस असा जन्मला नाही की ज्याच्या हातात काहीपण करण्याची सत्ता असेल. तुम्हाला जाणायचे आहे आणि निश्चय करायचा आहे, एवढेच करायचे आहे तुम्हाला. ही गोष्ट समजेल तर काम होऊन जाणार, पण ती लगेच समजेल एवढी सोपी गोष्ट नाही. तुम्हाला ह्यातले काही समजले का? काही करण्या ऐवजी जाणणे चांगले? करणे त्वरित होऊ शकते?
प्रश्नकर्ता : आपण जे सांगत आहात ते समजले. गोष्ट बरोबर आहे पण हे समजल्यावर पण करायचे तर आहेच ना? जशी करण्याची सत्ता नाही तशी जाणण्याची पण सत्ता नाही ना?
दादाश्री : नाही, जाणण्याची सत्ता आहे. करण्याची सत्ता नाही. ही खूप सूक्ष्म गोष्ट आहे. ही एवढी गोष्ट जर समजली तर खूप होऊन गेले.
एक मुलगा चोर झाला. चोरी करतो, संधी मिळाल्यावर लोकांचे पैसे चोरतो. घरी पाहुणे आले असतील तर त्यांनाही सोडत नाही.
आता त्या मुलाला काय शिकवणार आम्ही? की तू दादा भगवानपासून चोरी नाही करण्याची शक्ति माग, या जन्मात...
__ आता याच्यात त्याला काय लाभ झाला? कोणी म्हणेल, 'याच्यात काय शिकविले?' तो तर शक्ति मागतच राहातो. आणि पुन्हा चोरी पण करत राहातो. अरे, भले चोरी करत असेल, पण तो (चोरी नाही करण्याची) अशी शक्ति मागतो की नाही? होय, शक्ति तर मागत असतो. तर आम्ही जाणतो की हे औषध काय काम करत आहे. तुम्हाला काय माहित होणार की हे औषध काय काम करत आहे !
प्रश्नकर्ता : खरे आहे. जग हे जाणत नाही की औषध काय काम करत आहे. म्हणून मागण्याने लाभ होत आहे की नाही हे पण नाही समजत.
दादाश्री : अर्थात् याचा भावार्थ काय आहे? की एक तर तो मुलगा मागतो की मला चोरी नाही करायची शक्ति द्या. म्हणजे एक तर त्याने आपला अभिप्राय बदलून टाकला. 'चोरी करणे ही चुकीची गोष्ट आहे,
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
आणि चोरी करायची नाही ही चांगली गोष्ट आहे.' अशी तो शक्ति मागत आहे म्हणजे च चोरी नाही करायची ह्या अभिप्राय वर आला. सर्वात महत्वाचे हा अभिप्राय बदलला ते आहे! ___ आणि अभिप्राय बदलला तेव्हापासून तो गुन्हेगार होण्याचा थांबला.
मग दूसरे काय झाले? भगवंतापासून शक्ति मागत आहे म्हणून त्याचा परम विनय प्रकट झाला. हे भगवंत, शक्ति द्या. म्हणून ते त्वरित शक्ति देतात, सुटकाच नाही ना! सर्वांना देत असतात. मागणारे पाहिजेत. म्हणून तर सांगतो की मागायचे नाही विसरायचे. तुम्ही तर काही मागतच नाही. कधीच मागत नाही.
शक्ति मागायची ही गोष्ट तुम्हाला समजली?
दादांजवळ माफी मागावी, त्याचबरोबर ज्या वस्तूसाठी माफी मागतो त्यासाठी मला शक्ति द्या, दादा शक्ति घ्या. अशी शक्ति मागून घ्या, तुमची स्वतःची शक्ति खर्च करू नका. नाहीतर तुमची शक्ति संपून जाईल. आणि मागितलेली वापरणार तर संपणार नाही आणि वाढणार, तुमच्या दुकानात किती माल (शक्ति) असणार?
प्रत्येक बाबतीत दादा, मला शक्ति द्या. प्रत्येक बाबतीत शक्ति मागूनच घ्यावी. प्रतिक्रमण करायचे चूकले तर, मला योग्य पद्धतिने प्रतिक्रमण करण्याची शक्ति द्या. सर्व शक्ति मागूनच घ्यायच्या. आमच्या कडे तर तुम्ही मागणे विसराल एवढी शक्ति आहे.
६. राहतील फूल, जातील काटे... प्रकृति क्रमणने उत्पन्न झाली आहे, पण अतिक्रमणने पसरत जाते, तिच्या फांद्या-बिंद्या सर्व! आणि प्रतिक्रमणाने ते सर्व पसरलेले कमी होऊन जाते, म्हणून त्याला भान येते.
म्हणजे मला काय सांगायचे आहे की, आता आपण एखाद्या ठिकाणी दर्शनासाठी गेलो, आणि तेथे माहिती झाले की आमची धारणा ज्ञानीची होती पण निघाला ढोंगी! आपण तेथे गेलो ते तर प्रारब्धचा खेळ आहे, आणि तेथे मनात त्याच्या प्रति जे खराब भाव आले की अरेरे, अशा नालायकाकडे
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
२४
प्रतिक्रमण
का आलो? तो निगेटिव (निषेधात्मक) पुरुषार्थ आपल्या आत झाला आहे, त्याचे फळ आपल्याला भोगावे लागेल, त्याला नालायक बोलण्याचे फळ आपल्याला भोगावे लागेल, पाप भोगावे लागेल. आणि विचार येणे हे स्वभाविक आहे, पण त्वरित आतमध्ये काय करायला हवे? की अरेरे, मला कशासाठी असा गुन्हा करायला हवा? असे लगेच, चांगला विचार करून आपण पुसून टाकायला पाहिजे.
हो, 'महावीर' भगवानां चे स्मरण करून अथवा अन्य कोणाचे स्मरण करून, 'दादाचे' स्मरण करून, प्रतिक्रमण करून घ्याला पाहिजे की अरेरे ! तो कसा पण असो, माझ्या हातून का उलटे झाले? चांगल्याला चांगले म्हणणे हा दोष नाही, पण चांगल्याला वाईट म्हणणे हा दोष आहे आणि वाईटास वाईट म्हणणे पण जबरदस्त दोष आहे, जबरदस्त दोष कारण की वाईट तो स्वतः नाही! त्याच्या प्रारब्धाने त्याला वाईट बनविले आहे. तो स्वतः वाईट नाही. प्रारब्ध म्हणजे काय? त्याच्या संयोगा ने त्याला वाईट बनविले, यात त्याचा काय गुन्हा?
येथून सर्व स्त्रीयां जात असतील, त्यावेळी कोणी आपल्याला दाखवतो की, ती पहा वेश्या, येथे आली आहे, कुठून आली? असे तो म्हणेल, तेव्हा आपण पण त्याचे ऐकून तिला वेश्या म्हटले, तर आपल्याला भयंकर गुन्हा लागणार. ती म्हणते की, संयोगामुळे माझी ही परिस्थिती झाली आहे, तुम्ही का गुन्हा करत आहात? मी तर माझे फळ भोगत आहे, परंतु तुम्ही सुद्धा का गुन्हा करत आहात? ती काय वेश्या आपणहून झालेली आहे? संयोगांनी बनविले आहे. कोणत्याही जीवमात्रास वाईट होण्याची इच्छा होत च नाही. संयोगच करवितात सर्व आणि नंतर त्याची प्रेक्टिस (सवय) होऊन जाते. सुरूवात संयोग करवितात.
प्रश्नकर्ता : ज्यांना ज्ञान नाही, ते अमूक प्रकारचेच दोष पाहू शकतात?
दादाश्री : ते बस एवढेच, दोषाची माफी मागणे शिका एवढेच संक्षिप्त मध्ये सांगायचे. जो दोष तुम्हाला दिसला, त्या दोषाची माफी मांगायची आणि तो दोष बरोबर आहे असे कधीही नाही बोलायचे नाहीतर तो डबल होणार. चुक केल्या नंतर त्याची क्षमा मागून घ्यावी.
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : ज्यांनी ज्ञान घेतले नाही, त्यांना स्वत:च्या चूकां दिसतात, तर त्यांनी कशाप्रकारे प्रतिक्रमण करायचे?
दादाश्री : ज्ञान घेतले नसेल तरी पण अशी माणसे असतात. थोडी जागृत माणसे की, जे प्रतिक्रमण समजतात, ते हे करतात. दुसऱ्या लोकांचे हे कामच नाही, पण प्रतिक्रमण शब्दाचा अर्थ आपण त्यांना पश्चाताप करणे असे सांगायचे.
प्रतिक्रमण केल्याने काय होते की आत्मा आपल्या 'रिलेटिव' वर आपला दबाव टाकतो आणि अतिक्रमण म्हणजे काय झाले की 'रियल' वर दबाव टाकतो. जे कर्म अतिक्रमण आहे, आणि आता त्यात 'इंटरेस्ट' (रस) पडून गेला तर परत खाच पडल्यागत होते. जो पर्यंत आपण चुकीला चुक मानत नाही, तो पर्यंत गुन्हा आहे. म्हणून हे प्रतिक्रमण करण्याची जरूरी आहे.
प्रश्नकर्ता : माझ्याकडून अतिक्रमण होऊन गेले, त्याचे मी प्रतिक्रमण केले, पण समोरच्याने मला माफ नाही केले तर?
दादाश्री : समोरच्याचे पाहायचे नाही. तुम्हाला कोणी माफ करो की न करो, ते पाहण्याची गरज नाही. तुमच्यातून हा अतिक्रमण स्वभाव उडून जायला पाहिजे. तुम्ही अतिक्रमणच्या विरूद्ध आहे, असे होऊन जायला पाहिजे.
प्रश्नकर्ता : आणि समोरच्याला दु:ख रहातच असेल तर?
दादाश्री : समोरच्याचे काहीच पाहायचे नाही. तुम्ही अतिक्रमणच्या विरूद्ध आहात असे पक्के व्हायला पाहिजे. तुम्हाला अतिक्रमण करण्याची इच्छा नाही. तरी आता होऊन गेले त्यासाठी पस्तावा होत आहे. आणि आता तुम्हाला पुन्हा तसे करण्याची इच्छा नाही.
प्रतिक्रमण तर आम्हाला हे अभिप्राय काढण्यासाठी करायचे आहे. आता आपण या मतात राहिलो नाही. आपण या मताच्या विरूद्ध आहोत. असे दर्शविण्यासाठी प्रतिक्रमण करायचे आहे. तुला काय समजले?
प्रश्नकर्ता : जर हे निकाली आहे तर मग प्रतिक्रमण कशासाठी?
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दादाश्री : सर्वच निकाली आहे, एकच नाही, सर्वच निकाली आहे. प्रतिक्रमण तर अतिक्रमण केले, म्हणूनच प्रतिक्रमण करायचे, दुसरे नाही, आणि नाही केले तर आपला स्वभाव कधीच बदलणार नाही, तसाचा तसा राहिल ना! तुम्हाला समजले की नाही समजले?
विरोधी सारखे जाहीर नाही झाले तर मग हे मत तुमच्या जवळ राहणार. क्रोध झाला तर आपण क्रोधच्या पक्षात नाही, त्याकरिता प्रतिक्रमण करायचे आहे. नाहीतर क्रोधच्या पक्षात आहोत असे निश्चत होईल. आणि प्रतिक्रमण केले तर आम्ही क्रोधच्या पक्षात नाही आहोत असे जाहीर झाले. अर्थात् त्यातून आपण सुटलो. मुक्त झालो आपण, जबाबदारी कमी झाली. आम्ही त्याचे विरूद्ध आहोत. असे जाहीर करण्यासाठी काही साधन असायला पाहिजे ना? क्रोध आपल्याला काढायचा आहे की ठेवायचा आहे?
प्रश्नकर्ता : ते तर काढायचे आहे.
दादाश्री : जर काढायचे आहे तर प्रतिक्रमण करा. तर मग तुम्ही क्रोधच्या विरोधी आहात भाऊ, नाहीतर क्रोधाशी सहमत आहात, जर प्रतिक्रमण नाही केले तर.
प्रतिक्रमण केव्हा म्हटले जाते, आतून ओझे हलके झाल्या सारखे वाटते, हलके हलके वाटते. पुन्हा ते दोष करतांना त्याला खूप कष्टदाई लागते. आणि हा तर अतिक्रमण करून दोषांचे गुणाकार करत आहे!!
तुम्ही कधी प्रतिक्रमण, खरे प्रतिक्रमण पाहिले, एकतरी दोष कमी झाला असेल असे?
प्रश्नकर्ता : नाही, ते येथेच पहायला मिळाले?
दादाश्री : ज्ञान घेतल्या नंतर आपल्याला आत समज पडते की, दोष झाला आहे हा, तेव्हा प्रतिक्रमण होणार, तो पर्यंत प्रतिक्रमण होणार नाही ना! ज्ञान घेतल्या नंतर त्याची जागृति राहते, अतिक्रमण झाले की लगेच तुम्हाला माहित पडणार, की ही चुक झाली म्हणून लगेचच तुम्ही प्रतिक्रमण करणार. त्याच्या नांवाचे सर्व पद्धतसरचे प्रतिक्रमण होतच राहणार. आणि प्रतिक्रमण झाले म्हणजे धुतले गेले. धुतले गेले म्हणून मग समोरच्याशी डंख
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
(वैरभाव) राहात नाही. नाहीतर आपण पुन्हा त्याला भेटलो तर त्याच्याशी भेद पडत जातो.
२७
प्रश्नकर्ता : आमच्या पापकर्मांना आता कशाप्रकारे धुवायचे ?
दादाश्री : पाप कर्मांचे जेवढे डाग लागलेले असतील तेवढे प्रतिक्रमण करायचे. जर डाग चिकट असेल तर त्याला पुन्हा पुन्हा धुवायचे, सारखे धूवतच रहायचे.
प्रश्नकर्ता : तो डाग निघाला की नाही निघाला, हे कशाप्रकारे माहित
पडेल?
दादाश्री : हे तर आत मन साफ होते त्याच्याने माहित पडून जाते. चेहरा प्रसन्न होऊन जातो. तुम्हाला माहित पडणार की डाग निघून गेला ? का माहित नाही होणार? हरकत काय आहे? आणि नाही धुतले गेले तरी आपल्याला हरकत नाही. तु प्रतिक्रमण कर ना ! तु साबण टाकत च जा ना! पापाला तु ओळखतो? खरोखर पापाला तु ओळखत आहे का ?
प्रश्नकर्ता : दादांची आज्ञा नाही पाळली म्हणजे पाप ?
दादाश्री : नाही, असे नाही, त्याला पाप नाही म्हणत. समोरच्याला दुःख झाले ते पाप; कोणत्याही जीवास, तो मग मनुष्य असो की जनांवर असो की झाड असो. झाडाची पण विनाकारण पाने तोड-तोड केली तर त्याला पण दुःख होते, म्हणून त्याला पाप म्हणतात.
आणि आज्ञा पालन नाही झाले तर तुमचेच नुकसान होणार. तुमचे स्वत:चेच नुकसान होणार. पापकर्म, तर कोणाला दुःख दिले ते, अर्थात् जरा सुद्धा, किंचित्मात्र पण दुःख नाही व्हावे असे व्हायला पाहिजे.
आपण प्रतिक्रमण केले तर खूपच चांगले. आपले कपडे (दोषरूपी डाग) स्वच्छ होणार ना? आपल्या कपड्यात मळ कशासाठी राहू द्यायचा? दादाने असा मार्ग दाखवला आहे, तर का नाही स्वच्छ करून टाकावे ? !
कोणाला आपल्याकडून किंचित्मात्र पण दुःख झाले तर समजायचे ती चुक आपलीच आहे. आपल्या आत काही वर-खाली परिणाम झाला
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
म्हणजे चुक आपलीच आहे असे समजायचे. समोरची व्यक्ति भोगते आहे म्हणजे त्याची चुक तर प्रत्यक्ष आहेच पण निमित्त आपण झालो, आपण त्याला दटवले म्हणून आपली पण चुक. दादांना का भोगावे लागत नाही? कारण की त्यांची एकपण चुक राहिली नाही. आपल्या चुकीने समोरच्याला काही पण परिणाम झाला, जर काही उधारी झाली तर त्वरितच मनापासून माफी मागून जमा करून घेणे. आपली चुक झाली असेल ती उधारी झाली पण त्वरितच रोख प्रतिक्रमण करून टाकायचे. आणि जर कोणाकडून आपली चुक झाली तरी पण आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान करून घ्यावे. मन-वचन-कायाने, प्रत्यक्ष दादा भगवानच्या साक्षीने, क्षमा मागत च राहायचे.
२८
प्रश्नकर्ता : क्रमिकचे प्रतिक्रमण करत होतो तेव्हा डोक्यात काहीच बसत नव्हते पण आता हे प्रतिक्रमण करतो तर हलके-फुलके झाल्या सारखे वाटते.
दादाश्री : पण ते (खरे) प्रतिक्रमणच नाही ना ! ते तर सर्व तुम्ही न समजल्यामुळे उभे केलेले प्रतिक्रमण ! प्रतिक्रमण म्हणजे त्वरितच दोष कमी व्हायला हवे. आपण उलट गेलेलो, तर परत फिरलो त्याचे नांव प्रतिक्रमण. हा तर परत फिरलाच नाही आणि तेथल्या तेथेच आहे ! तेथून पुढे गेला आहे उलट !!! अर्थात् त्याला प्रतिक्रमण कसे म्हटले जाईल?
जेव्हा जेव्हा गुंता पडण्या सारखे वाटेल तेव्हा अवश्य दादाची आठवण येईलच, आणि गुंता पडणार नाही. आम्ही काय सांगतो की गुंता पाडू नका. आणि त्यातून जर कधी गुंता पडला तर प्रतिक्रमण करायचे. असा गुंता शब्द येथे लगेच समजेल. ही लोक 'सत्य, दया, चोरी नाही करायची' हे ऐकून ऐकून तर थकून गेले.
गुंतागुंतीत तसेच झोपून नाही जायचे. आत गुंता असेल तर तो तसाच ठेवून झोपून नाही जायचे. गुंता सोडवायला हवा. शेवटी काही उलगडा होत नसेल तर भगवंताकडे सतत माफी मागायची की ह्याचा बरोबर गुंता पडला आहे त्यासाठी खूप माफी मागत आहे. तरीपण उलगडा होणार. माफी हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. बाकी दोष तर निरंतर होतच राहतात.
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
समोरच्याला दटावत असतो तेव्हा तुमच्या लक्षात असे येत नाही की जर तुम्हाला तसे दटावले, तर कसे वाटेल? असे लक्षात ठेवून दटवायचे.
त्याचे नांव मनुष्य अहंकार. समोरच्याची काळजी ठेवून प्रत्येक कार्य करणे त्याचे नांव मनुष्य अहंकार, स्वत:चीच काळजी ठेवून प्रत्येकांबरोबर वर्तन करायचे आणि त्रास द्यायचा, तर त्याचे नांव काय म्हणायचे?
प्रश्नकर्ता : पाशवी अहंकार.
दादाश्री : कोणी असे बोलले की 'तुझी चुक आहे' तर आपण पण सांगायचे 'चंदुभाई तुमची चुक झाली असेल म्हणून च तो बोलत असेल ना? नाहीतर असेच विनाकारण कोणी म्हणेल का?' विनाकारण कोणी म्हणत नाही. काही तरी चुक झाली असेल च. तर मग आपण स्वत:ला सांगायला हरकत काय? भाऊ, तुमची काहीतरी चुक असेल म्हणून सांगत असेल. त्यासाठी माफी मागून घे, आणि 'चंदुभाई' कोणास दुःख देत असेल तर आपण सांगावे प्रतिक्रमण करून घे बाबा. कारण की आपल्याला मोक्षात जायचे आहे. आता वाटेल तसे वागाल तर ते चालणार नाही.
दुसरांचे दोष पाहण्याचा अधिकारच नाही. म्हणून त्या दोषची माफी, क्षमा, प्रतिक्रमण करणे. परदोष पाहण्याची तर त्याला पहिल्यापासून सवय होतीच ना, त्यात नवीन काय आहे. ती सवय सुटणार नाही एकदम. ती तर या प्रतिक्रमणने सुटणार मग. जेथे दोष दिसला, तेथे प्रतिक्रमण करा. शूट ऑन साईट!
प्रश्नकर्ता : अजून प्रतिक्रमण केले पाहिजे ते होत नाही. दादाश्री : ते तर, जे करायचे आहे ना, त्याचा निश्चय करावा लागतो.
प्रश्नकर्ता : निश्चय करणे अर्थात् करण्याचा अहंकार आला ना मग ? ही काय वस्तु आहे? ती जरा समजवा.
दादाश्री : बोलण्यासाठी आहे, बोलणे मात्र आहे.
प्रश्नकर्ता : बरेच महात्मा असे समजतात की, आपल्याला काही करायचेच नाही, निश्चय सुद्धा नाही करायचा.
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
३०
प्रतिक्रमण
दादाश्री : नाही, मला विचारले तर मी त्यांना सांगणार की, निश्चय म्हणजे काय डिसायडेडपूर्वक करायचे. डिसायडेड म्हणजे काय? हे नाही, पण हे. असे नाही पण असे असायला पाहिजे, एवढेच.
प्रश्नकर्ता : आत उत्पात झाला असेल, तेव्हा 'शूट ऑन साईट' ने त्याचा निकाल नाही करता आला, पण संध्याकाळी दहा-बारा तासानंतर असा विचार आला की, हे सर्व चुकीचे झाले तर त्याचा निकाल होऊन जातो का? उशीराने असे झाले तर?
दादाश्री : हा, उशीर झाला तर त्याचे प्रतिक्रमण करायला पाहिजे, चुक झाल्या नंतर प्रतिक्रमण करायचे की, 'हे दादा भगवान! ही माझी चुक झाली, आता पुन्हा नाही करणार.'
लगेच नाही झाले तर दोन तासानंतर करा. अरे, रात्री करा, रात्री आठवणीने करा. रात्री आठवण करूनही नाही होत, की आज कोणाबरोबर आदळ-आपट झाली ते? असे रात्री नाही होत? अरे, आठवड्याने करा. आठवड्याचे सर्व एकत्र करा, आठवड्यात जेवढे अतिक्रमण झाले असतील त्या सर्वांचे एकत्र हिशोब करा.
प्रश्नकर्ता : पण ते लगेच व्हायला पाहिजे ना?
दादाश्री : लगेच झाले तर त्याच्या सारखी गोष्टच नाही. आपल्या येथे बहुतेक, सर्वच 'शूट ऑन साईट' च करत असतात. (दोष)पहाल तेथे ठार करा. पहाल तेथे ठार.
प्रश्नकर्ता : मी जेव्हा दादांचे नांव घेतो अथवा आरती करतो, तरी सुद्धा मन इतरत्र भटकत असते. मग आरतीत काही दुसरेच गातो, ओळ दुसरीच गायला लागतो. मग तन्मयाकार होऊन जातो. विचार येतात त्यात तन्मयाकार होऊन जातो. नंतर थोड्या वेळ्याने त्यात परत येऊन जातो.
दादाश्री : असे आहे, की मग त्या दिवशी प्रतिक्रमण करायचे. विचार आले तरी काही हरकत नाही. विचार येतात त्यावेळी आपण 'चंदुलाल'ला वेगळे पाहू शकत असतो, की 'चंदुलाल'ला विचार येत आहेत, हे सर्व पाहू शकत असतो, तर आपण आणि ते, दोघेही वेगळेच आहोत, पण त्यावेळी थोडे कच्चे पडून जातो.
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
३१
प्रश्नकर्ता : जागृतिच नाही रहात त्यावेळी.
दादाश्री : तर त्याचे प्रतिक्रमण करून घ्यायचे की ही जागृति नाही राहिली, त्याबद्दल प्रतिक्रमण करीत आहे, दादा भगवान क्षमा करावी.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण करण्याचे बऱ्याच उशीराने आठवते की, या माणसाचे प्रतिक्रमण करायचे होते.
दादाश्री : परंतु आठवते खरे ना? सत्संगमध्ये जास्त बसण्याची जरूरी आहे. सर्व विचारून घ्यायला पाहिजे बारकाईने, हे विज्ञान आहे. सर्व विचारून घेणे आवश्यक आहे.
दोष दिसणे ही सोपी वस्तु नाही ! पुन्हा आम्ही तर एकदम उघड करून देतो, पण त्याची दृष्टि असेल की मला पाहायचे आहे तर दिसत राहणार. अर्थात् स्वत:ला जेवण्याच्या थाळीतला हात स्वतःच वर करावा लागेल ना? असेच्या असे, जेवण माझ्या तोंडात जावे !! अशी इच्छा केल्याने काही होईल? प्रयत्न तर व्हायलाच पाहिजे ना !
मनुष्याचा दोष होणे स्वाभाविक आहे. त्यापासून विमुक्त होण्याचा मार्ग काय? फक्त ‘ज्ञानीपुरुष' च ते दाखवितात, 'प्रतिक्रमण'.
आतमध्ये प्रतिक्रमण आपणहून होतच असते. लोक म्हणतात, असेच आपणहून प्रतिक्रमण होत असते? मी म्हणतो, 'हो', तर असे कोणते मशीन मी लावले आहे? त्यामुळे प्रतिक्रमण चालू होऊन जातात. तुमची नियत ठाम असेल तर सर्व तयार असेल.
प्रश्नकर्ता : हो, अशी वस्तुस्थिति आहे दादाजी, प्रतिक्रमण सहज होत असते. आणि दुसरे हे विज्ञान असे आहे की जरा सुद्धा द्वेष नाही होत. प्रश्नकर्ता : हे भाऊ म्हणतात की, माझ्या सारख्यांकडून प्रतिक्रमण नाही होत त्याला काय म्हणावे?
दादाश्री : हे तर आतमध्ये होतही असेल पण लक्षात नाही येत. पण एकदा बोलले की, 'माझ्याने नाही होत' त्यामुळे ते बंद होऊन जाते. मशीन बंद होते. जसे भजे तशी भक्ति, हे तर आतमध्ये होत असते. ठराविक वेळेनंतर होईल.
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : आपल्याकडून कोणास दुःख दिले गेले ते आपल्याला आवडत नाही. बस एवढेच राहते. मग ह्याहून पुढे जात नाही. प्रतिक्रमण सारखे काही होत नाही.
३२
दादाश्री : हे तर आपण जसे बोलू तसे आतमध्ये मशीन लावून ठेवलेले आहे, ते चालते ! जसे भजणार तसे होऊन जाते. तुम्ही म्हटले की, 'माझ्याने हे होत नाही' तर तसे होते. आणि म्हटले, 'एवढी सर्व प्रतिक्रमण होत आहेत की मी थकून जात असतो' तर तो आतमध्ये थकून जाणार. म्हणजे प्रतिक्रमण करणारा करीत आहे. तुम्ही तुमचे चालवत रहा. मग पुढे पाचशे पाचशे प्रतिक्रमण होत असतात. तुम्ही चालवत रहा की 'माझ्याने प्रतिक्रमण होत आहे. '
शक्य असेल तो पर्यंत ‘शूट ऑन साईट' करा. (दोष) होऊन गेले की लागलीच प्रतिक्रमण करणे. आणि नाही शक्य झाले तर सांयकाळी एकत्र करणे. पण तसे करतांना दोन-चार राहून जातील. त्यांना कुठे ठेवणार? ! आणि कोण ठेवणार त्यांना? हे तर 'शूट ऑन साईट'चा आपला धंदा आहे!!!
जेव्हापासून दोष दिसायला लागले, तेव्हापासून समजायचे की, मोक्षात जाण्याचे टिकिट मिळून गेले. स्वतःचे दोष कोणासही दिसत नाही. मोठे साधु-आचार्यंना सुद्धा स्वतःचे दोष नाही दिसत! मुळात सर्वात मोठी ही कमी आहे. आणि हे विज्ञान असे आहे की, हे विज्ञानच तुम्हाला निष्पक्षपात पद्धतिने जज्मेन्ट (निर्णय) देते. आपले सर्वच दोष उघड करून दाखवते. भले ही दोष होऊन गेल्यानंतर का असे ना, पण उघड करून दाखवते ना ! आता होऊन गेले ते होऊन गेले !! ती वेगळी गोष्ट आहे, गाडीचा स्पीड (वेग) जास्त असेल तर तो कापला जातो ना? पण तेव्हा माहित तर झाले ना !
७. होईल स्वच्छ व्यापार
प्रश्नकर्ता : तुम्ही चंदुभाईला अशा पद्धतिने मोकळीक दिली तर तो वाटेल ते करेल ?
दादाश्री : नाही. म्हूणनच मी ** व्यवस्थित शक्ति' म्हटले होते की,
रीझल्ट ऑफ सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स म्हणजेच
* व्यवस्थित शक्ति
वैज्ञानिक संयोगिक पुरावे एकत्र होवून आलेला परिणाम.
=
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
एक केस इतका फेरफार करण्याचा अधिकार एका जन्मासाठी नाही आहे. 'वन लाईफसाठी' हं!! ज्या लाईफमध्ये मी व्यवस्थित देत आहे. त्या व्यवस्थित मध्ये फेरफार होऊ शकेल असे नाही. तेव्हाच मी तुम्हाला मोकळीक दिली. अर्थात् मी पाहून सांगत आहे आणि त्यामुळे मला ओरडावे सुद्धा लागत नाही, की पत्नी बरोबर का फिरत होते? आणि का असे-तसे? मला काहीच ओरडावे लागत नाही. दुसऱ्या लाईफसाठी नाही, पण ह्या एक लाईफसाठी, यू आर नोट रिस्पोन्सिबल ऍट ऑल (तुम्ही किंचितही जबाबदार नाही). एवढे सर्व काही सांगितले आहे पुन्हा.
प्रश्नकर्ता : व्याज खायचे की नाही खायचे?
दादाश्री : व्याज चंदुलालला खायचे असेल तर खावू द्या, पण त्याला सांगायचे नंतर प्रतिक्रमण कर.
त्या प्रतिक्रमणाने समोरच्यावर परिणाम होतो, आणि तो पैसे परत करतो, समोरच्यामध्ये अशी सद्बुद्धि उत्पन्न होते. प्रतिक्रमणाने असा सुलटा परिणाम होतो. आपले लोक घरी जाऊन उधारीवाल्याला शिवीगाळ करतात तर त्याचा उलटा परिणाम होतो की नाही? उलट लोक गुंतागुंती वाढवतात. सर्व परिणामकारक संसार आहे.
प्रश्नकर्ता : आम्ही कोणी लेणदार चे प्रतिक्रमण करतो तरी सुद्धा तो मागत तर राहिल ना?
दादाश्री : मागणे-न-मागणे चा प्रश्न नाही. राग-द्वेष नाही व्हायला पाहिजे. घेणे तर राहीलही!
एकजण म्हणतो, 'मला धर्म नाही पाहिजे, भौतिक सुख पाहिजे आहे.' त्याला मी सांगणार, 'प्रामाणिक राहायचे, नीतिचे पालन करायचे.' मंदिरात जायला नाही सांगणार. दुसऱ्यांना तू देत आहे तो देवधर्म आहे. पण दुसऱ्यांचे बिनहक्काचे घेत नाही तो मानवधर्म आहे. अर्थात् प्रामाणिकता हा सर्वात मोठा धर्म आहे. 'डिसऑनेस्टी इज धी बेस्ट फूलीसनेस' (अप्रामाणिकता सर्वोत्तम मूर्खता आहे)!!! ऑनेस्ट (प्रामाणिक) होवू शकत नाही, तर मला काय समुद्रात पडावे? माझे
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
३४
प्रतिक्रमण
दादा शिकवतात की, डिसऑनेस्ट (अप्रामाणिक) झाले त्याचे प्रतिक्रमण कर. पुढचा जन्म तुझा उजाळून जाईल. डिसऑनेस्टीला, डिसऑनेस्टी जाण आणि त्याचे पश्चाताप कर. पश्चाताप करणारा मनुष्य ऑनेस्ट आहे हे नक्की आहे.
आता भागीदारा बरोबर मतभेद झाला, तर लगेच तुम्हाला जाणीव होते की, हे जरूरी पेक्षा जास्त बोलले गेले, म्हणून लगेच त्याच्या नांवाने प्रतिक्रमण करायचे. आपले प्रतिक्रमण कॅश पेमेंटचे (रोख) व्हायला पाहिजे. ही बँक पण कॅश म्हणतात, आणि पेमेंट पण कॅश म्हणतात.
ऑफिसमध्ये परमिट (परवाना) घ्यायला गेलेत, पण साहेबांनी नाही दिले तर मनात वाटते की, 'साहेब नालायक आहे, असा आहे, तसा आहे' आता त्याचे फळ काय येणार आहे ते माहित नाही. म्हणून हा भाव फिरवून टाका, प्रतिक्रमण करून टाकायचे. त्याला आम्ही जागृति म्हटले आहे.
या संसारात अंतराय (विघ्न) कशाप्रकारे येत असतात ते तुम्हाला समजावतो. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता, तेथे तुमच्या 'असिस्टन्ट' (सहायक)ला बेअक्कल बोललात, तोच तुमच्या अक्कलेवर अंतराय पडला ! बोला, आता या अंतरायने पूर्ण जग फसून फसून हा मनुष्य जन्म वाया घालवून टाकत आहे ! तुम्हाला 'राईट' (अधिकार) च नाही, समोरच्याला बेअक्कल बोलण्याचा. तुम्ही असे बोलतात तर समोरचा पण उलट बोलणार, त्यामुळे त्यालाही अंतराय पडणार ! बोला आता, या अंतरायापासून जग कशाप्रकारे सुटणार? कोणाला तुम्ही नालायक बोलतात तर तुमच्या लायकी वर अंतराय पडत असतो. तुम्ही त्याचे त्वरितच प्रतिक्रमण केले तर तो अंतराय पडण्या अगोदरच धुतला जातो.
प्रश्नकर्ता : नोकरीची जबाबदारी सांभाळतांना मी खूपच कठोरपणे लोकांचा अपमान केला आहे, धुतकारून काढले आहेत.
दादाश्री : ते सर्वांचे प्रतिक्रमण करायचे, त्यात तुमचा हेतू खराब नव्हता. तुमच्या स्वत:साठी नव्हता, सरकारसाठी ती सिन्सियारिटी (ईमानदारी) बोलली जाईल.
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
८. 'अशी' तुटणार शृंखला ऋणानुबंधची प्रश्नकर्ता : पूर्वजन्माचे ऋणानुबंधातून सुटण्यासाठी काय करायले पाहिजे?
दादाश्री : आपले ज्यांच्या बरोबर पूर्वीचे ऋणानुबंध आहेत, आणि ते आपल्याला पसंत नाही. त्याच्या बरोबर सहवास पसंतच नाही होत, आणि तरीसुद्धा सहवासात रहावे लागत आहे, अनिवार्य प्रकारे, तर काय करायला पाहिजे की बाहेरचा व्यवहार त्याच्या बरोबर ठेवायचा खरा पण आत त्याच्या नांवाचे प्रतिक्रमण करायला हवे. कारण आपण मागच्या जन्मात अतिक्रमण केले होते त्याचा हा परिणाम आहे. 'कोझीझ' (कारणे) काय केले होते? तेव्हा म्हणे, मागच्या जन्मात त्याच्या बरोबर अतिक्रमण केले होते. त्या अतिक्रमणाचे ह्या जन्मात फळ आले. म्हणून त्याचे प्रतिक्रमण केले तर प्लस-मायनस (अधिक-उणे) होऊन जाईल. अर्थात् आतून तुम्ही त्याची माफी मागून घ्या. माफी माग माग करायची की मी जे जे दोष केले आहेत त्यांची माफी मागत आहे. कोणत्याही भगवानांच्या साक्षीत, माफी मागा तर सर्व संपून जाईल.
सहवास नाही आवडल्यानंतर काय होत असते? त्याचे प्रति खूपच दोषित दृष्टिने पाहिल्यानंतर, काही पुरुषांना स्त्री आवडत नसेल तर तो खूपच दोषित दृष्टिने पहात असतो, अंततः तिरस्कार होतो. त्यामुळे भिती वाटते, ज्याचा आपल्याला तिरस्कार आहे त्याची आपल्याला भिती वाटेल. त्याला पाहिल्या बरोबर मनाचा थरकाप झाला, तर समजायचे की हा तिरस्कार आहे. म्हणून तिरस्कार सोडण्यासाठी सतत माफी मागतच रहा, दोनच दिवसात तो तिरस्कार बंद होऊन जाईल. त्याला नाही समजणार परंतु तुम्ही आतून वारंवार माफी मागतच रहा, त्याची. ज्याच्या प्रति जे जे दोष केले असतील, हे भगवान! मी क्षमा मागत आहे. हा दोषांचा परिणाम आहे, तुम्ही कोणत्याही मनुष्या प्रति जे जे दोष केले असतील, तर आतून तुम्ही भगवंतापासून माफी मागतच रहा, तर सर्व दोष धुतले जातील.
हे तर नाटक आहे. नाटक मध्ये बायको-मुलांना कायमचे आपले करून घेतले तर ते काय चालू शकणार? हो, नाटक मध्ये बोलतात तसे
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
बोलण्यास हरकत नाही की 'हा माझा मोठा मुलगा शतायु.' पण सर्व वरकरणी, नाटकीय. या सर्वांना खरे मानले त्याचेच प्रतिक्रमण करावे लागतात. जर खरे नाही मानले असते तर त्याचे प्रतिक्रमण करावे लागले नसते. जेथे सत्य मानण्यात आले, तेथे राग (आसक्ति, मोह) आणि द्वेष सुरु होऊन जातो आणि प्रतिक्रमणानेच मोक्ष आहे. हे 'दादा' दाखवित आहेत ते आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्याननेच मोक्ष आहे.
___ कोणाच्या हातात त्रास देण्याची पण सत्ता नाही आणि सहन करण्याची पण सत्ता नाही. हे तर सर्व पुतळेच आहे. ते सर्व काम करत आहेत. तर आमचे प्रतिक्रमण केल्यामुळे पुतळे आपणहून सरळ होऊन जातात.
बाकी कसाही वेडा मनुष्य असो, आमच्या प्रतिक्रमणाने शहाणा होऊ शकतो.
एका माणसा बरोबर तुमचे बिलकूल पटत नाही, त्याचे तुम्ही संपूर्ण दिवस प्रतिक्रमण करा, दोन-चार दिवसापर्यंत करीत राहिलात तर पांचव्या दिवशी तो तुम्हाला शोधत येईल इथे. तुमच्या अतिक्रमण दोषामुळेच हे सर्व अडलेले आहे.
प्रश्नकर्ता :ह्याच्यात काही वेळा आपल्याला नाराजगी होऊन जाते की, मी इतके सर्व करतो तरी ते माझा अपमान करतात?
दादाश्री : आपल्याला त्याचे प्रतिक्रमण करायला हवे. हा तर व्यवहार आहे. याच्यात सर्व प्रकारचे लोक आहेत. ते मोक्षमध्ये नाही जाऊ
देणार.
प्रश्नकर्ता : हे प्रतिक्रमण आम्ही कशासाठी करायचे?
दादाश्री : प्रतिक्रमण यासाठी करायचे की ह्यात माझ्या कर्मचा उदय होता, आणि त्याला असे कर्म बांधावे लागले. त्याचे प्रतिक्रमण करीत आहे आणि पुन्हा असे करणार नाही की जेणेकरून कोणाला माझ्या निमित्ताने कर्म बांधावे लागेल!
संसार कोणालाही मोक्षात जावू देईल असे नाही. सर्व बाजूने आकडे टाकून खेचूनच आणेल. त्यासाठी आम्ही प्रतिक्रमण केले तर आकडा सुटून
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
जाईल, म्हणून महावीर भगवानांनी आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान या तीन वस्तु एकाच शब्दात दिले आहे. दुसरा काही मार्गच नाही. आता स्वतः प्रतिक्रमण कधी करू शकणार? स्वत:ला जागृति असेल तेव्हा, ज्ञानीपुरुष पासून ज्ञान प्राप्त होईल तेव्हा ही जागृति उत्पन्न होईल.
__ आपण तर प्रतिक्रमण करून घ्या, म्हणजे आपण जबाबदारीतून सुटलो.
प्रश्नकर्ता : एखाद्या माणसावरचा आपला विश्वास उडून गेला असेल, त्याने आपल्या बरोबर विश्वासघात केला म्हणून आपला विश्वास उडून गेला असेल. तो विश्वास परत मिळविण्यासाठी काय करायला पाहिजे?
दादाश्री : त्याचे प्रति जे खराब विचार केले असतील ना, तर त्याचा पश्चाताप करायला पाहिजे. विश्वास उडून गेल्यानंतर आपण जे जे खराब विचार केले असतील, त्याचा पश्चाताप करावा लागेल. नंतर पूर्ववत् होऊन जाईल. म्हणून प्रतिक्रमण करावे लागेल.
९. निर्लेपता, अभावपासून फाशी पर्यंत प्रश्नकर्ता : समोरच्या माणसाला दु:ख झाले हे कसे माहित होणार?
दादाश्री : ते तर त्याच्या चेहरा-मोहरावरून लगेच माहित पडते. चेहरावरचे हास्य लुप्त होते. त्याच्या चेहरा बिघडून जातो. म्हणून त्वरितच माहित होते ना, की समोरच्यावर परिणाम झाला आहे असे नाही माहित पडत?
प्रश्नकर्ता : हो माहित पडते.
दादाश्री : माणसात एवढी शक्ति तर असतेच की समोरच्यावर काय परिणाम झाला ते माहित होणार!
प्रश्नकर्ता : परंतु बरेचसे असे शहाणे असतात की जे चेहरावर काहीच एक्स्प्रेशन्स (हावभाव) नाही येवू देत.
दादाश्री : तरी ही आपल्याला जाणीव असते की हे शब्द खूप कठोर
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
३८
प्रतिक्रमण
निघालेत आपले, म्हणून त्याला ते जीव्हारी लागतील हे नक्की. ते मानून आपण प्रतिक्रमण करून टाकायचे. कठोर शब्द निघाले असतील तर ते आपल्याला माहित नाही होणार का? की ते त्याला जीव्हारी लागले असतील?
प्रश्नकर्ता : माहित होईल ना!
दादाश्री : हे पण त्याच्यासाठी करायचे नाही आहे. परंतु आपला अभिप्रायापासून दूर होण्यासाठी आहे. प्रतिक्रमण म्हणजे काय? ते समोरच्यावर जो परिणाम होत असेल तो नाही होत, अजिबात नाही होत. मनात नक्की ठेवायचे की, मला समभावे निकाल करायचा आहे. तर त्याच्यावर परिणाम पडणार आणि त्याचे मन असे सुधरेल, आणि जर मनामध्ये नक्की केले की त्याचे असे करून टाकू आणि तसे करून टाकू, तर त्याचे मन पण तशीच रीएक्शन (प्रतिक्रिया) घेते.
प्रश्नकर्ता : एखाद्या माणसाला झिडकारले नंतर पश्चाताप होतो त्याला काय म्हणायचे?
दादाश्री : पश्चाताप झाला म्हणजे झिडकारण्याची सवय सुटून जाणार, थोडे दिवस झिडकारले, नंतर पस्तावा नाही केला आणि मी किती चांगले केले असे मानले तर ते नरकात जाण्याची निशाणी आहे. खराब केल्यानंतर त्याचा पश्चाताप तर करायला च पाहिजे.
प्रश्नकर्ता : समोरच्याचे मन दुखावले गेले असेल तर त्यातून सुटण्यासाठी काय करायचे?
दादाश्री : प्रतिक्रमण करणे आणि समोरचा भेटला तर त्याला तोंडाने बोलायचे की भाऊ माझ्यात अक्कल नाही, माझी चुक झाली, असे बोलल्याने त्याचा घाव भरून जाईल.
प्रश्नकर्ता : काय उपाय करावा की, ज्याने झिडकारण्याचा परिणाम भोगण्याची पाळी न यावी?
दादाश्री : झिडकारसाठी दुसरा काही उपाय नाही, फक्त प्रतिक्रमण सतत करत राहणे. जो पर्यंत समोरच्याच्या मनाचे परिवर्तन नाही होत तोपर्यंत
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
करणे. आणि प्रत्यक्ष भेटला तर गोड बोलून क्षमा मागायची की, 'भाऊ, माझ्याने तर खूप चूका झाल्या, मी तर मूर्ख आहे, बिनअक्कलेचा आहे.' त्याच्याने समोरच्याचा घाव भरुन जाईल. आपण आपलीच निंदा केली तर समोरच्याला बरे वाटते, तेव्हा त्याचा घाव भरतात.
आम्हाला मागच्या जन्मातील झिडकारनेचे परिणाम दिसतात, म्हणून तर मी सांगतो की, कोणाशीही झिडकारून नाही वागायचे. मजूरबरोबर देखिल झिडकारून नाही वागायचे. अरे, शेवटी साप होऊन पण बदला घेईल, झिडकारण्यापासून सुटका नाही एक प्रतिक्रमणच वाचवणार.
प्रश्नकर्ता : एखाद्या माणसाला आम्ही दुःख दिले आणि त्याचे प्रतिक्रमण करून घेतले, पण त्याला जबरदस्त आघात, ठेच पोहचली असेल तर त्याच्याने आम्हाला कर्म नाही बांधणार?
दादाश्री : आपण त्याच्या नांवांने प्रतिक्रमण करीत रहायचे, आणि त्याला जितक्या प्रमाणात दु:ख झाले असेल तेवढ्याच प्रमाणात प्रतिक्रमण करायला हवे.
___ एक जज्ज (न्यायाधीश) मला म्हणाले की, 'साहेब,' तुम्ही मला ज्ञान तर दिले, आणि आता मला कोर्टामध्ये मृत्युदंडाची शिक्षा करायची की नाही ? तेव्हा मी त्याला सांगितले, त्याचे काय करणार, मृत्युदंडाची शिक्षा नाही द्यायची मग?!' ते म्हणाले, 'पण मला दोष लागेल.' मी सांगितले, 'तुम्हाला मी 'चंदुलाल' बनविले आहे की 'शुद्धात्मा' बनविले आहे?' तेव्हा ते म्हणाले, 'शुद्धात्मा' बनविले आहे. तर चंदुलाल करीत आहे त्याला तुम्ही जोखिमदार नाही. आणि जर जोखिमदार व्हायचे असेल तर तुम्ही चंदुलाल आहात. तुम्ही राजीखुशीने भागीदार होत असाल तर त्याला आमची हरकत नाही. पण भागीदार नका होऊ. मग मी त्यांना पद्धत सांगितली की, तुम्ही असे म्हणायचे की, 'हे भगवान, माझ्या वाट्याला हे काम का आले' आणि त्याचे प्रतिक्रमण करायचे, आणि गवर्मेन्टच्या कायदा प्रमाणे काम करत जायचे, समजले ना?
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने मुक्तो होतो एवढे जर आपण लक्षात ठेवले तर सर्व लोकांना स्वच्छंदताचे लायसेन्स मिळून जाईल.
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दादाश्री : नाही, अशी समज ठेवायची नाही, गोष्ट अशीच आहे. आपल्याला प्रतिक्रमण करायचे आहे. प्रतिक्रमण केले म्हणजे आपण सुटलो. तुमच्या जबाबदारीतून तुम्ही सुटलात. नंतर मग तो चिंता करून, डोके फोडून मरून पण गेला, तरी त्याचे तुम्हाला काही घेणे-देणे नाही.
४०
आमच्याकडून पण कोणत्या - न - कोणत्या माणसाला दुःख होत असते, आमची इच्छा नाही आहे, तरीसुद्धा. आता असे आमच्याकडून होतच नाही, पण एखाद्या माणसाबरोबर होऊन जाते. आतापर्यंत पंधरा-वीस वर्षामध्ये दोन-तीन माणसांना झाले असेल, ते पण निमित्त असणार त्यामुळे ना? आम्ही त्यानंतर त्यांचे सर्व प्रतिक्रमण करून त्याच्यावर पुन्हा कुंपण लावतो जेणेकरून ते पडून नाही जाणार. जेवढे आम्ही चढविले आहे तेथून ते खाली पडणार नाही त्यासाठीची कुंपण, त्याचे सर्व रक्षण करून नंतर लावतो.
आम्ही सिद्धांतिक आहोत की, भाऊ, हे झाड रोवले, रोवल्यानंतर रोडच्या एका लाईनदोरीमध्ये येत असेल तर, रोडला फिरवायचे पण झाडाला काही नाही होवू द्यायचे. असा आमचा सिद्धांत असणार. असे कोणाला पडू नाही देणार.
प्रश्नकर्ता : कोणी मनुष्य चुक करतो, नंतर आपल्या जवळ माफी मागतो, आम्ही माफ करून देतो माफी नाही मागितली तरी आपण मनापासून माफ करून देतो, पण तो मनुष्य पुन्हा-पुन्हा चुक करतो तर आम्ही काय करायचे?
दादाश्री : प्रेमाने समजावून, समजवता येईल शकणार तेवढे समजावयाचे, दुसरा काही उपाय नाही आणि आपल्या हातात काहीच सत्ता नाही. आपण माफ केल्यावरच सुटका आहे या संसारामध्ये. नाही माफ केले तर मार खावून माफ करावे लागेल तुम्हाला. उपायच नाही. आपण त्याला समज द्यावी. पुन्हा पुन्हा ती चुक नाही करणार, असा त्याने भाव परिवर्तन केला तर खूप होवून गेले. त्याने भाव परिवर्तन केला की पुन्हा अशी चुक करणार नाही, तरीसुद्धा (चुक) झाली तर ही वेगळी गोष्ट आहे.
मुलाला भाजी घ्यायला पाठविले, आणि त्यातून तो पैसे काढून घेतो
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
तर नंतर ते जाणून घेतल्यावर काय फायदा आहे? तो तर जसा आहे तसे निभावून घ्यायचे, टाकून देणार का? दुसरे घ्यायला जाणार का? दुसरा मिळनार नाही ना? कोणी विकत नाही.
१०. संघर्षाच्या प्रतिपक्षात प्रश्नकर्ता : अमुक कर्मामध्ये जास्त, लांब बोलाचाली झाली असेल तर, लांब बंधन बांधले जाईल, तर त्यासाठी प्रतिक्रमण दोन-चारवेळा की जास्तवेळा करावे लागणार, की नंतर एक वेळा केल्याने होऊन जाईल सर्वच?
दादाश्री : जेवढे होवू शकेल तेवढे करायचे. आणि नंतर एकत्र करून टाकायचे. प्रतिक्रमण खूप जमा झालीत, तर एकत्र प्रतिक्रमण करायचे. 'हे दादा भगवान! या सर्वांचे मी एकत्र प्रतिक्रमण करीत आहे.' मग सुटका झाली.
ज्याला संघर्ष नाही होत त्याला तीन जन्मात मोक्ष होईल त्याची मी गॅरंटी देत आहे. संघर्ष होवून गेला तर प्रतिक्रमण करायचे. संघर्ष पुद्गलचा आहे. आणि *पुद्गल, पुद्गलचा संघर्ष प्रतिक्रमणाने नष्ट होत असते.
तो भागाकार करत असेल तर आम्ही गुणन करायचे, त्यामुळे रक्कम उडून जाते. समोरच्या माणसासाठी विचार करायचा की, 'तो मला असा म्हणाला, तसा म्हणाला,' हाच गुन्हा आहे. या रस्त्याने जातेवेळी भिंती बरोबर टक्कर झाल्यावर तिच्याशी का भांडत नाही? झाडाला जड (निश्चेतन) का म्हणायचे? ज्याने मार लागतो, ते सर्व हिरवे झाडच आहेत !
प्रश्नकर्ता : स्थूळ संघर्षचा दाखला दिला, मग सूक्ष्म, सूक्ष्मतर, आणि सूक्ष्मतमचा दाखला. सूक्ष्म संघर्ष कसा होतो?
दादाश्री : तुझे वडीलां बरोबर जे होते ते सर्व सूक्ष्म संघर्ष. प्रश्नकर्ता : म्हणजे कसे समजायचे?
दादाश्री : त्यात काय मारपीट करतात? *पुद्गल = शरीरात असलेला आत्मा शिवायचा भाग जे पूरण होत असतो आणि गलन होत असतो जसे की मन-बुद्धि-चित्त-अहंकार, कषाय इत्यादि सर्व.
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
४२
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : तो सूक्ष्म संघर्ष.
प्रश्नकर्ता : सूक्ष्म म्हणजे मानसिक ? वाणीने होते ते पण सूक्ष्म मध्ये
जाईल?
दादाश्री : ते स्थूळ मध्ये, जे समोरच्याला माहित नाही पडत, जे दिसत नाही, हे सर्व सूक्ष्म मध्ये जाते.
प्रश्नकर्ता : हा सूक्ष्म संघर्ष टाळायचा कशाप्रकारे ?
दादाश्री : प्रथम स्थूळ, मग सूक्ष्म, नंतर सूक्ष्मतर आणि मग सूक्ष्मतम संघर्ष टाळा.
प्रश्नकर्ता : सूक्ष्मतर संघर्ष कोणाला म्हणायचे?
दादाश्री : तु ह्या मारत असेल तेव्हां हा ज्ञानमध्ये पहातो की मी शुद्धात्मा आहे, ही व्यवस्थित शक्ति मारत आहे. ते सर्व पहातो पण लगेच मनात जरासा दोष पहातो, ते सूक्ष्मतर संघर्ष.
प्रश्नकर्ता : पुन्हा सांगा, समजले नाही बरोबर.
दादाश्री : हे तू सर्व लोकांचे दोष पहातोस ना, ते सूक्ष्मतर संघर्ष. प्रश्नकर्ता : म्हणजे दुसऱ्यांचे दोष पहाणे, ते सूक्ष्मतर संघर्ष.
दादाश्री : असे नाही, स्वत: ने नक्की केले आहे की दुसऱ्यांमध्ये दोष नाहीच. तरीसुद्धा दोष दिसतात हे सूक्ष्मतर संघर्ष. हे दोष तुम्हाला माहित पडायला हवे. कारण तो तर शुद्धात्मा आहे, आणि त्याचे दोष पहातोस?
प्रश्नकर्ता : तर ते जे सर्व मानसिक संघर्ष म्हणाले ते?
दादाश्री : ते तर सूक्ष्म मध्ये गेले.
प्रश्नकर्ता : तर या दोन्ही मध्ये कुठे फरक पडत आहे?
दादाश्री : ही तर मनाच्या वरची बात आहे.
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
४३
प्रश्नकर्ता : मानसिक संघर्ष आणि जे दोष......
दादाश्री : ते मानसिक नाही.
प्रश्नकर्ता : म्हणजे हा सूक्ष्मतर संघर्ष आहे त्यावेळी सूक्ष्म संघर्ष पण बरोबरच असणार ना?
दादाश्री : ते आम्ही पाहायचे नाही. सूक्ष्म वेगळे असते. आणि सूक्ष्मतर वेगळे असते. सूक्ष्मतम अर्थात् तर शेवटची गोष्ट.
प्रश्नकर्ता : एकदा सत्संगमध्येच गोष्ट अशा प्रकारे केली होती की, चंदुलाल बरोबर तन्मयाकार होणे ते सूक्ष्मतम संघर्ष म्हणायचे.
दादाश्री : होय, सूक्ष्मतमसंघर्ष ! त्याला टाळायचे. चूकून तन्मयाकार झालात ना. नंतर माहित पडते ना की ही चुक होऊन गेली.
प्रश्नकर्ता : आता केवळ शुद्धात्मा शिवाय या संसारची कोणतीच विनाशी वस्तु मला नाही पाहिजे, तरीसुद्धा या चंदुभाईला तन्मयाकार अवस्था अधून-मधून असते. अर्थात् ते सूक्ष्मतर संघर्ष झाले ना?
दादाश्री : ते तर सूक्ष्मतम म्हणतात.
प्रश्नकर्ता : तर ते संघर्ष टाळायचा उपाय फक्त प्रतिक्रमण एकच आहे की दुसरा काही आहे?
दादाश्री : दुसरे काही हत्यार नाहीच.
प्रश्नकर्ता : पण दादाजी, आम्हाला प्रतिक्रमण करावे लागते, ते आमचा अहम् नाही म्हणला जाणार ?
दादाश्री : नाही म्हणजे आम्हाला प्रतिक्रमण नाही करायचे. चंदुभाईचे आहे, शुद्धात्मा तर जाणत आहे, शुद्धात्मानी गुन्हा केला नाही. म्हणून 'त्याला' नाही करावे लागत. फक्त गुन्हा केला असेल 'त्याला'. अर्थात् चंदुभाई प्रतिक्रमण करणार. अतिक्रमणानेच संसार उभा झाला आहे. अतिक्रमण कोण करत असते? अहंकार आणि बुद्धि दोन्ही मिळून
करतात.
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
४४
प्रतिक्रमण
११. पुरुषार्थ, प्राकृत दुर्गुणांच्या समोर...
राग-द्वेष शिवाय तर लाईफच नसेल कोणाची. जोपर्यंत ज्ञान मिळत नाही, तोपर्यंत राग आणि द्वेष हे दोनच होत रहातात. तिसरी वस्तुच नसते.
प्रश्नकर्ता : पण दादाजी, द्वेष हे रागचेच पिल्लू आहे ना?
दादाश्री : होय, ते पिल्लू त्याचे आहे, पण त्याचा परिणाम आहे, पिल्लू म्हणजे त्याचा परिणाम आहे. राग खूप झाला ना, ज्याच्यावर राग होत असतो ना, तो एक्सेस (अतिशय) होऊन जातो. तर परिणामस्वरूप त्याच्यावर जास्त द्वेष होतो मग. कोणतीपण वस्तु प्रमाणाच्या बाहेर जातेना,तर ती आपल्याला ना पसंद होते त्याचे नांव द्वेष. समजले?
प्रश्नकर्ता : होय, समजले.
दादाश्री : ते तर आपण समजून घ्यायला पाहिजे की आपलीच रीएक्शन आली आहे सर्व! आपण त्याला मानाने बोलावले असेल तरी आपल्याला वाटते की त्याचे तोंड वाकडे दिसत आहे, तेव्हा म्हणून आपण समजून जायचे की ही आपली रीएक्शन आहे. तर मग काय करायचे? प्रतिक्रमण करायचे. दुसरा उपाय नाही या संसारात. तेव्हा या संसाराचे लोक काय करतात? त्यावर मग आपले ही तोंड वाकडे करतात! म्हणजे पुन्हा होता तसा चा तसा उभा करतात. आपण शुद्धात्मा झालोत म्हणजे समजावूनउमजावून, आपली चुक एक्सेप्ट (स्वीकार) करून ही निवाडा आणा. आम्ही तर ज्ञानी पुरुष असून सुद्धा सर्व चुकांना एक्सेप्ट करून केस पूर्ण करीत असतो.
प्रश्नकर्ता : इर्षा होत असते, ती होवू नये त्यासाठी काय करायचे ?
दादाश्री : त्याचे दोन उपाय आहेत. इर्षा होवून गेल्यानंतर पश्चाताप करायचे. आणि दुसरे इर्षा होत आहे ती इर्षा तुम्ही नाही करत. इर्षा हे पूर्व जन्माचे परमाणु भरलेले आहे, त्याचा स्वीकार नाही करायचा, त्याच्यात तन्मयाकार नाही झालात, मग इर्षा उडून जाते. तुम्हाला इर्षा झाल्यावर पश्चाताप करायचे हे उत्तम आहे.
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
४५
प्रश्नकर्ता : समोरच्यावर शंका करायची नाही, तरी पण शंका आली तर ती कशाप्रकारे दूर करावी?
दादाश्री : तेथे मग त्याच्या शुद्धात्माला स्मरूण क्षमा मागावी, प्रतिक्रमण करायचे. हे तर पूर्वी चूका झाल्या आहेत त्यामुळे शंका होत असते.
जंगलातून जातांना तेथे लौकिक ज्ञानच्या आधारे 'डाकू भेटला तर?' असे विचार येतात, अथवा वाघ भेटला तर काय होणार? असे विचार येतात त्यावेळेला प्रतिक्रमण करून टाकायचे. शंका पडली म्हणजे बिघडले समजायचे. शंका नाही येवू द्यायची. कोणत्या पण माणसा प्रति, कोणती पण शंका आली तर, प्रतिक्रमण करायचे. शंकाच दुःखदायी आहे.
शंका झाल्यावर प्रतिक्रमण (चंदुभाईकडून) करून घ्यायचे. आणि आपण ह्या ब्रह्मांडाचे मालक, आपल्याला शंका होणारच कशी?! माणूस आहे त्याला शंका तर पडेल. पण चुक झाली म्हणजे रोख प्रतिक्रमण करून घ्यायचे.
ज्याच्यासाठी शंका येते त्याचे प्रतिक्रमण करायचे नाहीतर शंका तुम्हाला खाऊन टाकणार.
कोणाच्या प्रति थोडासा जरी उलट-सुलट विचार आला की, लगेयच त्याला धुवून टाकायचा. तो विचार जर थोडा वेळपर्यंत राहिला तर समोरच्यापर्यंत पोहचून जातो आणि मग अंकुरित होतो. चार तासाने, बारा तासाने की दोन दिवसाने त्याचा परिणाम अंकुरित होतो, म्हणून स्पंदनाचा प्रवाह त्या बाजूने नाही जायला पाहिजे.
कोणत्याही वाईट कार्याचा पश्चाताप केला तर त्या कार्याचे फळ बारा आणा (७५%) नष्टच होऊन जाते! म्हणजे ते जळालेली दोरी असते ना, त्याप्रमाणे फळ देणार. त्या जळालेल्या दोरीला पुढच्या जन्मात जरा असा हात लावल्या बरोबर गळून पडेल. कोणतीही क्रिया अशीच व्यर्थ तर जातच नाही. प्रतिक्रमण केल्यामुळे ती दोरी जळून जाते, पण डिझाईन (आकार) तशीच्या तशीच रहाते. म्हणजे पुढच्या जन्मात काय करावे लागेल? असेच झटकल्याने उडून जाते.
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
४६
प्रतिक्रमण
१२. सुटतात व्यसने ! ज्ञानींच्या रीतीने प्रश्नकर्ता : मला सिगरेट प्यायची वाईट सवय पडून गेली आहे.
दादाश्री : तर त्याला ‘तू' असे मानायचे की हे चुकीचे आहे, वाईट वस्तु आहे अशी, आणि जर कोणी म्हटले की सिगरेट का पीतोस? तर त्याचे रक्षण नाही करायचे. वाईट आहे असे म्हणायचे. किंवा भाऊ, ही माझी कमजोरी आहे असे म्हणायचे. तर एखाद्या दिवशी सुटणार, नाहीतर नाही सुटणार ती.
आम्ही पण प्रतिक्रमण करतो ना, अभिप्रायापासून मुक्त व्हायलाच पाहिजे. अभिप्राय राहिले त्याची हरकत आहे.
प्रतिक्रमण केले तर तो माणूस उत्तमातील उत्तम वस्तु प्राप्त करतो. अर्थात् हे टेक्निकली आहे, सायन्टिफिकली त्यात जरूरी रहात नाही. पण टेक्निकली जरूरी आहे.
प्रश्नकर्ता : सायन्टिफिकली कशाप्रकारे ?
दादाश्री : सायन्टिफिकली हे त्याचे * डिस्चार्ज आहे, तर मग त्याला गरजच काय आहे?! कारण की तुम्ही वेगळे आहात आणि तो वेगळा आहे. एवढ्या सर्व शक्ति नाहीत या लोकांच्या ! प्रतिक्रमण नाही केले म्हणजे पूर्वीचे अभिप्राय राहून जातात. आणि तुम्ही प्रतिक्रमण केले म्हणजे अभिप्रायापासून वेगळे झाले, ही गोष्ट नक्की आहे ना? !
अभिप्राय जेवढे राहतील, तेवढेच मन राहून जाईल. कारण की मन अभिप्रायमुळे बांधलेले आहे.
आम्ही काय सांगतो की, आता व्यसनी होवून गेला, त्याला माझी हरकत नाही, पण जे व्यसन झाले असेल, त्याचे आता भगवंताकडे प्रतिक्रमण करायचे की हे भगवान! ही दारू नाही प्यायला पाहिजे, तरीसुद्धा पीत आहे. त्याची माफी मागतो आहे. ही दारू पुन्हा नाही पिणार अशी मला शक्ति द्यावी. एवढे कर बाबा. तेव्हा लोक टोकत असतात की तू दारू का पीतोस? अरे, तू त्याला असे करून जास्त बिघडवतोस. त्याचे अहित करत *डिस्चार्ज = बांधलेले कर्म उदयातयेवून सूटतात ते.
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
४७
आहात. मी काय म्हटले, तू पाहिजे तेवढा मोठा गुन्हा करून आलास, तरी तू ह्या प्रमाणे प्रतिक्रमण करत जा.
प्रश्नकर्ता : तुम्ही सकाळी 'चहा' प्याल्या नंतर म्हटले की आम्ही प्रत्याख्यान केल्या नंतर चहा प्यालो.
दादाश्री : ओहोहो! होय. प्रश्नकर्ता : त्याचीच गोष्ट आहे.
दादाश्री : म्हणजे 'चहा' तर मी पीत नाही. तरीसुद्धा पिण्याचा संजोग येवून मिळतात. आणि अनिवार्य होऊन जाते. तेव्हा काय करावे लागते? जर कधी प्रत्याख्यान केल्या बिगर, प्यालो तर 'ती' चिकटणार. म्हणून तेल चोपडून रंगवाले पाणी ओतायचे, तेल चोपडून. हां, आम्ही प्रत्याख्यानरूपी तेल चोपडून मग हिरवे रंगाचे पाणी ओततो, पण आत चिकटत नाही. म्हणून प्रत्याख्यान करून आम्ही चहा प्यालो!
हे एवढे समजण्या सारखे आहे. प्रत्याख्यान करून करा हे सर्व. प्रतिक्रमण तर जेव्हा अतिक्रमण झाले तेव्हा करायचे. ही चहा प्यालो ते अतिक्रमण नाही म्हणायचे. चहा अनिवार्य प्यावा लागला. ते अतिक्रमण नाही म्हणायचे. हे तर प्रत्याख्यान नाही केले, तेल नाही चोपडले, तर थोडेफार चिकटणार, आता तेल चोपडूनच करायचे ना हे सर्व!
आम्हाला अशाता कमी असते. पहा ना, आम्हाला महिना, महिना असे आले की दादांचा एक्सिडेंट सारखा टाईम आला. नंतर जे हे झाले जणू काय दिवा विझवून जाईल असे होवून गेले.
प्रश्नकर्ता : असे काही व्हायचे नाही दादाजी.
दादाश्री : नाही, असे नाही, हीराबा' (दादाजींची धर्मपत्नी) गेल्यात तर 'हे' (ए.एम.पटेल) नाही जायचे होणार? हे तर कोणते वेदनीय कर्म आले?
प्रश्नकर्ता : अशाता वेदनीय. दादाश्री : लोक समजतात की आम्हाला वेदनीय आहे, पण
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
४८
प्रतिक्रमण
आम्हाला वेदनीय स्पर्शत नाही, तीर्थंकरांना पण स्पर्शत नाही. आम्हाला हीराबाच्या जाण्याचा खेद नाही. आम्हाला असर पण नाही काही, लोकांना असे वाटते की, आम्हाला वेदनीय आले, अशाता वेदनीय आले. पण आम्हाला एक मिनिट, एक सेकंद पण अशाता स्पर्शत नाही, या वीसवर्षात ! आणि ते च विज्ञान मी तुम्हाला दिले आहे पण तुम्ही कच्चे पडलात तर तुमचे गेले. समजल्यामुळे कच्चे पडणारच नाही ना, कधी पण?!
प्रश्नकर्ता : अंबालालभाईला तर स्पर्शते ना? 'दादा भगवान'ला तर वेदनीय-कर्म नाही स्पर्शत.
दादाश्री : नाही, कोणलाही स्पर्शणार नाही, असे हे विज्ञान आहे. स्पर्शत असेल तर वेडाच होवून जाईल ना? हे तर नाही समजल्यामुळे दु:ख आहे. समज असेल तर या फाईलला नाही स्पर्शणार. कोणालाही स्पर्शणार नाही. जे दुःख आहे ते अज्ञानतेचे आहे. या ज्ञानला जो समजून घेईल ना, तर दुःख होणार च कसे? अशाता पण नाही होणार आणि शातापण नाही होणार.
१३. विमुक्ति, आर्त-रौद्रध्यानने प्रश्नकर्ता : सांगतात की आर्तध्यान आणि रौद्रध्यान क्षणोक्षणी होतच असतात. तर आर्तध्यान कोणाला म्हणतात आणि रौद्रध्यान कोणाला म्हणतात त्याचे जरा स्पष्टीकरण करून द्या.
दादाश्री : आर्तध्यान आहे ते स्वत:चे स्वत:लाच.कोणालापण मध्ये आणत नाही. कोणाला गोळी लागणार नाही. अशा प्रकारे सांभाळून स्वतः आपले दुःख झेलत रहातो हे आर्तध्यान आणि दुसऱ्यावर गोळी सोडून देतो ते रौद्रध्यान.
आर्तध्यान तर स्वत:ला ज्ञान नसेल आणि 'मी चंदुलाल आहे' असा होवून जातो आणि मला असे होईल किंवा असे झाले तर काय होणार? मुलींची लग्न करून देणारा तू आहेस? मुलगी चोवीस वर्षाची होईल तेव्हा तिचे लग्न होणार. पण हा तर ती पांच वर्षाची आहे तेव्हापासून चिंता करत असतो, हे आर्तध्यान केले म्हणायचे, समजले का?
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
स्वत:साठी उलटे विचार करायचे, उलटे करायचे, स्वत:ची गाडी चालणार की नाही चालणार. आजारी पडलो आणि मरून गेलो तर काय होईल? हे आर्तध्यान म्हणावे.
रौद्रध्यान तर आपण दुसऱ्यांवर कल्पना करतो की ह्याने माझे नुकसान केले. हे सर्व रौद्रध्यान म्हणायचे.
आणि दुसऱ्यांच्या निमित्ताने विचार करतो, दुसऱ्यांचे काही ना काही नुकसान व्हावे असा विचार आला, तर ते रौद्रध्यान झाले म्हणायचे. मनात विचार आला की, कापड ताणून द्यायचे. ते ताणून द्यायचे म्हटले, तेव्हापासूनच ग्राहकांच्या हातात कापड कमी जाणार. आणि त्यांच्याकडून जास्त पैसे काढून घेणार अशी कल्पना केली हे रौद्रध्यान म्हणायचे. दुसऱ्यांचे नुकसान करायचे ध्यान रौद्रध्यान म्हणायचे.
जबरदस्त रौद्रध्यान केले असेल, पण प्रतिक्रमणाने ते आर्तध्यान होऊन जाते. दोन जणांनी रौद्रध्यान एकच प्रकारचे केले. दोघांनी म्हटले की अमक्याला मी मारून टाकणार. असा दोन दोघांनी मारण्याचा भाव व्यक्त केला. ते रौद्रध्यान म्हणायचे. पण एकाने घरी गेल्यावर पस्तावा केला की 'जळो, ते मी असा भाव का केला.' त्यामुळे ते आर्तध्यान होऊन गेले आणि दुसऱ्यांचे रौद्रध्यान राहिले.
अर्थात् पस्तावा केल्याने रौद्रध्यान पण आर्तध्यान होऊन जातो. पस्तावा केल्याने नरकगति अटकन तिर्यंचगति होत असते. आणि जास्त पस्तावा केले तर धर्मध्यान बांधते. एकवेळा पस्तावा केला तर आर्तध्यान होते आणि पुन्हा पुन्हा पस्तावा करतच राहिलात, तर धर्मध्यान होऊन जाते. अर्थात् क्रिया ती च्या ती च, पण (ध्यान) फेरफार होत असतो.
प्रश्नकर्ता : 'आम्ही' स्वतः वेगळे राहून प्रतिक्रमण करवून घेतले तर त्याला काय म्हणायचे?
दादाश्री : असे आहे की, आम्ही शुद्धात्मा झालोत, पण ह्या पुद्गल ची सुटका व्हायला पाहिजे ना? म्हणून जोपर्यंत त्याच्या कडून प्रतिक्रमण करवून घेणार नाही तोपर्यंत सुटका नाही होणार, जोपर्यंत पुद्गलला
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
५०
प्रतिक्रमण
धर्मध्यानामध्ये नाही ठेवत तोपर्यंत सुटका नाही होणार. कारण की पुद्गलला शुक्लध्यान होत नाही. त्यासाठी पुद्गलला धर्मध्यानामध्ये ठेवा. म्हणून सतत प्रतिक्रमण करवत रहायचे. जितक्या वेळा आर्तध्यान झाले, तितक्या वेळा प्रतिक्रमण करावयाचे.
आर्तध्यान होणे ती पूर्वीची अज्ञानता आहे, म्हणून होऊन जाते. तर 'आपण' त्याच्याकडून प्रतिक्रमण करवून घ्यायचे.
प्रश्नकर्ता : दुसऱ्यांचे दोष पाहिलेत म्हणजे आर्तध्यान-रौद्रध्यान झाले?
दादाश्री : हां, ते दुसऱ्यांचे दोष पाहण्याचा माल आतमध्ये भरून आणला आहे म्हणून असे पहातो. तरीसुद्धा तो स्वतः दोषात नाही येत. त्याला प्रतिक्रमण करायला पाहिजे की असे का होत आहे? असे नाही व्हायला पाहिजे, बस एवढेच. हे तर जसा माल भरला असेलना, तसा सर्व निघणार. त्याला आम्ही भरलेला माल असे आमच्या साध्या भाषेत बोलतो.
आता रात्री सात-आठ जण आलेत, आणि चंदुभाई आहेत का असे करून आवाज दिला, रात्रीचे साडेअकरा वाजले आहेत, तर तुम्ही काय म्हणणार? तुमच्या गावाचे आले आहेत आणि त्यात एक-दोन ओळखीचे आहेत, आणि दुसरे सर्व त्यांचे ओळखीचे आहेत आणि एकूण दहा-बारा माणसाची टोळी आहे आणि आवाज देत आहेत, तर साडेअकरा वाजता काय सांगणार त्या लोकांना? दरवाजा उघडणार की नाही उघडणार?
प्रश्नकर्ता : होय, उघडणार.
दादाश्री : आणि नंतर काय सांगणार त्या लोकांना? परत जा असे सांगणार?
प्रश्नकर्ता : नाही नाही, परत जा, असे कसे म्हणणार? दादाश्री : तेव्हा काय सांगणार?
प्रश्नकर्ता : आम्ही आतमध्ये बोलावणार, 'यावे आतमध्ये यावे.'
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
५१
दादाश्री : 'या, या आतमध्ये यावे' आमचे संस्कार आहेतना? म्हणून 'या, आतमध्ये यावे' म्हणतो, सर्वांना सोफावर बसवतो. सोफावर लहान बाळ झोपून गेला असेल तर झटपट उठवणार आणि बाजूला करून देणार. सोफावर बसवतो. पण मनात असे होते की, 'मेले आता कुठून आलेत हे?!'
समोरच्या माणसांसाठी आम्ही भाव बिघडवतो हे आर्तध्यान नाही पण रौद्रध्यान आहे. आणि स्वत:ची पीडा स्वत:च भोगतो त्याला आर्तध्यान म्हणतात. हा तर दुसऱ्यांची उपाधि आपल्या माथे घेवून दुसऱ्यांवर ब्लेम (आरोप) लावतो. 'अशा अवेळी कुठून टपकलेत?!'
तरी ही तेव्हा आपण काय बोलणार? आपण आपले संस्कार तर सोडणार नाही ना? हळूच म्हणणार की, 'थोडी... थोडी... थोडी...' अरे पण काय? तेव्हा म्हणतो, थोडी चहा... तेव्हा मनमोकळेपणाने बोलणारे असतात ते म्हणतात. 'चंदुभाई चहा राहू द्या ना, आता खिचडी-कढी करून टाका ना. तरी खूप होवून गेले.' मग पहा तुमच्या पत्नीची स्थिति! स्वयंपाक घरात काय होवून जाईल?
आता भगवानांची आज्ञा काय आहे, ज्याला मोक्षात जायचे आहे त्याने काय करायला हवे? 'अशा अवेळी कुठून टपकले,' असा भाव येणारच माणसाला. आतातर या दुषमकाळाचे दबाव असे आहे, वातावरण असे आहे की त्याला (असे भाव) येतील. थोर माणूस असेल त्याला पण येतील.
आता हे सर्व कशासाठी तू चित्रित आहे? बाहेर चांगले करत आहे, आणि आत उलटे चित्रित आहे. अर्थात् आपण हे जे चांगल्या रीतीने बोलवतो हे पूर्व जन्माचे फळ भोगत आहोत आणि हे नवीन (आतला भाव बिघडतो ते) पुढील जन्माचे बांधत आहोत. या वेळी कुठुन टपकले अश्या आतल्या भावामुळे आपण उल्टे कर्म बांधत आहोत.
म्हणून त्यावेळी आम्ही भगवानांजवळ माफी मागून म्हणायचे हे भगवान, माझी चुक झाली, या वातावरणच्या दबावाने बोलले गेले पण अशी माझी इच्छा नव्हती. हे भले राहोत. असे तुम्ही पुसून टाकले तो तुमचा पुरुषार्थ म्हटला जाईल.
असे होऊन तर जाणार.ते तर मोठया संयमधारीला ही होते. असा
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
५२
प्रतिक्रमण
काळ विचित्र आहे हा. पण तुम्ही जर पुसून टाकले तर तुम्हाला असे फळ मिळणार.
प्रश्नकर्ता : साधारणतः एक तासात पांच-पंचवीस अतिक्रमण होऊन
जातात.
दादाश्री : ते एकत्र करून करायचे. एकत्र करु शकतात. हे एकत्र प्रतिक्रमण करत आहे असे म्हणायचे.
प्रश्नकर्ता : तर हे कशाप्रकारे करायचे? काय म्हणायचे?
दादाश्री : हे सर्व खूपच अतिक्रमण झाले आहेत म्हणून ह्या सर्वांचे एकत्र प्रतिक्रमण करत आहे. विषय बोलायचे की ह्या ह्या विषयवर हे हे दोष झाले त्याचे सामुहिक प्रतिक्रमण करत आहे असे म्हटले म्हणजे निकाल होऊन गेला, आणि तरीसुद्धा बाकी राहिले तर ते धुवून टाकता येईल. नंतर धुतले जाईल. पण त्याच्यावर बसून नाही रहायचे. बसून राहिलात तर सर्व चे सर्वच (प्रतिक्रमण) राहून जातील. गोंधळात पडण्याची गरज नाही.
१४. ... काढते कषायच्या कोठडीमधून प्रश्नकर्ता : कोणावर रागाने खूप ओरडलो, बोलून मग गप्प झालो पण, नंतर हे जे बोललो त्यामुळे जास्त तळमळ झाला तर त्यात एकापेक्षा जास्त प्रतिक्रमण करावे लागते?
दादाश्री : हे दोन-तीन वेळा चांगले हृदयापासून केले आणि एकदम योग्य पद्धतिने करून घेतले म्हणजे समाप्त झाले. 'हे दादा भगवान! भयंकर भानगड आली. त्याने जबरदस्त चिडलो. समोरच्याला खूप दुःख झाले! त्याची मी माफी मागतो, आपल्या साक्षीत, खूप जबरदस्त माफी मागतो.'
प्रश्नकर्ता : कोणा बरोबर जास्तवेळा वादावाद झालेला असेल त्यामुळे मनात जास्त अंतर वाढत जाते. आणि कोणा बरोबर एक-दोनवेळा झाले असेल, तर अमुकमध्ये प्रतिक्रमण दोन-तीन-चारवेळा, अशी जास्तवेळा करीत रहावे लागते की एक वेळा केले तर सर्वाचे येवून जातात?
दादाश्री : जेवढे होत असेल तेवढे करायचे. आणि शेवटी मग
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
सामुहिक करून टाकायचे. जास्त प्रतिक्रमण जमा होवून गेले, तर मग सामुहिक करायचे की या प्रत्येक कर्मांचे माझ्याने वेगळे प्रतिक्रमण होत नाहीत. त्या सर्वांचे सामुहिक प्रतिक्रमण करीत आहे. आपण दादा भगवानांना सांगून द्यायचे, तर ते पोहचून गेले.
५३
प्रश्नकर्ता : आपण समोरच्या माणसावर क्रोध करतो, नंतर लगेचच आम्ही प्रतिक्रमण करून घेतो, तरी पण आमच्या क्रोधाचा परिणाम समोरच्या माणसावर त्वरित तर नाहीसा होत नाही ना?
दादाश्री : तो (परिणाम) नाहीसा झाला की नाही झाला, हे आपण पाहायचे नाही. आपण आपलेच कपडे धुवून स्वच्छ रहायचे. तुम्हाला पसंत नाही तरी पण होऊन जात असते ना? !
प्रश्नकर्ता: क्रोध होऊन जातो.
दादाश्री : म्हणून त्याला आपण पाहायचे नाही. आपण प्रतिक्रमण करायचे. आपण सांगायचे की, 'चंदुभाई प्रतिक्रमण करा.' मग तो जसा कपडा खराब झाला, तसा तो धुणार ! जास्त द्विधामध्ये पडायचे नाही. नाहीतर आपले पुन्हा बिघडेल.
प्रश्नकर्ता : आता निंदा केली, त्यावेळी भले त्याला जागृति नव्हती, निंदा केली किंवा चिडतो त्यावेळी निंदा होऊन जाते.
दादाश्री : तर त्यालाच कषाय म्हटले आहे, कषाय म्हणजे दुसऱ्यांच्या अंकूशमध्ये येवून गेलात. त्यावेळी तो बोलतो पण बोलते वेळीच त्याला जाणीव असते की हे चुकीचे होत आहे. कित्येक वेळेला जाणीव होते आणि कित्येक वेळेला अजिबात जाणीव नाही होत, असेच निघून जाते. मग थोड्यावेळा नंतर जाणीव होते. अर्थात् झाले त्यावेळी 'जाणत' होता.
प्रश्नकर्ता : आमच्या ऑफिसमध्ये तीन-चार सेक्रेटरी आहेत. त्यांना सांगतो असे करायचे आहे, एक वेळा, दोन वेळा, चार वेळा पाच वेळा, सांगितले तरी पण त्या तीच तीच चुक करतात. तर मग चिडतो, तर त्यासाठी काय करावे?
दादाश्री : तुम्ही तर शुद्धात्मा झालात. आता तुम्ही कुठे चिडता.
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
चिडतो तर चंदुलाल. त्या चंदुलालला मग आपण सांगायचे, आता दादा मिळाले आता तरी चिडणे कमी करा ना !!
५४
प्रश्नकर्ता : पण त्यां सेक्रेटरीं मध्ये ईम्प्रुव (सुधार) नाही होत. तर त्यांचे काय करायचे? सेक्रेटरींना काही सांगावे तर लागते ना, नाहीतर त्या तशीची तशीच चुक करत रहातात, त्याकाम बरोबर करीत नाही.
दादाश्री : ते तर आपण चंदुभाईला सांगायचे त्यांना दटवा, थोडे दटवा. जरा समभावे निकाल करून दटवा. वरपांगी नाटकीय रीतीने लढायचे की असे करणार तर तुमची सर्विस कशी राहणार? असे सर्व सांगायचे.
प्रश्नकर्ता : पण त्यांना त्यावेळी दुःख होईल आणि आपण सांगितले आहे की दुःख नाही द्यायचे दुसऱ्यांना.
दादाश्री : दु:ख नाही होणार, कारण की आपण जर ते नाटकीय रीतीने बोललो ना तर दुःख नाही होणार त्यांना, फक्त त्यांच्या मनात जागृति येईल, त्यांचा निश्चय बदलणार. आपण दुःख नाही देत, दु:ख तर केव्हा होईल? आपला हेतू जर तसा असेल तर, दुःख उत्पन्न होईल. आपला हेतू दुःख द्यायचा असेल ना, की यांना सरळ करून टाकायचे. तर त्यांना दु:ख उत्पन्न होणार.
चिडण्याचा ज्ञाता-द्रष्टा राहिलो तर शुद्ध होऊन चिडण्याचे निघून जाते. ते परमाणु शुद्ध होऊन निघून गेलेत. एवढे तुमचे कर्तव्य.
प्रश्नकर्ता : चिडल्यानंतर प्रतिक्रमण केले तर तो पुरुषार्थ म्हणायचा की पराक्रम म्हणायचा?
दादाश्री : तो पुरुषार्थ म्हणायचा, पराक्रम नाही म्हणायचा. प्रश्नकर्ता : तर मग पराक्रम कोणाला म्हणायचे?
दादाश्री : पराक्रम तर या पुरुषार्थच्याही वर आहे. आणि हे तर पराक्रम नाही. हे तर जखम जळजळत असेल तर औषध चोपडायचे याच्यात पराक्रम कुठून आला? ह्या सर्वांना जाणतो, आणि हा जाणकार जाणतो त्याचे नांव पराक्रम. आणि प्रतिक्रमण करणे त्याचे नांव पुरुषार्थ.
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
५५
शेवटी हे प्रतिक्रमण करता, करता सर्व शब्दांची झंझट कमी होऊन जाईल, आपोआप सर्व कमी होत जाईल. नियमानुसारच सर्व कमी होत जाईल. सहज, नियमानुसार सर्व बंद होऊन जाते. प्रथम अहंकार जातो, मग बाकी सर्व जाईल. सर्व आप-आपल्या घरी चालले, आणि आत थंडगार आहे, आता आत थंडगार आहे ना? ।
प्रतिक्रमणने सर्वच कर्म पुसले जातात. कर्ताची गैरहजेरी आहे, म्हणून संपूर्ण कर्म पुसले जातात. कर्ताच्या गैरहजेरीमध्ये हे कर्मे आम्ही भोगत आहोत. कर्ताच्या गैरहजेरीत भोक्ता आहोत, म्हणून हे पुसले जातात आणि या संसारमध्ये लोक कर्ताच्या हजेरीमुळे भोक्ता आहेत. म्हणून त्यांनी प्रतिक्रमण केले तर थोडे ढीले होते, परंतु उडून नाही जात. फळ दिल्याशिवाय रहात नाही आणि तुम्हाला तर हे कर्म उडूनच जाते (ज्ञान प्राप्ति नंतर महात्मांना).
__कोणाचे दोष दिसत नाही तेव्हा समजायचे की 'सर्व विरती' पद आहे, संसारमध्ये राहून सुद्धा! असे हे 'अक्रम विज्ञान' चे 'सर्व विरती' पद वेगळ्या प्रकारचे आहे. संसारात राहून, सुगंधी तेल डोक्यावर लावून, कानात अत्तरचा बोळा घालून फिरतो आहे परंतु त्याला कोणाचाच दोष नाही दिसत.
वीतद्वेष (द्वेषरहित) झाला त्याला एक अवतारी म्हणतात. वीतद्वेषामध्ये जो कच्चा राहीला आहे, त्याला दोन-चार अवतार होणार.
१५. भाव अहिंसाच्या वाटेवर... प्रश्नकर्ता : मोक्ष जाण्याच्या पूर्वी, कोणत्याही जीवा बरोबर देणेघेणे असेल पण, आम्ही त्याचे प्रतिक्रमण करत च राहिलो तर ते आपली सुटका करतील?
दादाश्री : होय. प्रश्नकर्ता : पण ते काय बोलायचे?
दादाश्री : ज्या ज्या जीवांना माझ्याकडून काही पण दुःख झाले असेल, त्या सर्वानी मला माफ करावे.
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
५६
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : जीवमात्र? दादाश्री : जीवमात्रला.
प्रश्नकर्ता : म्हणजे मग त्यामध्ये वायुकाय, तेउकाय, सर्व जीव येवून जातात.
दादाश्री : हे सर्व बोलले, म्हणजे त्यात सर्वच येवून जातात. प्रश्नकर्ता : काही जीवांची नकळत हिंसा होऊन गेली तर काय करायचे?
दादाश्री : नकळत हिंसा झाली परंतु जाणीव झाल्यावर त्वरितच पश्चाताप व्हायला पाहिजे, की असे नाही झाले पाहिजे. पुन्हा असे नाही होणार त्याची जागृति ठेवायची. असा आपला उद्देश ठेवायचा. भगवंताने सांगितले होते, कोणाला मारायचे नाही असा दृढ भाव ठेवायचा. कोणत्याही जीवाला जरासे पण दुःख नाही द्यायचे, अशी रोज पांचवेळा भावना करायची. माझ्या मन-वचन-कायाने कोणत्याही जीवाला किंचित्मात्र दुःख होऊ नये असे पांचवेळा सकाळी बोलून मग संसारी प्रक्रिया चालू करायची. म्हणजे जबाबदारी कमी होऊन जाते. कारणकी भाव करायचा अधिकार आहे. क्रिया आपल्या सत्ते मध्ये नाही आहे.
प्रश्नकर्ता : चुकून होऊन गेले असेल तरी पण पाप लागेल ना? दादाश्री : चुकून विस्तवात हात ठेवला तर काय होईल? प्रश्नकर्ता : भाजणार. दादाश्री : लहान बाळाचा नाही भाजणार? प्रश्नकर्ता : भाजणार.
दादाश्री : त्याचा पण भाजणार? अर्थात् काहीच सोडणार नाही. नकळत करा की जाणून करा, काहीच सोडणार नाही.
प्रश्नकर्ता : कोणी महात्माला ज्ञान घेतल्यानंतर, रात्री डास चावत असतील, म्हणून ते रात्री जागून डास मारत राहिले तर त्याला काय म्हणायचे?
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
५७
दादाश्री : त्याला भाव बिघडला म्हणतात, ज्ञानची जागृति नाही म्हणावी.
प्रश्नकर्ता : त्याला हिंसकभाव म्हणायचा?
दादाश्री : हिंसकभाव तर काय परंतु होता तसा होऊन गेला असे म्हणणार. पण नंतर प्रतिक्रमण केले तर धुतले जाणार.
प्रश्नकर्ता : पण मग दुसऱ्या दिवशी सुद्धा तसेच केले तर?
दादाश्री : अरे शंभरवेळा केले तरी पण धुतले जाईल. मारून टाकायचा तर विचार पण नाही करायचा. कोणती पण वस्तू अनुकूल नसेल तर बाहेर सोडून यायचे. तीर्थंकरांनी 'मार' शब्दच निकाल बाहेर केला होता. 'मार' शब्दच बोलायचा नाही असे म्हटले आहे. 'मार' हाच जोखीमदार शब्द आहे. एवढे सर्व अहिंसामय, एवढ्या मात्रात परमाणु अहिंसक व्हायला पाहिजे.
प्रश्नकर्ता : भावहिंसा आणि द्रव्यहिंसाचे फळ एकच प्रकारचे येते ?
दादाश्री : भावहिंसाचा फोटो दुसरे कोणी नाही पाहू शकत आणि जे सिनेमासारखा हा जो सिनेमा चालत आहे आत तो आपण पाहात असतो, अर्थात भावहिंसामध्ये असे सूक्ष्मरूपात होत असते. आणि द्रव्यहिंसा तर दिसत असते, प्रत्यक्ष मन-वचन-कायाने जो संसारमध्ये दिसत आहे, ते द्रव्यहिंसा आहे. तुम्ही म्हणणार की जीवांना वाचविणे योग्य आहे, मग ते वाचो की न वाचो त्याला जोखीमदार तुम्ही नाही. तुम्ही म्हणा की, ह्या जीवांना वाचविणे योग्य आहे, तुम्हाला एवढेच करायचे. मग हिंसा होऊन गेली, त्याला जोखीमदार तुम्ही नाही! हिंसा झाली त्याचा पस्तावा, त्याचे प्रतिक्रमण करायचे म्हणजे जोखीमदारी सर्व संपली.
प्रश्नकर्ता : आपल्या पुस्तकात वाचले की, 'मन-वचन-कायाने कोणत्याही जीवाला किंचित्मात्र दुःख नाही हो' पण आम्ही ठरलो शेतकरी, तर तंबाखूचे पीक लागवड करतो, त्यावेळी आम्हाला प्रत्येक, कोंब, म्हणजे त्यांचे शेंडे (डोके) तोडावे च लागतात तर त्यामुळे त्याला दुःख तर झाले
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
ना? त्याचे पाप तर झाले ना? अशी लाखो रोपट्यांची शेंडे ठेचून टाकत असतो. तर या पापाचे निवारण कशाप्रकारे कराये ?
५८
दादाश्री : हे तर आत मनामध्ये असे व्हायला पाहिजे की जळो हा धंदा का म्हणून माझ्या वाट्याला आला? बस एवढेच. रोपट्यांची शेंडे कापून टाकायची परंतु मनापासून हा धंदा का म्हणून माझ्या वाट्याला आला असा पश्चाताप व्हायला पाहिजे. असे नाही करायला हवे असे मनामध्ये व्हायला पाहिजे बस.
प्रश्नकर्ता : परंतु हे पाप तर होणारच ना?
दादाश्री : ते तर आहेच. ते तुम्ही पाहायचे नाही. होत आहे ते पाप पाहायचे नाही. नाही व्हायला पाहिजे असे तुम्ही नक्की करायचे, निश्चय करायला पाहिजे. हा धंदा का मिळाला? दूसरा चांगला धंदा मिळाला असता तर आम्ही असे नसते केले. पूर्वी पश्चाताप होत नव्हता. हे माहित नव्हते तोपर्यंत पश्चाताप नाही व्हायचा. खूश होऊन रोपट्याला उपटून फेकायचे. समजले का तुम्हाला? आमच्या संगितल्या प्रमाणे करा ना, तुमची सर्व जबाबदारी आमची. रोपटे फेकून दिले त्याची हरकत नाही, पश्चाताप व्हायला पाहिजे की असे का म्हणून आले माझ्या वाट्याला ?
खेतीवाडी मध्ये जीवजंतू मरतात त्याचा दोष तर लागणार ना? म्हणून खेतीवाडीवाल्यानी दररोज पांच-दहा मिनिट भगवान जवळ प्रार्थना करायची, हे दोष झाले त्याची माफी मागत आहे. त्याचे अशा पद्धतिने प्रतिक्रमण कर.
प्रश्नकर्ता : तुम्ही ते वाक्य म्हटले होते की कोणत्याही जीवमात्रला मन-वचन-कायाने किंचित्मात्र दुःख न हो. इतके सकाळी बोलले तर चालणार की नाही चालणार?
दादाश्री : हे पांचवेळा बोलायचे, परंतु हे या पद्धतिने बोलायला पाहिजे की पैसे मोजते वेळी जशी स्थिती असते ना त्या पद्धतिने बोलायला पाहिजे.
रुपये मोजते वेळी जसे एकाग्र चित्त असते, जसे अंत:करण असते, तसे बोलते वेळी ठेवावे लागणार.
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
५९
१६. दुःखदायी वैरची वसुली
प्रश्नकर्ता : आम्ही प्रतिक्रमण नाही केले तर नंतर कधीतरी समोरच्या जवळ चुकते करायला जावे लागेल ना ?
...
दादाश्री : नाही, त्याला चुकते करायचे नाही. आम्ही बंधनमध्ये राहिलो. समोरच्या बरोबर आमचे काही घेणे-देणे नाही.
प्रश्नकर्ता : परंतु आम्हाला चुकते करावे लागेल ना?
दादाश्री : म्हणजे आपणच पुन्हा बांधलेले आहोत. त्यासाठी आपण प्रतिक्रमण करायला हवे. प्रतिक्रमणाने मिटते. म्हणून तर तुम्हाला हत्यार दिले ना, प्रतिक्रमण !
प्रश्नकर्ता : आम्ही प्रतिक्रमण करायचे आणि वैर सोडून द्यायचे. परंतु समोरचा वैर ठेवतो तर ?
दादाश्री : भगवान महावीर वर इतके सर्व लोक राग- - द्वेष (मोहअसक्ति) करत होते आणि द्वेष करत होते, त्यात महावीरांना काय? वीतरागींना काहीच चिकटणार नाही. वीतराग म्हणजे शरीरला तेल चोपडल्याविना बाहेर फिरतात ते, आणि दुसरे शरीरला तेल चोपडून फिरतात. तर तेल चोपडलेल्यांना सर्व धूळ चिकटते.
प्रश्नकर्ता : या दोन व्यक्तिंमध्ये जे वैर बांधला जात आहे, रागद्वेष होत आहे, आता त्यातून मी प्रतिक्रमण करून सुटून जायचे परंतु दुसरी व्यक्ति वैर सोडत नाही, तर ती व्यक्ति मग पुढच्या जन्मात येवून त्या रागद्वेषाचा हिशोब पूर्ण करेल ना? कारणकी त्याने तर त्याचे वैर चालू च ठेवलेले आहे? !
दादाश्री : प्रतिक्रमणने त्याचे वैर कमी होवून जाणार. एकावेळी कांद्याचा एकच पड जाणार, नंतर दुसरा पड, असे जेवढे त्याचे पड असतील तेवढे जाणार. समजले ना तुम्हाला ?
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण करते वेळीच अतिक्रमण झाले तर काय करायचे?
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दादाश्री : मग थोड्यावेळा नंतर करायचे. आपण फटाक्याची वात विझवायला गेलो तेव्हा एक फटाका फूटला तर आपण परत फिरायचे. मग थोड्यावेळा नंतर विझवायचे. असे फटाकेतर फुटतच रहाणार, त्याचेच नांव संसार.
ते उलट करोत, अपमान करोत तरीसुद्धा आम्ही रक्षण करणार. एक भाऊ माझ्या बरोबर ताठ होऊन गेला. मी सर्वांना सांगितले, एक सुद्धा उल्टा विचार करु नका, एक उलटा विचार आला तर प्रतिक्रमण करायचे. तो माणूस चांगला आहे परंतु ही लोक कोणाच्या आधीन आहेत? कषायांच्या आधीन आहेत. आत्म्याच्या आधीन नाहीत ते. आत्म्याच्या आधीन असता तर असे समोर ताठ बोलला नसता. म्हणून कषायांच्या आधीन गेलेला माणूस कोणत्याही प्रकारचा गुन्हा करो ते माफ करण्याजोगे. तो स्वत:च्या आधीनच नाही बिचारा! तो कषाय करतो त्यावेळी आपण शांत राहून ढीले सोडून द्यायला पाहिजे. नाहीतर त्यावेळी सर्व उलटेच करून टाकणार. कषायच्या आधीन म्हणजे उदयकर्मच्या आधीन. जसा उदय होणार तसा फिरणार.
१७. 'मूळ' कारण अभिप्रायचे.... समोरचा किती ही चांगल्या किंवा वाईट भावनेने तुमच्या जवळ आला असेल, परंतु त्याच्या बरोबर कसे वागायचे हे तुम्ही पहायचे. समोरच्याची प्रकृति विकृत असेल तर विकृत प्रकृति बरोबर डोकेफोड करु नये. प्रकृतिनेच जर तो चोर आहे, आपण दहा वर्षापासून त्याची चोरी पाहात आहोत आणि तो येवून आपला पाया पडला तर काय आपण त्याच्यावर विश्वास करायचा? नाही, चोरी करतो त्याला आपण माफ करून देतो की तू जा आता तू सुटलास. आम्हाला तुझ्या बद्दल मनात काही नाही राहणार, परंतु त्याच्यावर विश्वास नाही करायचा आणि त्याची नंतर संगत पण नाही करायची. तरीसुद्धा त्याची संगत केली आणि मग विश्वास नाही ठेवला तर तो पण गुन्हा आहे. खरे म्हणजे संगत नाही करायची आणि केलीच तर त्याचे प्रति पूर्वग्रह रहायला नाही पाहिजे. जे घडले ते योग्य असे ठेवायचे.
प्रश्नकर्ता : तरीसुद्धा उलटा अभिप्राय होऊन गेला तर काय करायचे?
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दादाश्री : होऊन गेला तर माफी मागायची. ज्याच्या प्रति उलटा अभिप्राय झाला त्यासाठी त्याच माणसाची माफी मागायची.
प्रश्नकर्ता : चांगला अभिप्राय द्यायचा की नाही?
दादाश्री : कोणताच अभिप्राय द्यायचा नाही. आणि दिला गेला तर पुसून टाकावे. पुसून टाकायचे साधन आहे तुमच्या जवळ. आलोचनाप्रतिक्रमण-प्रत्याख्यानचे 'अमोघ अस्त्र'.
प्रश्नकर्ता : गाढ अभिप्राय काढायचे कशा पद्धतिने?
दादाश्री : जेव्हा पासून ठरविले की काढायचे आहेत तेव्हा पासून ते निघायला सुरूवात होते. खूप गाढ असतील तर रोज दोन-दोन तास अभिप्राय काढत राहिलात तर ते निघून जातील. आत्मा प्राप्त झाल्या नंतर, पुरुषार्थ धर्म प्राप्त झाला आणि पुरूषार्थ धर्म पराक्रम पर्यंत पोहचू शकतो, जे कुठल्याही प्रकारचे अडथळे उखडून फेकू शकतात. परंतु एकवेळा समजून घ्यायचे की या कारणामुळे हे उभे झाले आहे, मग त्याचे प्रतिक्रमण करावे.
अभिप्राय होणार नाहीत एवढे जरा पहावे. सर्वात जास्त सावध रहा, अभिप्रायापासून. बाकी दूसरी काही हरकत नाही. काहींना तर पाहाण्याच्या अगोदरच अभिप्राय बांधले जातात, ही संसारजागृति एवढी जास्त आहे की अभिप्राय बांधले जातात. म्हणून अभिप्राय झाल्यावर आपण सोडून द्यावे. अभिप्राय प्रति खूपच सावधान रहाण्याची जरूरी आहे. अर्थात् अभिप्राय बांधले तर जातील पण बांधले गेले तर लगेच सोडून द्यावे. अभिप्राय प्रकृति बांधत असते, आणि प्रज्ञाशक्ति अभिप्राय सोडत असते. प्रकृति अभिप्राय बांधत रहाणार, अमुक वेळेपर्यंत बांधतच रहाणार, परंतु आपण ते सारखे सोडतच रहायचे. अभिप्राय बांधले गेले त्याचीच तर ही सर्व भानगड आहे.
__ प्रश्नकर्ता : अभिप्राय बांधला गेला, तर तो सोडवायचा कशा प्रकारे?
दादाश्री : अभिप्राय सोडवण्यासाठी आपण काय करायला हवे की
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
'या व्यक्ति प्रति माझा असा अभिप्राय बांधला गेला, ते चुकीचे आहे, माझ्याकडून असे का झाले?' असे म्हटले तर, अभिप्राय तुटून जाणार. तुम्ही जाहीर करा की, 'हा अभिप्राय चुकीचा आहे, या व्यक्ति प्रति असा अभिप्राय कसा बांधू शकतो? हे तर तुम्ही काय करीत आहात?' याप्रमाणे त्या अभिप्रायला चुकीचे म्हटले, म्हणजे तो सुटून जातो.
प्रतिक्रमण नाही केले तर तुमचा अभिप्राय राहिला, त्यामुळे तुम्ही बंधनांत आलात. जे दोष झाले त्यात तुमचा अभिप्राय राहिला, हे प्रतिक्रमण केले म्हणजे अभिप्राय तुटला. अभिप्रायमुळेच मन उभे झाले आहे. पहा मला, कोणत्याही माणसावर कोणताही अभिप्राय नाही. कारण की एकदा पाहून घेतल्या नंतर भी अभिप्राय बदलत नाही. कोणताही माणूस संयोगानुसार, चोरी करतो आणि मी स्वतः पाहिले तरीसुद्धा त्याला मी चोर म्हणत नाही. कारण की संयोगानुसार आहे. संसारी लोक काय बोलतात की जो पकडला गेला तोच चोर. संयोगानुसार होता की कायमचा चोर होता, त्याची संसारी लोकांना काही पर्वा नाही. मी तर कायमच्या चोरालाच चोर म्हणतो. आणि संयोगानुसारला मी चोर म्हणत नाही. अर्थात्, मी एक अभिप्राय बांधल्या नंतर ते कधी च बदलत नाही. कोणत्याही माणसाचा अभिप्राय आजपर्यंत बदलला नाही.
आपण शुद्ध झालो, आणि चंदुभाईला शुद्ध करायचे हे आपले कर्तव्य. हे पुद्गल काय म्हणत आहे की भाऊ, आम्ही शुद्ध च होतो. तुम्ही आम्हाला बिघडविले, भाव करून, या स्थितिपर्यंत आम्हाला बिघडविले. नाहीतर आमच्यामध्ये रक्त, पु, हाडं काहीच नव्हते. आम्ही शुद्ध होतो, तुम्ही आम्हाला बिघडविले. म्हणून जर तुम्हाला मोक्षाला जायचे असेल तर तुम्ही एकटेच शुद्ध होऊन चालणार नाही. आम्हाला शुद्ध केले तरच तुमची सुटका होणार.
१८. विषय-विकाराला जिंकतो तो राजांचा राजा
प्रश्नकर्ता : एकदा विषयविकाराचे बीज पडून गेले असेल तर ते रूपकमध्ये येईलच ना?
दादाश्री : बिज पडूनच जाणार ना. आणि ते रूपकमध्ये येणार परंतु
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
जोपर्यंत त्याचे मूळ मजबूत नाही झाले, तोपर्यंत कमी-जास्त होऊ शकते म्हणून ते मरण्याआधी शुद्ध होऊन जातील.
६३
त्यासाठी आम्ही विषयविकाराच्या दोषवाल्यांना सांगत असतो की विषयविकारी दोष झाले असतील, अन्य दोष झाले असतील, तर रविवारी उपवास करायचा आणि पूर्ण दिवसभर तेच विचार-मंथन करायचे. विचार करून-करून सारखे त्याला धुत रहाचये. असे आज्ञापूर्वक केले ना, म्हणजे कमी होत जाणार !
आता फक्त डोळ्यांना सांभाळायचे. पूर्वी तर खूपच कडक नेकीदार माणसं विषयविकारचे दोष होताच डोळे फोडून टाकायचे. आपल्याला डोळे फोडून टाकायचे नाही. ती मुर्खता आहे, आपण डोळे वळवून घ्यावे. तरी सुद्धा पाहिले गेले तर प्रतिक्रमण करायचे. एक मिनिट पण प्रतिक्रमण चुकवायचे नाही. खाण्या-पिण्यात चूका झाल्या असतील तर ते चालेल. संसाराचा सर्वात मोठा रोगच हा आहे. ह्याचामुळेच हा संसार उभा राहिला आहे. याच्या मूळावरच संसार उभा आहे. मूळच हे आहे.
हक्काचे खाणार तर मनुष्यात येणार, बिनहक्काचे खाणार तर जनांवरमध्ये जाणार.
प्रश्नकर्ता : आम्ही बिनहक्काचे तर खाल्ले आहे.
दादाश्री : खाल्ले आहे तर मग प्रतिक्रमण करा ना, अजूनही भगवान वाचवतील. अजूनही देरासर (मंदिर) मध्ये जावून पश्चाताप करा. बिनाहक्काचे खाल्ले गेले असेल तर अजूनही प्रतिक्रमण करा, अजून जीवंत आहात. या देहात आहात तोपर्यंत पश्चाताप करा.
प्रश्नकर्ता : एक भीती वाटली, आताच आपण सांगितले की सत्तर टक्के लोक पुन्हा चार पाया (जनावर गतित) मध्ये जाणार आहेत, तर अजून आमच्या जवळ वेळ आहे की नाही?
दादाश्री : नाही, नाही, वेळ राहिला नाही त्यासाठी आता तरी सावध व्हा काही...जरा....
प्रश्नकर्ता : ज्ञान घेतलेल्या महात्मा बद्दल सांगत आहे.
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________
६४
प्रतिक्रमण
दादाश्री : महात्मा, जर कधी माझ्या आज्ञेत राहिले तर त्यांचे कोणी नांव घेणार नाही या संसारात.
___ म्हणून लोकांना काय सांगतो की अजून सुद्धा सावधान होता येईल तर होऊन जा. अजून सुद्धा माफी मागितली ना, तर माफी मागायचा मार्ग आहे.
आपण एखाद्या नातेवाईकाला एवढे मोठे पत्र लिहिले असेल, आणि त्यात शिव्या दिल्या असतील, आपण खूप शिव्या दिल्या असतील, पूर्ण पत्र शिव्यांनी भरलेले असेल, पण मग खाली लिहीले की आज बायको सोबत भांडण झाले, त्यामुळे तुम्हाला असे लिहिले गेले, परंतु मला क्षमा करावे. तर सर्व शिव्या मिटून जाणार की नाही मिटून जाणार? अर्थात् वाचणारा सर्व शिव्या वाचणार, शिव्या स्वीकार करणार आणि नंतर तो माफ पण करणार! अर्थात् असा हा संसार आहे. म्हणून आम्ही तर सांगत असतो ना की माफी मागा, तुमच्या इष्टदेव जवळ माफी मागा तीथे नाही मागत असाल तर माझ्याजवळ मागा. मी तुम्हाला माफ करून देईल. पण खूप विचित्र काळ येत आहे आणि त्यात चंदुभाई आपली मनमानी करत आहे. त्याचा काही अर्थच नाही ना. जीवन जबाबदारीने भरलेले आहे ! सत्तर टक्के तर मी भीत-भीत सांगत आहे. अजून सुद्धा सावधान होता येत असेल तर सावध होऊन जा. ही शेवटची खात्री मी तुम्हाला देत आहे. भयंकर दुःख! अजूनसुद्धा प्रतिक्रमणरूपी हत्यार देत आहे. प्रतिक्रमण करणार तर अजूनही वाचण्याची काहीतरी संधी आहे आणि आमच्या आज्ञेप्रमाणे करणार तर तुमचेच झपाट्याने कल्याण होणार. पाप भोगावे लागतील पण इतके नाही.
हजारो माणसांच्या हजेरीत कोणी बोलले की, 'चंदुभाईमध्ये अक्कल नाही' तर आपल्याला आशीर्वाद द्यायचे मन होते की ओहोहो, आम्ही जाणत होतो की चंदुभाईमध्ये अक्कल नाही परंतु हे तर तो पण जाणतो आहे, तेव्हा वेगळेपण रहाणार!
ह्या चंदुभाईला आम्ही रोज बोलवितो की, यावे चंदुभाई यावे! आणि मग एक दिवशी नाही बोलविले, त्याचे काय कारण? त्याच्या मनात विचार
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
६५
येईल की आज मला पुढे नाही बोलविले. आम्ही त्याला चढवतो, पाडतो, चढवतो आणि पाडतो, असे करीत करीत तो ज्ञान पावतो. आमच्या ह्या सर्व क्रिया ज्ञान मिळविण्यासाठी आहेत. आमची प्रत्येक क्रिया ज्ञान प्राप्ति करून देण्यासाठी आहे. प्रत्येकां बरोबर वेगळी-वेगळी असते, त्याची प्रकृति निघूनच जायला हवी ना. प्रकृति तर काढावीच लागणार. परकी वस्तु कुठपर्यंत आपल्या जवळ रहाणार?
प्रश्नकर्ता : खरी गोष्ट आहे, प्रकृति निघाल्या शिवाय सुटकाच नाही.
दादाश्री : हो. आमची प्रकृति तर निसर्गाने काढली, आमची तर ज्ञानाने काढली.(ज्ञान प्राप्ति झाल्यावर संपली) आणि तुमची तर आम्ही काढणार तेव्हाच ना, निमित्त आहोत ना!!
१९. खोटे ची लत्त आहे त्याला... प्रश्नकर्ता : आम्ही खोटे बोललो असेल ते पण कर्मबांधले म्हणायचे
ना?
दादाश्री : नक्कीच! परंतु खोटे बोलले असाल, त्यापेक्षा खोटे बोलण्याचे भाव केले ते मोठे कर्म म्हणायचे. खोटे बोलणे हे तर म्हणा की कर्मफळ आहे. खोटे बोलण्याचे भावच, खोटे बोलण्याचा आमचा निश्चय, त्याने कर्मबंध होत असतात. तुमच्या लक्षात आले? हे वाक्य तुम्हाला मदत करेल काही? काय मदत करणार?
प्रश्नकर्ता : खोटे बोलणे बंद व्हायला हवे.
दादाश्री : नाही, खोटे बोलायचा अभिप्रायच सोडून द्यायला हवा. खोटे बोलले गेले तर पश्चाताप करायला पाहिजे की काय करू? असे खोटे नाही बोलायला पाहिजे.' त्याने खोटे बोलणे बंद नाही होऊ शकत. पण तो अभिप्राय बंद होईल. 'आता आजपासून खोटे नाही बोलणार, खोटे बोलणे हे महापाप आहे, महादुःखदायी आहे, आणि खोटे बोलणे हेच बंधन आहे.' असा अभिप्राय जर तुमच्याकडून झाला तर तुमचे खोटे बोलण्याचे पाप बंद होऊन जाणार.
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________
६६
प्रतिक्रमण
'रिलेटिव धर्म' कसा असला पाहिजे की, खोटे बोलले गेले तर बोल पण त्याचे प्रतिक्रमण कर.
२०. जागृति, वाणी वाहते तेव्हा... मनाची एवढी हरकत नाही, वाणीची हरकत आहे. कारण मन तर गुप्त प्रकारे चालत असते, पण वाणी तर समोरच्याच्या छातीत घाव करते. त्यासाठी या वाणीने ज्या ज्या माणसांना दुःख झाले असेल त्या सर्वांची क्षमा मागत आहे, असे प्रतिक्रमण करता येईल.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमणने वाणीचे हे सर्व दोषं माफ होतील ना?
दादाश्री : दोषांचे अस्तित्व राहील, परंतु जळालेल्या दोरी सारखे दोषांचे अस्तित्व राहील. म्हणून पुढच्या जन्मात आम्ही 'असे' केले की सर्व गळून पडतील. प्रतिक्रमणने, त्याच्यातील सर्व सत्व उडून जाणार.
कर्ताचा आधार असेल तर कर्म बांधले जाणार. आता तुम्ही कर्ता नाही. म्हणुन पूर्वी बांधलेले कर्म आता फळ देवून पूरे होतील. नविन कर्म बांधले जाणार नाही.
प्रश्नकर्ता : माणूस वैतागून बोलला ते अतिक्रमण नाही का? दादाश्री : अतिक्रमणच म्हणायचे ना!
प्रश्नकर्ता : कोणाला दुःख होईल अशी वाणी निघून गेली आणि त्याचे प्रतिक्रमण नाही केले तर काय होणार?
दादाश्री : अशी वाणी निघून गेली, तर त्यामुळे समोरच्याचा जिव्हारी लागेल, म्हणजे त्याला दु:ख होणार. समोरच्याला दु:ख होणार हे तर आपल्याला कसे आवडेल?
प्रश्नकर्ता : त्याच्याने बंधन होणार?
दादाश्री : हे कायदाच्या विरूद्ध म्हणायचे ना? कायदाचे विरूद्ध, झाले ना? कायदाचे विरूद्ध तर नाहीच व्हायला पाहिजे ना? आमची आज्ञा पाळली ना, त्याला धर्म म्हणतात. आणि प्रतिक्रमण करण्यात आपले काय
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
नुकसान आहे? माफी मागून घ्या आणि पुन्हा नाही करणार असे भाव पण ठेवायचे. बस एवढेच, थोडक्यात करून टाकावे. याच्यात भगवान काय करणार? त्याच्यात कुठे न्याय पहायचा असतो ? व्यवहारला जर व्यवहार समजलात तर न्याय समजून गेलात! शेजारी उलटे का बोलून गेला? कारण की, आपला व्यवहार तसा होता म्हणून. आणि आपल्याकडून वाणी उलट निघाली तर ती समोरच्याचे व्यवहाराधीन आहे. परंतु आपल्याला तर मोक्षाला जायचे आहे त्यासाठी प्रतिक्रमण करून घ्यायचे.
६७
प्रश्नकर्ता : समोरचा उलटे बोलतो त्यावेळी आपल्या ज्ञानाने समाधान राहतो. परंतु मुख्य प्रश्न हा आहे की, आमच्याकडून कटूता निघत असते. तर त्यावेळी आम्ही त्या वाक्याचा आधार घेतो, तर आम्हाला उलटे लाइसन्स मिळून जाते.
दादाश्री : त्या वाक्याचा आधार घ्यायचाच नाही ना? त्यावेळी तर तुम्हाला प्रतिक्रमणाचा आधार दिला आहे. समोरच्याला दुःख झाले असे बोलले गेले असेल तर प्रतिक्रमण करून घ्यायचे.
आणि समोरचा वाटेल तसा बोलतो, तेव्हा वाणी पर आहे आणि पराधीन आहे, असे स्वीकार केले म्हणजे तुम्हाला समोरच्याचे दुःख रहातच नाही ना?
प्रश्नकर्ता : परमार्थच्या कामासाठी थोडे खोटे बोललो तर त्याचा दोष लागणार?
दादाश्री : परमार्थ म्हणजे आत्मासाठी जे काही पण केले जाते, त्यात दोष लागत नाही आणि देहासाठी जे काही केले जाते, त्याची जर खोटे करण्यात आले तर दोष लागणार, चांगले करण्यात आले तर फायदेशीर लागणार. आत्म्यासाठी जे काही पण केले जाते त्याची हरकत नाही. हां, आत्महेतु असेल, त्या संबंधी जे जे कार्य असेल त्याच्यात काही दोष नाही, समोरच्याला आपल्या निमित्ते दुःख झाले तर दोष लागतो !
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमणचा परिणाम नाही झाला तर त्याचे कारण काय, आम्ही पूर्णभावने नाही केले त्यामुळे, की मग समोरच्या व्यक्तिचे आवरण आहेत ?
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________
६८
प्रतिक्रमण
दादाश्री : समोरच्या व्यक्तिचे आपण नाही पाहायचे. तो तर वेडा पण असेल. आपल्या निमित्ते त्याला दुःख नाही झाले पाहिजे, बस!
प्रश्नकर्ता : अर्थात कोणत्याही प्रकारे त्याला दुःख झाले तर त्याचे समाधान करायचे आम्ही प्रयत्न करायला पाहिजे.
दादाश्री : त्याला दुःख झाले तर त्याचे समाधान अवश्य करायला हवे. ती आपली 'रिस्पोन्सिबिलिटी' (जबाबदारी) आहे. हो, दु:ख नाही व्हावे त्यासाठीच तर आपले आयुष्य आहे.
प्रश्नकर्ता : परंतु समजा की असे करूनही समोरच्याचे समाधान होत नसेल, तर मग आमची जबाबदारी किती?
दादाश्री : प्रत्यक्ष जावून जर डोळ्यांनी होत असेल तर डोळ्यांत नम्रता दाखवायची. अशी माफी मागितल्यावर त्याने चापट मारली तर समजून जायचे की तो नालायक आहे. तरीसुद्धा निकाल करायचा आहे. माफी मागितल्यावर त्याने चापट मारली तर समजून जायचे की त्याच्या बरोबर चुक तर झाली आहे, परंतु नालायक माणूस आहे त्यामुळे नम्रता दाखवणे बंध करा.
प्रश्नकर्ता : हेतु चांगला असेल तर मग प्रतिक्रमण का करायचे?
दादाश्री : प्रतिक्रमण तर करायला पाहिजे कारण त्याला दुःख झाले ना, आणि व्यवहारात लोक म्हणतात की, पहा ही बाई पतिला कशी धमकावत आहे. मग प्रतिक्रमण करावे लागेल. जे डोळ्यांना दिसते त्याचे प्रतिक्रमण करायचे. आतला हेतु तुमचा सोन्याचा असेल, पण काय कामाचा? तो हेतु नाही चालणार. हेतु शुद्ध सोन्याचा असला तरी पण आम्हाला प्रतिक्रमण करावे लागेल. चुक झाली की प्रतिक्रमण करायला हवे. ही सर्व महात्मांची इच्छा आहे. आता जगतकल्याणची भावना आहे, हेतु चांगला आहे पण तरीसुद्धा नाही चालत. प्रतिक्रमण तर अवश्य करायला हवे. कपड्यावर डाग पडला तर धुवून टाकता ना? असे हे कपड्यावरचे डाग आहेत.
प्रश्नकर्ता : व्यवहारात कोणी चुक करत असेल तर त्याला टोकावे
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
लागते, त्यामुळे त्याला दु:ख होत असते, तर कशाप्रकारे त्याचा निकाल लावायचा?
दादाश्री : व्यवहारात टोकावे लागते, पण त्यात अहंकारासहित होते म्हणून प्रतिक्रमण करायला पाहिजे.
प्रश्नकर्ता : टोकले नाही तर तो डोक्यावर चढेल?
दादाश्री : टोकायला तर पाहिजे. पण सांगता आले पाहिजे. सांगता नाही येत, व्यवहार नाही येत म्हणजे अहंकारासहित टोकणे होणार. त्यासाठी मग त्याचे प्रतिक्रमण करायचे. तुम्ही समोरच्याला टोकले म्हणजे समोरच्याला वाईट तर वाटणार पण त्याचे प्रतिक्रमण वारंवार करीत राहिलात म्हणजे सहा महिन्यानी, बारा महिन्यानी वाणी अशी निघेल की समोरच्याला मधूर लागेल.
आता जर आम्ही कोणाची गम्मत केली तर त्याचे आम्हाला प्रतिक्रमण करावे लागते. आम्हाला असे च्या असे चालत नाही.
प्रश्नकर्ता : ती तर गम्मत म्हणायची, असे तर होत रहाते ना!
दादाश्री : नाही, तरीसुद्धा आम्हाला प्रतिक्रमण करावे लागेल. तुम्ही नाही केले तर चालेल, पण आम्हाला प्रतिक्रमण करावे लागेल, नाहीतर आमचे हे ज्ञान, ही 'टेपरेकार्ड' (वाणी) निघत असते ना, ती फीकी निघते.
बाकी, मी तर सर्व प्रकारची मस्करी केली होती. सर्व प्रकारची मस्करी कोण करणार? खूपच टाईट ब्रेन (तेज बुद्धि) असेल तो करणार. मी तर लहरीप्रमाणे मस्करी करत होतो, सर्वांची. चांगल्या-चांगल्या माणसांची, मोठमोठ्या वकीलांची, डॉक्टरांची मस्करी करत होतो. आता वाटते की तो सर्व अहंकारच होता ना! तो आमच्या बुद्धिचा दुरुपयोगच केला ना! मस्करी करणे हे बुद्धिचीच निशाणी आहे.
प्रश्नकर्ता : मस्करी करण्यात धोका काय आहे? कोणत्या प्रकारचा धोका येतो?
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________
७०
प्रतिक्रमण
दादाश्री : असे आहे, कोणाला थप्पड मारली आणि त्याचे जोखिम येते त्यापेक्षा ही मस्करी करण्यात अनंतपटीने जोखिम आहे. त्याची बुद्धि नाही पोहोचली तेथपर्यंत म्हणून तुम्ही आपल्या बुद्धिच्या लाईटने त्याला तुमच्या ताब्यात घेतले.
प्रश्नकर्ता : ज्याला नविन टेप नाही करायचे, त्याच्यासाठी काय मार्ग?
दादाश्री : कुठलेही स्पंदन करायचे नाही. सर्व काही पाहात रहायचे. पण असे होत नाही ना! हे पण मशीन आहे आणि पुन्हा पराधीन आहे. म्हणून आम्ही दुसरा मार्ग दाखवित आहोत की, टेप झाले की लगेच त्याला पुसून टाकले तर चालेल. प्रतिक्रमण हे पुसायचे साधन आहे. त्याने एकाद जन्मामध्ये फेरफार होऊन सर्व (फालतू) बोलण्याचे बंद होऊ शकते.
प्रश्नकर्ता : शुद्धात्माचे लक्ष बसल्यानंतर निरंतर प्रतिक्रमण होतच राहतात.
दादाश्री : म्हणजे तुमची जबाबदारी राहत नाही. जे बोललात त्याचे प्रतिक्रमण झाले म्हणजे जबाबदारी नाही राहिली ना! कडक बोलायचे पण राग-द्वेष रहित बोलायचे. कडक बोलले गेले तर त्वरित प्रतिक्रमण विधि करून घ्यायची.
मन-वचन-कायाचा योग, भावकर्म-द्रव्यकर्म-नोकर्म, चंदुलाल आणि चंदुलालच्या नांवाची सर्व मायापासून भिन्न अशा 'शुद्धात्मा'ला स्मरूण म्हणायचे की, 'हे शुद्धात्मा भगवान, माझ्याने कडक बोलले गेले ती चुक झाली, त्यासाठी त्याची माफी मागत आहे, आणि ती चुक पुन्हा नाही करणार असा निश्चय करीत आहे. ती चुक नाही करण्याची मला शक्ति द्या.' 'शुद्धात्मा'ला स्मरूण किंवा 'दादा'ला स्मरूण म्हणायचे की, 'ही चूक होऊन गेली' अर्थात् ती झाली आलोचना, आणि ती चुक धुवून टाकायची हे प्रतिक्रमण आणि ती चुक पुन्हा नाही करणार असा निश्चय करायचा, ते प्रत्याख्यान आहे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्यानंतर आमची वाणी खूपच चांगली होऊन जाणार, ह्या जन्मातच?
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
७१
दादाश्री : तद्नंतर तर काही वेगळ्याच प्रकारची होणार. आमची वाणी सर्वोकृष्ट श्रेणीची निघत आहे त्याचे कारणच प्रतिक्रमण आहे आणि निर्विवादी आहे त्याचे कारण पण प्रतिक्रमणच आहे. नाहीतर विवादच असेल. सर्वत्र विवादी वाणी असते. व्यवहारशुद्धि विना स्यावाद वाणी निघतच नाही. व्यवहार शुद्धि प्रथम व्हायला पाहिजे.
२१. सुटतात प्रकृति दोष असे... हे सत्संगचे विष पिणे चांगले आहे. परंतु बाहेरचे अमृत पिणे वाईट आहे. कारण की हे विष प्रतिक्रमणयुक्त आहे. आम्ही सर्व विषाचे पेले पिवून महादेवजी झालो आहोत.
प्रश्नकर्ता : आपल्या जवळ यायला खुपच विचार करतो पण येणे होत नाही.
दादाश्री : तुमच्या हातात कोणती सत्ता आहे? तरी पण यायचा विचार करतो आणि येणे होत नाही त्याचा मनात खेद व्हायला पाहिजे. आपण त्याला सांगायचे की, चंदुभाई प्रतिक्रमण करा ना, लवकर उलगडा होईल. जाणे होत नाही त्यासाठी प्रतिक्रमण करा, प्रत्याख्यान करा. अशी भूलचुक झाली पण पुन्हा अशी भूलचुक नाही करणार.
आता जे भाव येत आहेत ते कशामुळे जास्त येत आहेत? आणि कार्य का नाही होत? भाव कशामुळे येत आहेत की, कमिंग इवेन्टस् कास्ट देर सँडोज बीफोर. (जे होणार आहे त्याचे चाहूल आधी लागते) या सर्व गोष्टी होणार आहेत.
प्रश्नकर्ता : चिंता होत असेल तर त्याचे प्रतिक्रमण कशाप्रकारे करायचे?
दादाश्री : 'माझ्या अहंकारामुळे ही चिंता होते. मी त्याचा कर्ता थोडाच आहे? म्हणून दादा भगवान क्षमा करा.' असे काहीतरी करावे लागेलच ना? त्या शिवाय चालणार कसे?
प्रश्नकर्ता : आपण खूप थंडी पडली, खूप थंडी पडली असे बोललो हे प्रकृतिच्या विरुद्ध बोललो तर त्याचे प्रतिक्रमण करायचे?
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दादाश्री : नाही, प्रतिक्रमण तर जेथे राग-द्वेष होत असेल, ‘फाईल' असेल तेथे करायचे. कढी खारट असेल तर कढीचे प्रतिक्रमण नाही करायचे. परंतु ज्यांनी खारट केली असेल त्यांचे प्रतिक्रमण करायचे. प्रतिक्रमणामुळे समोरच्याची परिणति परिवर्तित होत असते.
लघवी करायला गेलो तेथे एक मुंगी वाहून गेली तर तिचे आम्ही प्रतिक्रमण करतो. उपयोग नाही चुकवायचा. वाहणे हे 'डिस्चार्ज'रूप आहे, पण त्यावेळी अतिक्रमण दोष का झाला? जागृति का मंद झाली? त्याचा दोष लागतो.
वाचनकरते वेळी पुस्तकाला नमस्कार करून म्हणावे की, 'दादा, मला वाचण्याची शक्ति द्यावी.' आणि जर एखाद्या दिवशी विसरून गेलो तर उपाय करावा. दोन वेळा नमस्कार करावे आणि म्हणावे की, 'दादा भगवान, माझी इच्छा नव्हती तरीसुद्धा विसरून गेलो तर त्याची माफी मागत आहे. पुन्हा असे नाही करणार.'
वेळीच विधि करायचे विसरून गेलात, मग आठवण आली तर प्रतिक्रमण करून नंतर विधि करायची.
'डिस्चार्ज' मध्ये जे अतिक्रमण होऊन गेलेले आहेत त्यांचे आपण प्रतिक्रमण करत असतो. समोरच्याला दुःख होणार अश्या 'डिस्चार्ज चे प्रतिक्रमण करायचे. येथे महात्मांचे अथवा दादांचे चांगले केले त्याचे प्रतिक्रमण करायचे नसतात. परंतु बाहेर कोणाचे चांगले केले तर त्याचे प्रतिक्रमण करावे लागते, त्यात तुम्हाला उपयोग चुकल्याचे प्रतिक्रमण करावे लागते.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केले तर समोरच्याला पोहचणार?
दादाश्री : समोरच्या व्यक्तिला पोहचते. नरम होत जाईल. त्याला खबर पडो अथवा न पडो. पण त्याचा भाव आपल्या प्रति नरम होऊन जातो. आपल्या प्रतिक्रमणमध्ये तर खूपच परिणाम आहे. एक तास जर केले तर समोरच्यात परिवर्तन होत असतो. जर सर्व विधिवत् झाले तर. आपण ज्याचे प्रतिक्रमण करतो तो आपले दोष तर पाहाणार नाही, परंतु आपल्या प्रति त्याला सन्मान उत्पन्न होणार.
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
७३
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केले तर नविन * चार्ज' नाही होणार?
दादाश्री : आत्मा कर्ता झाला तर कर्म बांधणार. प्रतिक्रमण आत्मा करत नाही. चंदुभाई करतो आणि तुम्ही त्याचे ज्ञाता-द्रष्टा रहा.
निजस्वरूप प्राप्ति नंतर खरे प्रतिक्रमण होतात. प्रतिक्रमण करणारा हवा. प्रतिक्रमण करवून घेणारा हवा.
आपले प्रतिक्रमण म्हणजे काय? की रहाटचा दोरखंड खोलते वेळी जेवढे तुकडे असतील त्यांना जोडून चांगले करून टाकतो तसे आपले प्रतिक्रमण आहे.
प्रश्नकर्ता : झोपेतून उठल्याबरोबरच प्रतिक्रमण सुरू होतात.
दादाश्री : तो 'प्रतिक्रमण आत्मा' झाला. शुद्धात्मा तर आहे परंतु हा प्रतिष्ठित आत्मा तो 'प्रतिक्रमण आत्मा' होऊन गेला. लोकांचा कषायी आत्मा आहे. दुनियेत कोणी एकपण प्रतिक्रमण करू शकेल असा नाही.
जसे जसे प्रतिक्रमण रोकडा (त्वरित) होत जाते तसे तसे शुद्ध होत जाते. अतिक्रमणच्या समोर रोकडा प्रतिक्रमण केले, तर मन, वाणी शुद्ध होत जाते.
प्रतिक्रमण म्हणजे बियाणेला भाजून पेरणी करणे.
आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान म्हणजे रोजच्या जमाखर्चाची ताळेबंदी काढणे.'
जेवढे दोष दिसतात तेवढी कमाई. तेवढे प्रतिक्रमण करणे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण नाही होत तो प्रकृतिदोष आहे की अंतराय कर्म आहे?
दादाश्री : तो प्रकृतिदोष आहे आणि हा प्रकृतिदोष सर्वठिकाणी नाही होत. अमुक ठिकाणी दोष होतात आणि अमुक ठिकाणी नाही होत. *चार्ज = नवीन कर्म बांधले जातात.
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रकतिदोषामुळे प्रतिक्रमण नाही होत त्याची हरकत नाही. आपण तर एवढेच पहायचे आहे की, आपला भाव काय आहे? दुसरे काही आपण पहायचे नाही. तुमची इच्छा प्रतिक्रमण करण्याची आहे ना?
प्रश्नकर्ता : हा, पुरेपूर.
दादाश्री : तरीसुद्धा प्रतिक्रमण नाही होत, तर तो प्रकृतिदोष आहे. प्रकृति दोषामध्ये तुम्ही जबाबदार नाहीत. कधीकधी प्रकृति आवाज उठवेलही आणि कधी नाहीपण उठवणार, याला तर बाजा म्हणायचे, वाजला तर वाजला, नाहीतर नाहीपण वाजणार, त्याला अंतराय नाही म्हणत.
७४
प्रश्नकर्ता : समभावे निकाल' करायचा दृढ निश्चय असून सुद्धा भांडण होते, असे कशामुळे?
दादाश्री : किती ठिकाणी असे होत असते? शंभर- एक ठिकाणी ? प्रश्नकर्ता : एकच ठिकाणी होत असते.
दादाश्री : तर ते निकाचित ( असे भारी कर्म जे अवश्य भोगावे लागतात) कर्म आहे. ते निकाचित कर्म कशाने धुवावे? आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यानाने. त्याच्याने कर्म हलके होऊन जाते. तद्नंतर ज्ञाता-द्रष्टा रहाता येते. त्यासाठी तर प्रतिक्रमण निरंतर करावे लागते. जेवढ्या 'फोर्स'ने निकाचित झाले असेल तेवढ्याच 'फोर्स' वाले प्रतिक्रमणने ते धुतले जाईल.
प्रश्नकर्ता : आपण नक्की केले की भविष्यात असे नाहीच करायचे. अशी चुक पुन्हा नाहीच करायची. असा हंड्रेड परसेन्ट (शंभर टक्के) भाव ठेवून नक्की केले, तरीसुद्धा अशी चुक पुन्हा होणार की नाही होणार, हे आपल्या हातात आहे का?
दादाश्री : ती तर होणार ना पुन्हा. असे आहे ना की तुम्ही येथे एक चेंडू आणला आणि मला दिला, मी येथून त्याला टाकले, मी तर एकच कार्य केले, मी तर चेंडू एकच वेळा टाकला. आता माझी इच्छा नाही म्हणून मी म्हणतो की, तू बंद होऊन जा, तर तो बंद होऊन जाणार का ?
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
७५
प्रश्नकर्ता : नाही होणार. दादाश्री : मग काय होणार? प्रश्नकर्ता : तो तर तीन-चार-पांच वेळा उछलणार.
दादाश्री : म्हणजे आपल्या हातातून मग नेचरच्या (निर्सगाच्या) हातात गेला. मग नेचर जेव्हा बंद करेल तेव्हा, तर असे हे सर्व आहे. आपल्या ज्या चूका आहेत, त्या नेचरच्या हातात जातात!!
प्रश्नकर्ता : नेचरच्या हातात गेल्या तरी पण प्रतिक्रमण केल्याचा काय फायदा होत असतो?
दादाश्री : खूप परिणाम होतो. प्रतिक्रमणने समोरच्या माणसावर इतका मोठा परिणाम होत असतो की जर कधी एक तास एका माणसाचे प्रतिक्रमण केले तर त्या माणसामध्ये काही नविन प्रकारचे, खूप जबरदस्त परिवर्तन होते. प्रतिक्रमण करणाऱ्याला हे ज्ञान दिलेले असायला पाहिजे. शुद्ध झालेला, 'मी शुद्धात्मा आहे' असे भानवाला. तर त्याच्या प्रतिक्रमणाने खूप परिणाम होणार. प्रतिक्रमण तर आमचे हत्यार आहे मोठ्यातले मोठे !
'ज्ञान' घेतलेले नसेल तेव्हा तर प्रकृति पूर्ण दिवस उलटच चालत असते आणि आता तर सुलटच चालत असते. तू समोरच्याला सुनावून दिले, परंतु आतून म्हणतो की, 'नाही, नाही, असे नाही करायचे. सुनावून घ्यायचा आला त्याचे प्रतिक्रमण करा.' आणि ज्ञानच्या पहिले तर सुनावूनच द्यायचा, आणि वरून म्हणायचा की अजून सुनावण्यासारखे होते.
मनुष्यचा स्वभाव कसा आहे की जशी प्रकृति तसा स्वतः होऊन जातो. जेव्हा प्रकृति सुधारत नाही तेव्हा म्हणेल मरू दे, 'पिछा सोड'! अरे, बाहेर नाही सुधारली तर काही हरकत नाही, तू स्वत:ला आत सुधार ना ! मग आपली रिस्पोन्सिबिलिटी नाही! इतके मोठे हे 'सायन्स' आहे !!! बाहेर पाहिजे ते होवो त्याची रिस्पोन्सिबिलिटी च नाही. एवढे समजलात तर उलगडा होईल.
२२. निकाल, चिकट फाईलींचा बरेचसे लोक मला म्हणत असतात की, 'दादा समभावे निकाल
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________
७६
प्रतिक्रमण
करायला जातो पण होत नाही!' तेव्हा मी सांगतो, अरे भाऊ, निकाल करायचा नाही! तुला समभावे निकाल करायचा भावच ठेवायचा आहे. समभावे निकाल होतो की नाही होत ते, तुझ्या आधीन नाही, तू माझ्या आज्ञामध्ये रहा ना! त्याने तुझी बरीचशी कामे पूर्ण होऊन जातील आणि नाही पूर्ण झाली तर ते 'नेचर'च्या आधीन आहे.
समोरच्याचे दोष दिसणे बंद झाले तर संसार सुटणार. कोणी आपल्याला शिवीगाळ केली, नुकसान केले, मारले तरी त्याचे दोष नाही दिसले तेव्हा संसार सुटणार, नाहीतर संसार सुटणार नाही.
आता लोकांचे दोष दिसणे बंद होऊन गेले?
प्रश्नकर्ता : हो, दादा अधूनमधून दोष दिसले तर प्रतिक्रमण करून घेतो.
दादाश्री : मार्ग हाच आहे की, 'दादाच्या आज्ञेमध्ये रहायचे आहे' असा निश्चय करून दुसऱ्या दिवसापासून सुरूवात करून द्या. आणि जेवढे आज्ञामध्ये नाही राहिले गेले तेवढ्याचे प्रतिक्रमण करून घेणे. आणि घरातील प्रत्येक माणसांना संतोष देणे, समभावे निकाल करून. तरीसुद्धा घरातील सर्व उड्या मारत असतील, तर आपण पहात रहायचे. आपला मागच्या जन्माचा हिशोब आहे म्हणून उड्या मारीत आहे. हे तर आजच नक्की केले आहे. अर्थात् घरातील सर्वांना प्रेमाने जिंकायचे. हे तर मग स्वत:ला पण कळते की आता सर्व काही ठिकाणे लागून राहिले आहे. तरीसुद्धा घरातील माणसं अभिप्राय देतील तेव्हाच ते मानने योग्य म्हणायचे. घरातील माणसं, शेवटी तर त्याच्याच पक्षमध्ये असतात.
प्रश्नकर्ता : आपण जे प्रतिक्रमण करतो ते प्रतिक्रमणचे परिणाम, या मूळ सिद्धांतवर आहे की आपण समोरच्याच्या शुद्धात्माला पहातो तर त्याचे प्रति जे भाव आहेत, वाईट भाव आहेत, ते कमी होतील?
दादाश्री : आपले वाईट भाव तुटून जातील. आपल्या स्वत:साठीच आहे हे सर्व. समोरच्याला काही घेणे-देणे नाही. समोरच्यातील शुद्धात्माला
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
पहाण्याचा एवढाच हेतू आहे की आपण शुद्ध अवस्थामध्ये, जागृत अवस्थामध्ये आहोत.
७७
प्रश्नकर्ता : तर मग त्याचा आपल्या प्रति वाईट भाव असेल, तो कमी होईल ना?
दादाश्री : नाही, कमी नाही होणार. तुम्ही प्रतिक्रमण केले तर होईल. शुद्धात्मा पाहिल्याने नाही होणार, परंतु प्रतिक्रमण केले तर होईल.
प्रश्नकर्ता : आपण प्रतिक्रमण केले तर त्या आत्मावर परिणाम होईल की नाही ?
दादाश्री : होईल ना, परिणाम होईल, शुद्धात्मा पाहिल्याने पण फायदा होईल. पण लगेच फायदा नाही होणार, नंतर होईल हळू हळू, हळू ! कारण की शुद्धात्मा दृष्टिने कोणाला पाहिलेच नाही. चांगला माणूस किंवा वाईट माणूस, या दृष्टिने पाहिले आहे. पण शुद्धात्मा दृष्टिने कोणी पाहिले नाही.
जर वाघ बरोबर प्रतिक्रमण केले तर वाघ पण आपल्या सांगितल्या प्रमाणे काम करेल. वाघमध्ये आणि मनुष्यमध्ये फरक काहीच नाही. फरक तुमच्या स्पंदनांचा आहे, ज्यांचा त्याच्यावर परिणाम होत असतो. वाघ हिंसक आहे असे तुमच्या ध्यानात आहे, तेथपर्यंत तो स्वत: हिंसकच राहील. आणि वाघ शुद्धात्मा आहे असे ध्यान राहिले, तर तो शुद्धात्माच आहे आणि अहिंसक राहील. सर्व काही संभव आहे.
एकदा आंब्याच्या झाडावर माकड आले आणि कैऱ्या तोडून टाकू लागले, तर परिणाम कुठ पर्यंत बिघडतो की हे झाडच कापून टाकले असते तर बरे. असे (विचार) करून टाकतो. आता भगवंताच्या साक्षीत निघालेली वाणी काय व्यर्थ थोडीच जाणार? परिणाम नाही बिघडला तर काही च नाही. सर्व शांत होऊन जाईल, बंद होऊन जाईल. हे सर्व आपलेच परिणाम आहेत. आपण आजपासून कोणासाठी स्पंदन करण्याचे, कोणासाठी किंचित्मात्र विचार करण्याचे बंद करून द्या. विचार आला तर प्रतिक्रमण करून धुवून टाकायचे. म्हणजे पूर्ण दिवस कोणाच्याही
Page #91
--------------------------------------------------------------------------
________________
७८
प्रतिक्रमण
स्पंदना शिवाय गेला ! अशा प्रकारे दिवस गेला तर खूप झाले, हाच पुरुषार्थ आहे.
हे ज्ञान मिळाल्यानंतर नविन पर्याय अशुद्ध होत नाही, जुने पर्याय शुद्ध करायचे आणि समतामध्ये रहायचे. समता म्हणचे वीतरागता. नविन पर्याय बिघडत नाही, नविन पर्याय शुद्धच रहातात. जुने पर्याय अशुद्ध झाले असतील, त्यांचे शुद्धिकरण करायचे. आमच्या आज्ञामध्ये राहिल्याने त्यांचे शुद्धिकरण होईल आणि समतामध्ये रहायचे.
प्रश्नकर्ता : दादाजी, ज्ञान घेतल्या आधीचे या जन्माचे जे पर्याय बांधले गेले आहेत, त्याचे निराकरण कशाप्रकारे होणार?
दादाश्री : अजून आपण जीवंत आहोत, तोपर्यंत पश्चाताप करून धुवून टाकायचे पण ते ठराविकच, सर्व निराकरण नाही होणार. पण ढीलेतर होऊनच जाईल. ढीले होऊन गेले म्हणजे येणाऱ्या जन्मात हात लावल्या बरोबर गाठ सुटून जाईल!
प्रश्नकर्ता : आपले ज्ञान मिळण्यापूर्वी नरकाचे बंध (कर्मबंधन) पडले असतील तर नरकात जावेच लागेल ना?
दादाश्री : त्याचे असे आहे की, हे ज्ञानच असे आहे की सर्व पापं भस्मीभूत होऊन जातात, बंध उडून जातात. नरकात जाणारा असो परंतु ते जीवंत आहे तोपर्यंत प्रतिक्रमण करणार तर त्याचे धुतले जाईल. पोष्टात पत्र टाकण्या अगोदर तुम्ही लिहिले की उपरोक्त वाक्य लिहितांना मन ठिकाणावर नव्हते तर ते उडून जाणार.
प्रश्नकर्ता : प्रायश्वितने बंध सुटून जाणार?
दादाश्री : होय, सुटून जाणार. अमूक प्रकारचे बंध आहेत, ते प्रायश्चित केल्याने मजबूत गाठीतून ढीले होऊन जाणार. आपल्या प्रतिक्रमणमध्ये खूप शक्ति आहे. दादांना हजेर करून केले तर...
कर्माच्या धक्क्याने जे जन्म होणारे असतील ते होतील. कदाचित् एक-दोन जन्म. परंतु त्याच्या नंतर सीमंधर स्वामींच्या जवळच जावे लागणार. हा इथला धक्का, तर पूर्वी बांधलेल्या हिशोबा प्रमाणे, जरा चिकट
Page #92
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
७९
झालेला आहे, ते पण पूर्ण होईल. त्यात सुटकाच नाही ना! हा तर रघा सोनाराचा तराजू (धर्मकाटा) आहे. न्याय, जबरदस्त न्याय! शुद्ध न्याय, प्युअर न्याय! त्याच्यात पोलंपोल चालत नाही.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने कर्माचे धक्के कमी होणार ? दादाश्री : कमी होणार ना! आणि लवकर निवाडा होणार.
प्रश्नकर्ता : ज्याची क्षमा मागायची आहे त्या व्यक्तिचा मृत्यु झाला असेल तर ते कशाप्रकारे करायचे?
दादाश्री : मृत्यु होऊन गेला असेल, तरी पण आपण त्यांचा फोटो असेल, त्यांचा चेहरा आठवत असेल, तर करता येते. चेहरा जरासुद्धा आठवत नसेल आणि नांव माहित असेल तर नांव घेवून पण करू शकता, तर त्याला सर्व पोहचून जाणार.
२३. मन आकांत करते तेव्हा... महात्मांना भाव-अभाव होत असतो पण ते निकालीकर्म आहे, भावकर्म नाही. क्रोध-मान-माया-लोभ, राग-द्वेष आणि भावाभाव ही सर्व निकालीकर्म आहेत. त्याचा समभावे निकाल करायचा आहे. ही कर्मे प्रतिक्रमण सहित निकाली होतात. असे च्या असे निकाल नाही होत.
प्रश्नकर्ता : कधीतरी आपला अपमान करून टाकला, तर तेथे मनाचा प्रतिकार चालू रहातो, वाणीचा प्रतिकार कदाचित् नाही होत.
दादाश्री : त्यावेळी काय झाले त्याची आपल्याला हरकत नाही, अरे देहाचाहि प्रतिकार होऊन गेला, तरीही. जेवढी जेवढी शक्ति असेल, त्याप्रमाणे व्यवहार होत असतो. ज्यांची संपूर्ण शक्ति उत्पन्न झालेली असेल, त्याच्या मनाचा प्रतिकारही बंद होऊन जाणार, तरीपण आपण काय म्हणतो? मनाचा प्रतिकार चालू राहो, वाणीने प्रतिकार होऊन गेला, अरे देहाचाही प्रतिकार होऊन गेला. तीनही प्रकारची निर्बलता उत्पन्न झाली तर त्या तीनही प्रकारचे प्रतिक्रमण करावे लागेल.
Page #93
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : विचारांचे प्रतिक्रमण करावे लागतात?
दादाश्री : विचारांना पहायचे. त्यांचे प्रतिक्रमण नाही. कोणासाठी खपच वाईट विचार येत असतील तर त्याचे प्रतिक्रमण करावे लागेल. पण कोणाचे नुकसान करणारी वस्तु असेल तरच. असेच्या असे आले, कोणत्याही प्रकारचे येवोत, गायीचे, म्हशीचे सर्व प्रकारचे विचार येवोत, ते तर आपल्या ज्ञानने उडून जाणार. ज्ञानच्या दृष्टिने पाहिले तर उडून जाणार. त्यांना पहायचे फक्त, त्यांचे प्रतिक्रमण करायचे नसतात. प्रतिक्रमण तर, आपला तीर कोणाला लागला असेल तरच करावे लागते.
आपण इथे सत्संगला आलोत आणि येथे माणसं उभी असतील, तर मनामध्ये भाव बिघडतो, आणि वाटते की हे सर्व माणसं उभी का आहेत ? त्या चुकीसाठी त्याचे लगेच प्रतिक्रमण करायला हवे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण कर्मच्या फळांचे करायचे की सूक्ष्मचे करायचे?
दादाश्री : सूक्ष्मचे करायचे. प्रश्नकर्ता : विचारांचे की भावचे?
दादाश्री : भावचे. विचारांच्या मागे भाव असतोच. अतिक्रमण झाले तर प्रतिक्रमण करायलाच हवे. अतिक्रमण तर मनात वाईट विचार येतात. ह्या बहिणीसाठी वाईट विचार आला, तर 'विचार चांगला असायला पाहिजे', असे करून त्याला फिरवून टाकायचे. मनात असे वाटले की हा नालायक आहे, तर असा विचार का आला? आपल्याला त्याची लायकी-नालायकी, पहाण्याचा अधिकारच नाही. आणि सरसगट बोलायचे असेल तर बोलायचे की, 'सगळे चांगले आहेत' चांगले आहेत, बोललात तर तुम्हाला कर्मदोष नाही होणार, परंतु जर नालायक आहे बोलतात तर ते अतिक्रमण म्हटले जाईल. म्हणून त्याचे प्रतिक्रमण अवश्य करावे लागेल.
नापसंतला स्वच्छ मनाने सहन केले तरच वीतराग होऊ शकणार. प्रश्नकर्ता : स्वच्छ मन म्हणजे काय?
Page #94
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
दादाश्री : स्वच्छ मन म्हणजे, समोरच्याचे प्रति वाईट विचार नाही येत ते, म्हणजे काय? निमित्तला चावायला धावत नाही. कदाचित् समोरच्याचे प्रति वाईट विचार आले तर त्वरितच प्रतिक्रमण करेल आणि धुवून टाकेल.
प्रश्नकर्ता : स्वच्छ मन होऊन जाणे हे तर अंतिम पायरीची गोष्ट आहे ना? आणि जोपर्यंत संपूर्ण शुद्ध होत नाही तोपर्यंत प्रतिक्रमण करावेच लागेल ना?
दादाश्री : हो, हे खरे, पण अमुक बाबतीत शुद्ध होऊन गेले असेल आणि अमुक बाबतीत नाही झाले असेल, ह्या सगळ्या पायऱ्या आहेत. जेथे शुद्ध नाही झाले असेल तेथे प्रतिक्रमण करावे लागेल.
आपण शुद्धात्माचे वहीखाते स्वच्छ ठेवायचे. म्हणून रात्री चंदुभाईना सांगायचे की ज्यांचे ज्यांचे दोष दिसले असतील त्यांचे वहीखाते स्वच्छ करून टाका. मनाचे भाव बिघडले असतील तर प्रतिक्रमणाने सर्व शुद्धिकरण होऊन जाते. दुसरा काही उपाय नाही. इन्कमटॅक्सवाला पण दोषित नाही दिसणार, असे करून रात्री झोपून जायचे. सर्व जग निर्दोष पाहून नंतर चंदुभाईला झोपून जावा असे सांगायचे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण प्रत्यक्षात व्हायला पाहिजे ना? दादाश्री : प्रतिक्रमण मागाहून झाले तरी पण काही हरकत नाही.
प्रश्नकर्ता : मी आपली अवहेलना केली असेल, अशातना केली असेल तर मला आपल्याकडे प्रत्यक्ष येवून प्रतिक्रमण करायला पाहिजे ना?
दादाश्री : जर प्रत्यक्ष झाले तर चांगली गोष्ट आहे. नाही झाले तर मागहून करायचे, तरी पण सारखेच फळ मिळते.
आम्ही काय सांगतो, 'तुम्हाला दादांसाठी एवढे उलट विचार येतात, म्हणून तुम्ही त्याचे प्रतिक्रमण करत रहा.' कारण की त्याचा काय दोष बिचाऱ्याचा. विराधक स्वभाव आहे. आजच्या सगळ्या माणसांचा स्वभावच विराधक आहे. दुषमकाळात विराधक जीवच असतात. आराधक जीव
Page #95
--------------------------------------------------------------------------
________________
८२
प्रतिक्रमण
निघून गेले सगळे. तर हे जे राहिले आहेत, त्यामधून सुधार होऊ शकतील असे जीव बरेच आहेत, अजून यात बरीच उच्च आत्मा आहेत.
आमच्या विषयी उलट विचार आला तर प्रतिक्रमण करून टाकायचे. मन तर 'ज्ञानीपुरुषचे' पण मूळ खोदून टाकते. मन काय नाही करत? पोळलेले मन समोरच्यालाही पोळून काढते.
प्रश्नकर्ता : 'जे गेलेत ते कोणाचे काही भले नाही करीत.' (असे बोलले)तर भगवान महावीरांचा अवर्णवाद त्यांना पोहचणार ?
दादाश्री : नाही, ते स्वीकारत नाही. त्यामुळे रीटर्न विथ थेंक्स् (साभार परत) दुप्पट होऊन येते. म्हणून स्वतः स्वतःसाठी पुन्हा पुन्हा माफी मागत रहायची. आपल्याला जोपर्यंत तो शब्द आठवत नाही, तोपर्यंत माफी पुन्हा पुन्हा मागत रहायची. महावीरचा अवर्णवाद बोलला असाल तर, माफी पुन्हा पुन्हा मागत रहायची. तर लवकर पुसले जाईल बस. सोडलेला तीर पोहचणार नक्की, परंतु ते स्वीकार नाही करत.
२४. आजीवन प्रवाहामध्ये वाहणाऱ्यांना तारे ज्ञान... प्रश्नकर्ता : आठवण करून पूर्वीचे दोष पाहू शकतो?
दादाश्री : पूर्वीचे दोष खरोखर तर उपयोगानेच दिसणार, आठवण केल्याने नाही दिसणार. आठवण करण्यासाठी तर डोके खाजवावे लागेल. आवरण आले म्हणून आठवण करावी लागते ना? कोणा बरोबर काही भानगड झाली असेल तर त्याचे प्रतिक्रमण करतानां तो हजेर होऊनच जाणार. तो उपयोगच ठेवायचा, आमच्या मार्गामध्ये आठवण करण्याचे काहीच नाही. आठवण करणे हे तर 'मेमरी' (स्मृति) चे आधीन आहे. जे आठवण येत असते ते प्रतिक्रमण करण्यासाठी येत असते, स्वच्छ करण्यासाठी.
या जगातली कोणतीही विनाशी वस्तु मला नाही पाहिजे' असे तुम्ही नक्की केले आहे ना? तरीसुद्धा का आठवण येत असते ? म्हणून प्रतिक्रमण करा. प्रतिक्रमण केल्यानंतर पुन्हा आठवण येते तेव्हा आपण समजून जायचे की अजून ही फिर्याद आहे! म्हणून पुन्हा हे प्रतिक्रमणच करायचे.
Page #96
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
८३
आठवण येणे हे राग-द्वेषाच्या कारणामुळे आहे. जर आठवण येत नसेल तर पडलेला गुंता विसरून जातो. तुम्हाला कोणी फोरेनर्सची आठवण येत नाही आणि मेलेल्याची आठवण का येते? हा हिशोब आहे आणि तो राग-द्वेषच्या कारणामुळे आहे, त्याचे प्रतिक्रमण केल्यामुळे जखम मिटून जाते. इच्छा होत असतात ते प्रत्याख्यान नाही झाले त्यामुळे. स्मृतिमध्ये येत आहे ते प्रतिक्रमण नाही केले त्यामुळे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण मालकीभावचे असते ना?
दादाश्री : मालकीभावचे प्रत्याख्यान असते. आणि दोषांचे प्रतिक्रमण
असते.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्यावर सुद्धा वारंवार हा गुन्हा आठवत असेल तर त्याचा अर्थ असा ही, त्यातून अजून मुक्त नाही झालोत ?
दादाश्री : ह्या कांदाचे एक पड निघून गेले तर दुसरे पड मागाहून येवून उभे रहाते, असे बरेच आवरणवाले आहेत हे गुन्हे. म्हणजे एक प्रतिक्रमण केल्यावर एक आवरण जाते, असे करता करता, शंभर प्रतिक्रमण केले तर हे समाप्त होईल. काही दोषांचे पाच प्रतिक्रमण केले तेव्हा समाप्त होतात, काहीचे दहा आणि काहीचे शंभर होणार. त्याचे जेवढे आवरण असतील तेवढे प्रतिक्रमण होणार. लांब चालणार तेवढा लांब गुन्हा असणार.
प्रश्नकर्ता : आठवण येते त्याचे प्रतिक्रमण करायचे आणि इच्छा झाली त्याचे प्रत्याख्यान करायचे, हे जरा समजवा.
दादाश्री : आठवण येत आहे म्हणजे समजायचे की ह्या इथे जास्त चिकट आहे तर तेथे सतत प्रतिक्रमण करत राहिले तर सर्व सुटून
जाणार.
प्रश्नकर्ता : जितक्यावेळा आठवण येईल तितक्या वेळा करायचे?
दादाश्री : हो, तितक्यावेळा करायचे. आपण करायचा भाव ठेवायचा. असे आहे की आठवण येण्यासाठी वेळ तर पाहिजे ना ! तर त्याला वेळ मिळणार. रात्री काही आठवण येत नसणार ?
Page #97
--------------------------------------------------------------------------
________________
८४
प्रश्नकर्ता : ते तर काही संयोग होतात तेव्हा.
दादाश्री : हो, संयोगामुळे.
प्रश्नकर्ता : आणि इच्छा असतील तर?
प्रतिक्रमण
दादाश्री : इच्छा होणे म्हणजे स्थूळवृत्ति होणे. पूर्वी आपण जो भाव केलेला असेल तो भाव पुन्हा उभा झाला आहे आता, तर तेथे प्रत्याख्यान करायचे.
प्रश्नकर्ता : त्यावेळी 'दादाजीं'नी सांगितले आहे की, ही वस्तु आता नको व्हायला पाहिजे. असे प्रत्येक वेळेला म्हणायचे.
दादाश्री : ही वस्तु माझी नाही आहे, ती ओसरवित (सर्मपित करत) आहे. अज्ञानतामध्ये ह्या सर्वांना बोलविल्या होत्या. पण आज त्या माझ्या नाही आहेत. म्हणून ओसरवित आहे. मन-वचन-कायाने ओसरवित आहे. आता मला काही ही नको. हे सुख मी अज्ञानतामध्ये बोलविले होते, पण आज हे सुख माझे नाही आहे. म्हणून ओसरवित आहे.
ह्या अक्रमविज्ञानचा हेतूच सगळा शूट ऑन साईट प्रतिक्रमणचा आहे. त्याच्या बेसमेन्ट (पाया) वरच उभा राहिला आहे. चुक कोणाची होतच नाही. आपल्या निमित्ते समोरच्याचे जे काही नुकसान झाले, तर द्रव्यकर्मभावकर्म-नोकर्मपासून मुक्त असा त्याच्या शुद्धात्माला आठवून प्रतिक्रमण करायचे.
प्रश्नकर्ता : परंतु प्रत्येक वेळेला एवढे पूर्ण लांब बोलायचे?
दादाश्री : नाही, तसे काही नाही. शार्टमध्ये ( संक्षिप्तमध्ये) आटोपून घ्यायचे. समोरच्याचा शुद्धात्माला हजर करून (आठवून) त्याला फोन करायचा की, 'ही चुक झाली माफ करा'.
आणि दुसरे आपल्या घरातील माणसांचे पण रोज प्रतिक्रमण करायला हवे. तुमचे आई-वडील, भाऊ, बहिणी सर्वांचे, रोजच प्रतिक्रमण करायला हवे. कुटुंबातील सर्वांचे, कारण की, त्यांच्या बरोबर चिकट फाईल असणार.
Page #98
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
म्हणून प्रतिक्रमण करणार ना, एक तास जर कुटुंबियांसाठी प्रतिक्रमण करणार, आपल्या कुटुंबातील सर्वांना आठवण करून, सर्व जवळचे धरून, दूर-दूरची सर्व, त्यांचे भाऊ, बायका, त्यांचे काका, काकांची मुलं-मुली, आणि ते सर्वजण, एक फॅमिली (कुटुंब) असेल ना, तर दोन-तीन-चार पिढीपर्यंत, त्या सगळ्यांना आठवून प्रत्येकाचे एक तास प्रतिक्रमण झाले ना, तर आपल्यामधील भयंकर पाप भस्मीभूत होऊन जाणार. आणि आपल्या प्रति त्या लोकांचे मन स्वच्छ होऊन जाणार. म्हणून आपल्या जवळच्यांचे, सगळ्यांचे आठवण करून-करून प्रतिक्रमण करायचे. आणि रात्री झोप लागत नसेल तर त्यावेळी हे ठरवून केले की चालू रहाते. अशी व्यवस्था नाही करीत? अशी ही व्यवस्था, ही फिल्म चालू झाली तर त्यावेळी खूप आनंद होतो. तो आनंद मावत नाही!
कारण की जेव्हा प्रतिक्रमण करतो ना, त्यावेळी आत्माचा संपूर्ण शुद्ध उपयोग असतो. म्हणजे मध्ये कोणाची दखल नसते.
प्रतिक्रमण कोण करतो? चंदुभाई करतो, कोणासाठी करतो ? तेव्हा म्हणे, ह्या कुटुंबियांना आठवून आठवून करतो. आत्मा पाहणारा, तो पाहतच असतो, दुसरी काही दखल च नाही, म्हणून खूप शुद्ध उपयोग राहणार.
हे प्रतिक्रमण एकवेळा करून घेतले होते, माझ्या हजेरीत मी स्वतः करून घेतले होते, खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे आणि ते विषयविकार संबंधीचे प्रतिक्रमण करून घेतले होते. तेव्हा ते करता करता सगळे इतक्या खोलात उतरत, उतरत, उतरले, की ते मग घरी गेल्यावर सुद्धा थांबत नव्हते. झोपेच्या वेळी पण बंध नाही व्हायचे. जेवण करतेवेळी पण बंद नाही व्हायचे. नंतर मग आम्हालाच ते बंद करावे लागले. स्टॉप करावे लागले !! सगळ्यांना जेवतांना पण बंद नाही व्हायचे झोपतांना पण बंद नाही व्हायचे, फसले होते सगळे नाही?! प्रतिक्रमण आपणहून निरंतर दिवस-रात्र चालतच रहायचे. आता प्रतिक्रमण केल्यानंतर 'बंद करा आता दोन तास होऊन गेले' असे सांगण्यात आले, तरीसुद्धा प्रतिक्रमण त्याचे त्याचे चालूच राहते. बंद करायचे सांगितले तरीसुद्धा बंद नाही होत. मशिनरी सगळी चालू होऊन गेली म्हणून, आतमध्ये चालूच राहते.
Page #99
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
चंदुभाईला 'तुम्हाला' एवढेच सांगावे लागते की प्रतिक्रमण करत रहा. तुमच्या घरातील सर्व माणसांबरोबर, तुम्हाला पूर्वी काही ना काही दुःख झाले असेल, त्याचे तुम्हाला प्रतिक्रमण करायचे आहे. संख्यात की असंख्यात जन्मात जे राग-द्वेष, विषय-विकार, कषाय मुळे दोष केले असतील त्याची क्षमा मागत आहे. असे दररोज घरातील प्रत्येक व्यक्तिचे, एकेकाला घेऊन घेऊन करायचे. मग आजूबाजूचे, शेजारी पाजारींचे सगळ्यांना घेवून उपयोगपूर्वक हे करीत राहायला पाहिजे. तुम्ही केल्यानंतर हे ओझे हलके होऊन जाणार. असेच काही हलके होणार नाही. आम्ही सर्व संसार बरोबर असे निवारण केले. प्रथम असे निवारण केले, तेव्हा तर सुटका झाली. जोपर्यंत आमचा दोष तुमच्या मनात आहे, तोपर्यंत आम्हाला चैन पडू देणार नाही ! म्हणून आम्ही जेव्हा असे प्रतिक्रमण करतो तेव्हा त्या तिथे पुसले जाते.
८६
प्रतिक्रमण तर तुम्ही खूपच करत जा. तुमच्या सर्कल मध्ये पन्नासशंभर जेवढी पण माणसे असतील, ज्यांना ज्यांना तुम्ही रगड रगड केले असेल त्या सगळ्यांचे सवड मिळाल्यास तास-तास बसून, एका-एकाला शोधून शोधून प्रतिक्रमण करायचे. जेवढ्यांना रगड रगड केले आहे ते तर धुवावे लागेल ना? नंतर मग ज्ञान प्रगट होणार.
नंतर हा जन्म, मागचे जन्म, मागचे संख्यात जन्म, मागचे असंख्यात जन्मांत, मागचे अनंत जन्मांत दादा भगवानच्या साक्षीत दिगंबरधर्माचे साधु, आचार्यची जे जे अशातना, विराधना केली अथवा करून घेतली असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो आहे. दादा भगवानच्या साक्षीत क्षमा मागत आहे. किंचित्मात्र अपराध नाही होणार अशी मला शक्ति द्यावी. असे सगळ्या धर्मांचे करायचे.
अरे, त्यावेळी अज्ञानदशेत आमचा अहंकार भारी. 'अमुक असे आहे, तसे आहे', तिरस्कार, तिरस्कार, तिरस्कार, तिरस्कार... आणि कोणाची प्रशंसा ही करायचा. एकाची एकीकडे प्रशंसा करायचा आणि दुसऱ्याचा तिरस्कार करायचा. नंतर मग १९५८ मध्ये ज्ञान झाले तेव्हापासून, ‘ए. एम. पटेलला' सांगितले की, 'हे जे तिरस्कार केलेत, ते धुवून टाका सर्व आता, साबण लावून.' माणसांना शोधून शोधून सर्व धुवून काढले. ह्या बाजूचे
Page #100
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
शेजारी, त्या बाजूचे शेजारी, ह्या बाजूचे कुटुंबातील मामा, काका, तिरस्कार झाले होते! ते सर्वांचे धुवून टाकले.
८७
सर्वांजवळ
प्रश्नकर्ता : म्हणजे मनात च प्रतिक्रमण केले? प्रत्यक्ष जाऊन नाही ?
दादाश्री : मी अंबालाल पटेला बोललो की, हे तू उलट केले आहे, हे सर्व मला दिसत आहे. आता तरी सर्व उलट केलेले धुवून टाका ! यावर त्याने काय करणे सुरू केले? कशाप्रकारे धुवायचे ? तेव्हा मी त्याला समजावले की त्याला आठवायचे. चंदुभाईने नगीनदासला शिव्या दिल्यात आणि सर्व आयुष्य फटकारले आहे, तिरस्कार केला आहे, ते सर्व वर्णन करायचे आणि ‘हे नगीनदासभाईचे, मन-वचन-कायाचा योग, द्रव्यकर्म, भावकर्म, नोकर्महून भिन्न प्रगट शुद्धात्मा भगवान ! नगीनदासभाई मध्ये बसलेला शुद्धात्मा भगवान ! ह्या नगीनदासभाईची पुन्हा पुन्हा माफी मागत आहे, दादा भगवानच्या साक्षीत माफी मागत आहे. पुन्हा असे दोष नाही करणार.' अर्थात् तुम्ही सुद्धा असे करा, मग तुम्ही समोरच्याच्या चेहऱ्यावरील परिवर्तन पाहून घ्या. त्याचा चेहरा बदललेला दिसेल. येथे तुम्ही प्रतिक्रमण कराल आणि तेथे परिवर्तन होईल.
आम्ही किती धुतले तेव्हा वहीखाते चुकते झाले. आम्ही कितीतरी काळापासून धूत आहोत तेव्हा वहीखाते चुकते झाले. तुम्हाला तर मी मार्ग दाखवला. म्हणून लवकर सुटून जाणार. आम्ही तर कितीतरी काळापासून स्वतः धूत आलो आहोत.
आपण प्रतिक्रमण करून टाकायचे. म्हणजे आपण जबाबदारीतून सुटलो. मला शुरू शुरू मध्ये लोक 'एटॅक' (विरोध) करत होते ना ! परंतु नंतर, सर्व थकून गेलेत. आपला जर समोरच्यावर हल्ला झाला तर समोरचा नाही थकणार. हे जग कोणालाही मोक्षाला जाऊ देईल तसे नाही. असे सर्व बुद्धिवंताचे जग आहे. यामधून सावधपणे चाललात, समेट ने चाललात तर मोक्षे जाणार.
हे प्रतिक्रमण तर करून पहा, मग तुमच्या घरातील माणसांत सर्वांमध्ये चेन्ज (परिवर्तन) होऊन जाईल. जादूई चेन्ज होऊन जाईल. जादूई परिणाम !
Page #101
--------------------------------------------------------------------------
________________
८८
प्रतिक्रमण
जोपर्यंत समोरच्याचा दोष स्वत:च्या मनात आहे तोपर्यंत चैन पडणार नाही. हे प्रतिक्रमण केले तर ते मिटून जाईल. राग-द्वेषवाली प्रत्येक चिकट 'फाईल'चा उपयोग ठेवून प्रतिक्रमण करून, स्वच्छ करायची. रागची फाईल असेल, तिचे तर खास प्रतिक्रमण करायला पाहिजे.
आपण गादीवर झोपले असाल तेव्हा जेथे जेथे खडे टोचणार तेथून काढून टाकणार की नाही काढणार? हे प्रतिक्रमण जेथे जेथे टोचत असेल तेथेच करायचे आहे. तुम्हाला जेथे टोचत आहे तेथून तुम्ही काढून टाका
आणि त्याला टोचत आहे तेथून तो काढून टाकणार! प्रतिक्रमण प्रत्येक माणसाचे वेगळे वेगळे असतात!
कोणाच्याहीसाठी अतिक्रमण झाले असेल तर, संपूर्ण दिवस त्याच्या नांवाचे प्रतिक्रमण करावे लागेल, तरच स्वतः सुटेल. जर दोघांनी समोरासमोर प्रतिक्रमण केले तर लवकर सुटका होईल. पाच हजार वेळा तुम्ही प्रतिक्रमण केले आणि पाच हजार वेळा समोरच्याने प्रतिक्रमण केले तर लवकर सुटका होईल. परंतु जर समोरच्याने प्रतिक्रमण नाही केले आणि तुम्हाला सुटायचेच असेल तर तुम्ही दहा हजार वेळा प्रतिक्रमण करायला
हवे.
प्रश्नकर्ता : जेव्हा असे काही राहून जात असते तेव्हा मनामध्ये खटकत असते की हे राहून गेले.
दादाश्री : असा क्लेश नाही ठेवायचा मग. नंतर एक दिवस बसून सगळ्यांचे एकत्र प्रतिक्रमण करावे, ज्याचे ज्याचे असेल, ओळखीवाल्यांचे, ज्यांच्या बरोबर जास्त अतिक्रमण होत असेल, त्याचे नांव घेऊन एक तास प्रतिक्रमण करून टाकले तर पूर्वीचे सगळे उडून जाईल. परंतु आपण तसे ओझे नाही ठेवायचे.
ही अपूर्व बात आहे, पूर्वी ऐकले नसेल, वाचले नसेल, जाणले नसेल, ती बात जाणण्यासाठी ही महेनत आहे.
आम्ही येथे प्रतिक्रमण करण्यासाठी बसवितो तेव्हा काय होत असते? दोन तास प्रतिक्रमण करवित असतो ना, की लहानपणापासून ते आतापर्यंत जे जे दोष झाले असतील, ते सर्व आठवून आठवून प्रतिक्रमण करायचे,
Page #102
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
समोरच्याच्या शुद्धात्माला पाहून असे म्हणायचे. आता लहानपणी जेव्हा समजशक्तिची सुरूवात झाली, तेव्हापासून चे प्रतिक्रमण करायला घेतले, तर आतापर्यंतचे प्रतिक्रमण करतो. असे प्रतिक्रमण करतांना त्याचे सर्व दोषांचे मोठे मोठे भाग येवून जातात. मग पुन्हा दुसऱ्यांदा प्रतिक्रमण करतो, त्यावेळी पुन्हा लहानसहान दोष पण येवून जातात. मग पुन्हा प्रतिक्रमण करतो, त्यावेळी पुन्हा त्याच्यापेक्षा लहान दोष येवून जातात, असे त्या दोषांचे सर्व, पूर्ण भागच संपवून टाकते.
८९
दोन तासाच्या प्रतिक्रमण मध्ये सर्व जीवनातील पूर्वीचे चिकटलेल्या दोषांना धुवून टाकायचे आणि पुन्हा कधीही अशाप्रकारचे दोष नाही करणार असे नक्की करायचे म्हणजे च प्रत्याख्यान झाले.
हे तुम्ही प्रतिक्रमण करायला बसतात ना, तेव्हा अमृताचे थेंब पडतात एकीकडे, आणि हलके झाल्यासारखे वाटायला लागते. भाऊ तुला होते का प्रतिक्रमण? तेव्हा हलके झाल्यासारखे वाटते? तुमचे प्रतिक्रमण चालू होऊन गेले आहेत खूप? जोरदार चालू आहे ? सगळे शोध, शोध शोधून प्रतिक्रमण करून टाकायचे. तपास करायला लागलात तर बरेच काही आठवायला ही लागेल, मार्ग सुद्धा दिसेल. आठ वर्षापुर्वी कोणाला लाथ मारली असेल ते पण दिसेल. तो रस्ता पण दिसेल, लाथा पण दिसतील. हे सर्व आठवले कसे? असे आठवायला लागतो तर काहीच आठवणार नाही आणि प्रतिक्रमण करायला लागले तर लगेच एका नंतर एक क्रमवार आठवायला लागेल. तुम्ही एखाद्या वेळी पूर्ण जीवनाचे केले होते ?
प्रश्नकर्ता : केले होते.
दादाश्री : अजून मूळ चुक समजेल, तेव्हा खूपच आनंद होईल. प्रतिक्रमण केल्या वर आनंद झाला नसेल तर तुम्हाला प्रतिक्रमण करायला जमले नाही. अतिक्रमणाने जर दुःख नाही झाले तर तो माणूस, माणूस नाही.
प्रश्नकर्ता : मूळ चुक कोणती दादाजी ?
दादाश्री : पूर्वी तर चुकच दिसत नव्हती ना ? आता दिसत आहे ते स्थूळ दिसत आहे. अजून तर पूढे दिसणार.
Page #103
--------------------------------------------------------------------------
________________
९०
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : सूक्ष्म, सूक्ष्मतर... दादाश्री : चूका दिसत जातील.
जेव्हा तुम्ही पूर्ण जीवनाचे प्रतिक्रमण करतात, तेव्हा तुम्ही नाही मोक्षमध्ये की नाही संसारात. तसे तर तुम्ही प्रतिक्रमणच्या वेळी पुर्वीचे सगळे विवरण करतात. मन-बुद्धि- चित्त आणि अहंकार सगळ्यांचे फोन-बीन बंद होतात. अंत:करण बंद होते. त्यावेळी मात्र प्रज्ञा शक्ति एकटीच काम करत असते. आत्मा पण त्यात काहीच करत नाही. हा दोष झाल्यावर झाकला जातो. मग दुसरा लेयर (पड) येणार. असे लेयर वर लेयर येत असतात. नंतर मृत्यु समयी शेवटच्या एका तासामध्ये या सगळ्यांचा ताळेबंद (हिशोब) येणार.
भूतकाळातील सगळे दोष वर्तमानमध्ये दिसतात ते ज्ञानप्रकाश आहे ती मेमरी (स्मृति) नाही.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमणामुळे आत्मावर इफेक्ट होतो खरा?
दादाश्री : आत्मावर तर काहीही इफेक्ट होत नाही. इफेक्ट झाला तर संज्ञी म्हणावे. हा तर आत्मा आहे, हे हंड्रेड परसेंट डिसाइडेड (शंभर टक्के निश्चित) आहे. जेथे मेमरी नाही पोहचत, तेथे आत्माच्या प्रभावाने होत असते. आत्मा अनंत शक्तिवान आहे ते त्याची प्रज्ञाशक्ति पाताळ फोडून दाखवित असते. ह्या प्रतिक्रमणमुळे तर स्वतःला हलके झाल्याची अनुभूति होते, की आता हलके होऊन गेलो आणि वैर सुटून जाते, नियमानेच सुटून जातात. आणि हे प्रतिक्रमण करण्यासाठी समोरची व्यक्ति प्रत्यक्ष भेटली नाही तरी काही हरकत नाही. ह्यात प्रत्यक्षांच्या सह्यांची गरज नाही. जसे कोर्टात प्रत्यक्षांच्या सह्यांची जरूरी आहे तसे येथे नाही. कारण की हे गुन्हे प्रत्यक्ष (हजेरीत) झालेले नाहीत, हे गुन्हे तर लोकांच्या गैरहजेरीत झाले आहेत. तसा लोकांच्या हजेरीत च झालेले आहे, परंतु हजेरीत सह्या केलेल्या नाहीत, सह्या तर आतल्या राग-द्वेष यांच्या आहेत. ( आतून भाव बिघडल्या मुळे गुन्हे झालेले आहेत.)
एखाद्या दिवशी एकांतात बसले असाल आणि, तेव्हा असे प्रतिक्रमण किंवा असे काही करता, करता, करता आतमध्ये थोडा आत्मानुभव होऊन जातो. त्याचा स्वाद येऊन जातो, त्यालाच अनुभव म्हणतात.
Page #104
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
९१
जेव्हा घरातील माणसे निर्दोष दिसतील तेव्हा समजायचे की तुमचे प्रतिक्रमण खरे आहे. खरोखर निर्दोषच आहे, पूर्ण जग निर्दोषच आहे. तुम्ही तुमच्या दोषांमुळेच बांधलेले आहात, नाही की त्यांच्या दोषांमुळे, तुम्ही स्वत:च्या दोषांमुळेच बांधलेले आहात. आता असे जेव्हा समजणार तेव्हा कुठे काही उलगडा होईल !
प्रश्नकर्ता : निश्चयमध्ये तर खात्री आहे की जग सर्व निर्दोष आहे.
दादाश्री : हे तर प्रतीतित आले म्हणतात. अनुभवात किती आले ? ही गोष्ट एवढी सोपी नाही. हे तर ढेकून घेरतात, डांस घेरतात, साप घेरतात, तेव्हा निर्दोष दिसत असतील तर खरे, परंतु आपल्या प्रतीतिमध्ये राहायला हवे की निर्दोष आहे. आपल्याला दोषित दिसत आहे, तर ती आपली चुक आहे. प्रतिक्रमण करायला हवे. आमच्या प्रतीतिमध्ये पण निर्दोष आहे आणि आमच्या वर्तनमध्ये पण निर्दोष आहे. तुम्हाला तर अजून प्रतीतिमध्ये पण निर्दोष आले नाही, अजून तुम्हाला दोषित वाटत आहे. कोणी काही केले, तर त्याचे नंतर प्रतिक्रमण करतात, म्हणून सुरूवातीला तर दोषित वाटत असते.
होणार.
प्रश्नकर्ता : शुद्ध उपयोग असेल तर अतिक्रमण होणार?
दादाश्री : होणार. अतिक्रमण पण होणार आणि प्रतिक्रमण ही
आपल्याला असे वाटणार की हे तर आपण उपयोग चुकून उलट मार्गावर जात आहे. तेव्हा उपयोग चुकल्याचे प्रतिक्रमण करावे लागणार. उलट मार्ग म्हणजे वेस्ट ऑफ टाईम ऍन्ड वेस्ट ऑफ एनर्जि (वेळ आणि शक्तिचा अपव्यय करणे ), त्याचे प्रतिक्रमण नाही केले तरी चालेल. त्यामुळे एवढे मोठे नुकसान नाही. एक अवतार अजून बाकी आहे म्हणून लेट गो केले आहे, परंतु ज्यांना उपयोगमध्ये जास्त राहायचे असेल त्यांनी उपयोग चुकल्याचे प्रतिक्रमण करायला पाहिजे. प्रतिक्रमण म्हणजे परत फिरणे. कधीही परत फिरलाच नाही ना !
कुठल्याही ठिकाणी आम्ही विधि करीत नसतो. आम्ही
Page #105
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
औरंगाबादला अनंत अवतारचे दोष धुतले जातील अशी विधि करत असतो. एक तासाच्या प्रतिक्रमण विधि मध्ये तर सगळ्यांचा अहंकार भस्मीभूत होऊन जात असतो! आम्ही औरंगाबाद येथे तर बारा महिन्यामध्ये एक वेळा प्रतिक्रमण करवित होतो. तेव्हा दोनशे-तीनशे माणसे रडत रहायची आणि सगळे रोग निघून जायचे. कारण की तेथे स्त्रीयांना त्यांचे पति पाया पडायचे, माफी मागायचे, किती तरी अवतारचे बंधन झालेल्यांचे ते माफी मागायचे, तेव्हा कितीतरी स्वच्छ होऊन जायचे.
तेथे दरवर्षी, त्यासाठी आम्हाला खूप मोठी विधि करावी लागायची, सगळ्यांचे मन स्वच्छ करण्यासाठी, आत्मा (व्यवहार आत्मा)ची शुद्धि करण्यासाठी, मोठी विधि करून दयायचो. त्यावेळी सगळे शुद्ध होऊन जायचे. कम्प्लीट क्लियर, स्वतःच्या ध्यानात पण नाही राहायचे की मी काय लिहीत आहे, परंतु सगळे स्पष्ट लिहून आणायचे. नंतर 'क्लियर' होऊन गेले. अभेदभाव उत्पन्न झाला ना, एक मिनिट मला सोपून दिले ना की मी असा आहे साहेब, तो अभेदभाव होऊन गेला. एवढी त्याची शक्ति वाढली.
___ आणि नंतर मी तुझ्या दोषांना जाणून त्यादोषांवर विधि करत राहील. हा कलियुग आहे, कलियुगमध्ये कोणते दोष नाही होणार ? कोणाचे दोष काढणे हेच चुकीचे आहे. कलियुगमध्ये दुसऱ्याची चुक काढणे हीच स्वतःची चुक आहे. कोणाची चुक काढायची नाही. गुण काय आहे? हे पाहणे जरूरी आहे. त्याच्या जवळ काय राहिले आहे? शिल्लक काय राहिली आहे हे पाहणे जरूर आहे. ह्या काळात शिल्लकच नाही रहात ना ! शिल्लक राहिली आहे तेच महात्मा उंचावर आहे ना! ।
जे आपल्या जवळ आहे, पूर्वी पण होते आणि आज ही आहे, ते आपले धर्मबंधु म्हणावे आणि स्वत:चा धर्मबंधु बरोबरच जन्म-जन्मांतरांचे वैर बांधलेले असतात. त्यांच्या बरोबर काही वैर बांधलेले असेल तर त्यासाठी आपण समोरासमोर प्रतिक्रमण करून घेतले तर हिशोब चुकता होऊन जातो. एकही माणसाचा समोरासमोर प्रतिक्रमण करायला चुकायचे नाही. सहाध्यायी बरोबरच जास्त वैर बांधले जाते आणि त्याचे प्रत्यक्ष
Page #106
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
प्रतिक्रमण केले तर धुतले जाईल. ह्या औरंगाबादमध्ये प्रतिक्रमण करवितो असे प्रतिक्रमण तर वर्ल्डमध्ये कुठेही होत नाहीत.
प्रश्नकर्ता : तेथे सगळे रडत होते ना! मोठे मोठे शेठ सुद्धा रडत होते.
दादाश्री : होय. हे औरंगाबादचेच पहा ना! सगळे किती रडत होते ! आता असे प्रतिक्रमण पूर्ण जीवनात एक वेळा केले तर खूप होऊन
गेले.
प्रश्नकर्ता : मोठ्या लोकांना रडण्यासाठी जागा कुठे आहे? अशी ही एखादीच असेल.
दादाश्री : होय. बरोबर. तेथे तर खूपच रडत होते सगळे.
प्रश्नकर्ता : मी तर पहिल्यांदाच पाहिले की, अशी सगळी माणसे ज्यांना समाजमध्ये प्रतिष्ठित म्हटले जाते, अशी माणसे उघड तोंडाने रडत होते तेथे !!!
दादाश्री : उघड तोंडाने रडत होते आणि स्वतःच्या पत्निचे पायावर नतमस्तक होऊन नमस्कार करायचे. औरंगाबादला तुम्ही आला असाल ना, तेथे असे पाहिले नाही?
प्रश्नकर्ता : होय. तसे दृश्य अन्य कोणत्याही ठिकाणी पाहिले
नाही!
दादाश्री : असणारच नाही ना! आणि असे अक्रम विज्ञान नसणार, असे प्रतिक्रमण नसणार, असे काहीच नसणार.
प्रश्नकर्ता : असे 'दादाजी' सुद्धा नसणार! दादाश्री : होय, असे 'दादा' सुद्धा नसणार.
माणसाने खरी आलोचना नाही केली. तेच मोक्षे जाण्यास अडथळा आहे. गुन्हाची हरकत नाही. खरी आलोचना झाली तर काही हरकत नाही. आणि आलोचना गजबच्यापुरूषा जवळ करायला पाहिजे. स्वत:च्या दोषांची आलोचना जीवनमध्ये कोणत्या ठिकाणी केली आहे? कोणा जवळ
Page #107
--------------------------------------------------------------------------
________________
९४
प्रतिक्रमण
आलोचना करणार? आणि आलोचना केल्याशिवाय सुटका नाही. जोपर्यंत आलोचना नाही करत तर मग त्याला कोण माफ करविणार? ज्ञानी पुरुष पाहिजे ते करून शकतात. कारण की ते कर्ता नसतात म्हणून. जर कर्ता असतील तर त्यांना पण कर्मबंधन होणार. परंतु ते कर्ता नसतात म्हणून पाहिजे ते करू शकतात.
तेथे आम्हाला आलोचना गुरू जवळ करायला हवी. परंतु अंतिम गुरू हे 'दादा भगवान' म्हटले जातात. आम्ही तर तुम्हाला मार्ग दाखवून दिला. अंतिम गूरू दाखवून दिले. ते तुम्हाला उत्तर देत राहतील आणि म्हणूनच ते 'दादा भगवान' आहेत. जोपर्यंत ते प्रत्यक्ष नाही होत, तोपर्यंत ह्या 'दादा भगवानांना' भजावे लागेल. हे प्रत्यक्ष झाल्यानंतर आपोआप, येता-येता मग मशीन चालू होणार. अर्थात् नंतर ते स्वतः 'दादा भववान' होणार.
ज्ञानी पुरुष जवळ झाकून ठेवले म्हणजे संपले. लोक उघडे करण्यासाठी तर प्रतिक्रमण करतात. तो भाऊ सगळे घेवून आला होता ना? तो उलट उघडे करतो ज्ञानी जवळ! तर तेथे कोणी झाकले तर काय होईल ? दोष झाकल्यावर दुप्पट होणार.
पत्नि बरोबर जेवढी ओळख आहे तेवढीच ओळख प्रतिक्रमण बरोबर व्हायला पाहिजे. जसे स्त्रीला विसरत नाही तसे प्रतिक्रमण विसरायला नाही पाहिजे. सर्व दिवसभर माफी माग-माग करायचे. माफी मागण्याची सवयच होउन जायला पाहिजे. ही तर दुसऱ्यांचे दोष पाहण्याची दृष्टिच होऊन गेली आहे.
ज्यांच्या बरोबर विशेष अतिक्रमण झाले असेल त्यांच्या बरोबर प्रतिक्रमणचा यज्ञ सुरू करून द्यायचा. अतिक्रमण भरपूर केले आहेत. प्रतिक्रमण नाही केलेत त्याचे हे सगळे आहे.
हे प्रतिक्रमण तर आमची सूक्ष्मातिसूक्ष्म शोध आहे. जर ह्या शोधला समजलात तर कोणाबरोबर कसलाही झगडा राहणार नाही.
प्रश्नकर्ता : दोषांची लिस्ट (यादी) तर खूप लांब होत असते.
Page #108
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
९५
दादाश्री : ती लांब असली तर, असे मानायचे की ह्या एका माणसा बरोबर शंभर प्रकारचे दोष होऊन गेले असतील तर सगळ्यांचे एकत्र प्रतिक्रमण करून टाकायचे की ह्या सगळ्या दोषांची मी आपल्या जवळ क्षमा मागत आहे!
प्रश्नकर्ता : आता ह्या जीवनाचे नाटक लवकर पुरे झाले तर चांगले. दादाश्री : असे का बोलता?
प्रश्नकर्ता : येथे तुम्ही वीस दिवस होते, परंतु एका ठिकाणीही मी नाही येऊ शकलो.
दादाश्री : म्हणून काय देह पूर्ण करून द्यायला पाहिजे?
ह्या देहाने 'दादा भगवानांना' ओळखले. ह्या देहाचे तर एवढे काही उपकार आहेत की, कोणताही औषधोपचार करावा लागला तरी करायचा. ह्या देहाने तर 'दादाची' ओळख झाली. अनंत देह गमवले, सर्व व्यर्थ गेलेत. ह्या देही ज्ञानींना ओळखले म्हणून हा देह मित्र समान होऊन गेला. आणि हा सेकन्ड (दुसरा) मित्र समजलात ना? तर आता ह्या देहाचे काळजीने जतन करायचे. म्हणून आज ह्याचे प्रतिक्रमण करायचे. 'देह लवकर समाप्त होवो' असे म्हटले त्याची माफी मागत आहे.
२५. प्रतिक्रमणांची सिद्धांतिक समज प्रश्नकर्ता : तन्मयाकार झालो म्हणजे जागृतिपूर्वक पुरेपूर निकाल नाही होत. आता तन्मयाकार होऊन गेल्यानंतर ध्यानात येते, तर मग त्याचा प्रतिक्रमण करून निकाल करण्याचा काही मार्ग आहे का?
दादाश्री : प्रतिक्रमण केले तर हलके होऊन जाते. नंतर पुन्हा येणार ते हल्के होऊन येणार. पण जर प्रतिक्रमण नाही केले तर तेच ओझे पुन्हा येते. नंतर परत सटकून जाते, चार्ज झाल्याबिगरचे अर्थात् प्रतिक्रमणमुळे हलके करून करून मग निराकरण होतो.
प्रश्नकर्ता : आपण म्हणता की अतिक्रमण न्युट्रलच आहे. तर मग प्रतिक्रमण करायचेच कुठे राहिले?
Page #109
--------------------------------------------------------------------------
________________
९६
प्रतिक्रमण
दादाश्री : अतिक्रमण न्युट्रलच आहे. परंतु त्याच्यामध्ये तन्मयाकार होत असतात म्हणून बीज पडते. जर अतिक्रमणामध्ये तन्मयाकार नाही झालात तर बीज पडणार नाही. अतिक्रमण काहीच करून शकत नाही. आणि प्रतिक्रमण तर आपण तन्मयाकार नाही होत तरी पण करतो. चंदुभाई तन्मयाकार होऊन गेले, ते ही तुम्ही जाणायचे आणि तन्मयाकार नाही झाले ते ही तुम्हीच जाणायचे. तुम्ही तन्मयाकार होतच नाही. तन्मयाकार मनबुद्धि-चित्त-अहंकार होत असते. त्याला तुम्ही जाणतात.
प्रश्नकर्ता : तन्मयाकार चंदुभाई झाले तर चंदुभाईला प्रतिक्रमण करण्याचे सांगावे लागेल ना?
दादाश्री : होय. चंदुभाईला प्रतिक्रमण करण्याचे सांगायचे. प्रश्नकर्ता : स्वप्नामध्ये प्रतिक्रमण होऊ शकते?
दादाश्री : होय. खूप चांगले होऊ शकते. स्वप्नामध्ये प्रतिक्रमण होते, हे आता जे होते ना त्यापेक्षा चांगले होतात. आतातर आपण कसे बसे करून टाकतो. स्वप्नामध्ये जे काही होते ना ते सगळे अगदी पुर्ण पद्धतशीर होत असते. स्वप्नामध्ये 'दादा' दिसतात ते असे 'दादा' तर आपण पाहिलेच नसणार असे 'दादा' दिसतात. जागृतिमध्ये असे दादा नाही दिसणार, स्वप्नामध्ये तर खूपच चांगले दिसतील. कारण की स्वप्न हे सहज अवस्था आहे. आणि ही जागृत ती असहज अवस्था आहे.
क्रमिकमार्गमध्ये आत्मा प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रमण (करायचे) नसतात. प्रतिक्रमण विष मानले जाते. आपल्या येथे पण प्रतिक्रमण नसतात. आपण प्रतिक्रमण चंदुभाईच्याकडून करवून घेत असतो. कारण की हे तर अक्रम, येथे तर सगळाच माल भरलेला आहे.
आपण तर समोरच्याचा कोणत्या आत्माची गोष्ट करीत आहोत, प्रतिक्रमण करत आहोत, ते माहित आहे का? प्रतिष्ठित आत्माला नाही करीत, आपण त्याच्या मूळ शुद्धात्माला करीत असतो. शुद्धात्माच्या हजेरीत त्याच्या बरोबर हे झाले त्याबद्दल आपण प्रतिक्रमण करीत आहोत. अर्थात् त्या शुद्धात्माजवळ आपण माफी मागत असतो. नंतर त्याच्या प्रतिष्ठित आत्म्याशी आपल्याला काही घेणे-देणे नाही.
Page #110
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
९७
प्रतिक्रमण सुद्धा अहंकारानेच करायचे. परंतु चेतावणी कोणाची? प्रज्ञाची. प्रज्ञाशक्ति म्हणत असते, 'अतिक्रमण का केले?' प्रज्ञा काय चेतवते ? 'अतिक्रमण का केले? तर प्रतिक्रमण कर'.
सूक्ष्मातून सूक्ष्म दोष आमच्या दृष्टिबाहेर जात नाही. सूक्ष्मातून सूक्ष्म, अति अति सूक्ष्म दोषाची आम्हाला त्वरितच माहिती होऊन जाते. तुम्हाला कोणालाच माहित नाही पडणार की माझा दोष झाला आहे. कारण की दोष स्थूळ नाहीत..
प्रश्नकर्ता : तुम्हाला आमचे पण दोष दिसतात?
दादाश्री : सगळे दोष दिसतात. परंतु आमची दृष्टि दोष प्रति नसते. आम्हाला ते लगेच माहित होऊन जाते. परंतु आमची तर तुमच्या शुद्धात्मा प्रतिच दृष्टि असते. आमची तुमच्या उदयकर्म प्रति दृष्टि नसते. सगळ्यांच्या दोषांची आम्हाला माहिती पडूनच जाते. दोष दिसतात तरीसुद्धा आमच्या वर त्याचा परिणाम होत नाही.
आमच्याजवळ जेवढे दंड देण्या योग्य आहेत त्यांना सुद्धा माफी असते, आणि माफी सुद्धा सहज असते. समोरच्याला माफी मागावी नाही लागणार. जेथे सहज माफ केले जाते तेथे ते लोक स्वच्छ होत असतात. आणि जेथे असे सांगितले जाते 'साहेब माफ करावे' तेथेच मलीन झालेले आहेत. सहज माफ होते तेथे तर खूपच स्वच्छ होऊन जाते.
जोपर्यंत आम्हाला सहजता असते तोपर्यंत आम्हाला प्रतिक्रमण करायचे नसतात. साहजिकता मध्ये तुम्हाला सुद्धा प्रतिक्रमण नाही करावे लागत. साहजिकता मध्ये फरक पडला की प्रतिक्रमण करावे लागते. तुम्ही आम्हाला जेव्हा पाहणार तेव्हा साहजिकता मध्येच पाहणार, जेव्हा पाहणार तेव्हा आम्ही त्याच स्वभावमध्ये असणार. आमच्या साहजिकतेत फरक नाही पडत.
आम्ही तुम्हाला पाच आज्ञा देतो, कारण की ज्ञान तर दिले, परंतु ते तुम्ही गमवून बसणार. म्हणून ह्या पाच आज्ञा मध्ये राहणार तर मोक्षे जाणार. आणि सहावे काय सांगितले? जेथे अतिक्रमण झाले तेथे प्रतिक्रमण करावे.
Page #111
--------------------------------------------------------------------------
________________
प्रतिक्रमण
आज्ञा पाळायचे विसरून गेलात तर प्रतिक्रमण करायचे. मनुष्य आहे तर विसरून तर जाणार. परंतु विसरून गेलात तर त्याचे प्रतिक्रमण करायचे हे दादा, दोन तास आपली आज्ञा विसरून गेलो, परंतु मला तर आज्ञा पाळायची आहे. मला माफ करा.' तर मागचे सगळेच पास. शंभरचे शंभर मार्क पूर्ण.
हे 'अक्रम विज्ञान' आहे. विज्ञान म्हणजे त्वरित फळ देणारे. करतेपणा नाही त्याचे नांव 'विज्ञान' आणि करतेपणा आहे त्याचे नांव 'ज्ञान'!
विचारशील मनुष्य असेल त्याला असे तर वाटेल ना, की हे आम्ही काही सुद्धा केले नाही आणि हे आहे तरी काय? ही अक्रम विज्ञानची बलीहारी आहे. 'अक्रम'! क्रम-ब्रम नाही.
जय सच्चिदानंद
Page #112
--------------------------------------------------------------------------
________________
नव कलमें १. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचितमात्र पण अहम् नाही
दुभावणार, नाही दुभावले जाणार अथवा दुभावण्या प्रति नाही अनुमोदन केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा किंचितमात्र पण अहम् नाही दुभावणार, अशी
स्यादवाद वाणी, स्यादवाद वर्तन आणि स्यादवाद मनन करण्याची परम शक्ति द्या. २. हे दादा भगवान! मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण नाही दुभावणार, नाही
दुभावले जाणार अथवा दुभावण्या प्रति नाही अनुमोदन केले जाणार अशी परम शक्ति द्या. मला कोणत्याही धर्माचे किंचितमात्र पण प्रमाण नाही दुभावणार, अशी स्यादवाद वाणी,
स्यादवाद वर्तन आणि स्यादवाद मनन करण्याची परम शक्ति द्या. ३. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी उपदेशक. साध. साध्वी अथवा आचार्यचा
अवर्णवाद, अपराध, अविनय न करण्याची परम शक्ति द्या. ४. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा प्रति किंचितमात्र पण अभाव, तिरस्कार कधीही नाही केला जाणार, नाही करविला जाणार की कर्ताचे प्रति अनुमोदन
न करण्याची परम शक्ति द्या. ५. हे दादा भगवान! मला कोणत्याही देहधारी जीवात्माशी कधी पण कठोर भाषा, तंतीली
भाषा न बोलण्याची, न बोलावयाची की बोलण्या प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या. कोणी कठोर भाषा, तंतीली भाषा बोलले तर मला मृदु-ऋजू भाषा बोलण्याची परम
शक्ति द्या. ६. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा प्रति स्त्री-पुरुष अथवा नपुसंक,
कोणता ही लिंगधारी असो, तर त्या संबंधी किंचितमात्र पण विषय विकार संबंधी दोष इच्छा, चेष्टा किंवा विचार संबंधी दोष न करण्याची, न करविण्याची की कर्ता प्रति अनुमोदन न करण्याची अशी परम शक्ति द्या.
मला निरंतर निर्विकार राहण्याची परम शक्ति द्या. ७. हे दादा भगवान! मला कोणत्याही रसमधे लुब्धपणा न करण्याची अशी परम शक्ति द्या.
समरसी आहार घेण्याची परम शक्ति द्या. ८. हे दादा भगवान ! मला कोणत्याही देहधारी जीवात्माचा प्रत्यक्ष किंवा परोक्ष, जीवंत किंवा मृत कोणाचाही किंचितमात्र पण अवर्णवाद, अपराध, अविनय नाही करणार,
नाही करविले जाणार की कर्ता प्रति अनुमोदन नाही केले जाणार अशी परम शक्ति द्या. ९. हे दादा भगवान! मला जगत कल्याण करण्याचं निमित्त बनण्याची परम शक्ति द्या,
शक्ति द्या, शक्ति द्या. (एवढं तुम्ही दादा जवळ मागावे, हे दररोज मेकेनिकली वाचण्याची वस्तु नाही आहे, अंत:करणात ठेवण्याची वस्तु आहे. हे दररोज उपयोगपूर्वक भाववाणीची वस्तु आहे. एवढ्या पाठात तमाम शास्त्रांचे सार आले आहे.)
Page #113
--------------------------------------------------------------------------
________________
प्राप्तिस्थान
दादा भगवान परिवार अडालज : त्रिमंदिर संकुल, सीमंधर सिटी, अहमदाबाद- कलोल हाईवे,
पोस्ट : अडालज, जि.-गांधीनगर, गुजरात - 382421.
फोन : (079) 39830100, E-mail : info@dadabhagwan.org अहमदाबाद : दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेज के पीछे,
उस्मानपुरा, अहमदाबाद-380014. फोन : (079) 27540408 राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद-राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी (सर्कल),
पोस्ट : मालियासण, जि.-राजकोट. फोन : 9274111393 मोरबी : त्रिमंदिर, मोरबी-नवलखी हाईवे, पो- जेपुर, ता-मोरबी,
जि.-राजकोट. फोन : (02822) 297097 भुज
त्रिमंदिर, हिल गार्डन के पीछे, एयरपोर्ट रोड. फोन : (02832) 290123 गोधरा : त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन के सामने, गोधरा
(जि.-पंचमहाल). फोन : (02672) 262300 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामा की पोल-मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन के
सामने, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335 मुंबई : 9323528901 दिल्ली :9810098564 कोलकता : 033-32933885
:9380159957 जयपुर : 9351408285
भोपाल :9425024405 इन्दौर : 9893545351
जबलपुर : 9425160428 रायपुर : 9329523737
:9827481336 पटना : 9431015601
अमरावती : 9422915064 : 9590979099 हैदराबाद : 9989877786 पूना : 9422660497
जलंधर : 9814063043 U.S.A.: Dada Bhagwan Vignan Institute :
100, SW Redbud Lane, Topeka, Kansas 66606 Tel. : +1877-505-DADA (3232),
Email : info@us.dadabhagwan.org U.K. : +44330 111 DADA (3232) UAE : +971 557316937 Kenya : +254 722722063
Singapore : +65 81129229 Australia: +61421127947
New Zealand: +64 21 0376434 Website : www.dadabhagwan.org
001
बेंगलूर
Page #114
--------------------------------------------------------------------------
________________ प्रतिक्रमण विधि प्रत्यक्ष दादा भगवानच्या साक्षीने देहधारी *__चे मन-वचन-कायाचे योग, भावकर्मद्रव्यकर्म-नोकर्म ने भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान, आपल्या साक्षीने आज दिन पर्यंत माझ्याने जे जे___ _दोष झाले आहेत, त्याची क्षमा मागत आहे. पश्चाताप करत आहे. आलोचना-प्रतिक्रमण-प्रत्याख्यान करत आहे. आणि पुन्हा असे दोष कधी पण करणार नाही, असा दृढ निश्चय करत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. हे दादा भगवान ! मला असे कोणते पण दोष न करण्याची परम शक्ति द्या,शक्ति द्या, शक्ति द्या. * ज्याचे प्रति दोष झाले असतील, त्या व्यक्तिचे नांवघ्यायचे. * जे दोष झाले असतील, ते सर्व मनामध्ये जाहीर करायचे. [ तुम्ही शुद्धात्मा आणि जे दोष करतो त्याचे कडून प्रतिक्रमण करावयाचे आहे. चंदुभाई (वाचकांनी चंदुभाईच्या जागी स्वता:चे नांव सजायचे) कडून दोषांचे प्रतिक्रमण करावयाचे आहे.] ISBN 978-93-82128-144 9-789382128144 Printed in Indiaमराठी Rs20